< Salmos 86 >

1 Una oración de David. Escucha, Yahvé, y respóndeme, porque soy pobre y necesitado.
दाविदाची प्रार्थना हे परमेश्वरा, माझे ऐक, आणि मला उत्तर दे, कारण मी दीन आणि दरिद्री आहे.
2 Preserva mi alma, porque soy piadoso. Tú, Dios mío, salvas a tu siervo que confía en ti.
माझे रक्षण कर, कारण मी तुझा निष्ठावंत आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सेवकाचे रक्षण कर.
3 Ten piedad de mí, Señor, porque te llamo todo el día.
हे प्रभू, माझ्यावर दया कर, कारण मी दिवसभर तुला हाक मारतो.
4 Alegra el alma de tu siervo, porque a ti, Señor, elevo mi alma.
हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव आनंदित कर, कारण मी आपला जीव वर तुझ्याकडे लावतो.
5 Porque tú, Señor, eres bueno y estás dispuesto a perdonar, abundante en bondad amorosa para todos los que te invocan.
हे प्रभू, तू उत्तम आहेस आणि क्षमा करण्यास तयार आहेस, आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांना तू महान दया दाखवतोस.
6 Escucha, Yahvé, mi oración. Escucha la voz de mis peticiones.
हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला कान दे; माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे.
7 En el día de mi angustia te invocaré, porque tú me responderás.
हे परमेश्वरा, मी आपल्या संकटाच्या दिवसात तुला हाक मारीन, कारण तू मला उत्तर देशील.
8 No hay nadie como tú entre los dioses, Señor, ni ninguna obra como las tuyas.
हे प्रभू, देवांमध्ये तुझ्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाही. तुझ्या कृत्यासारखी कोणीतीही कृत्ये नाहीत.
9 Todas las naciones que has hecho vendrán a adorar ante ti, Señor. Ellos glorificarán tu nombre.
हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील. ते तुझ्या नावाला आदर देतील.
10 Porque eres grande y haces cosas maravillosas. Sólo tú eres Dios.
१०कारण तू महान आहेस व तू आश्चर्यकारक गोष्टी करतोस; तूच फक्त देव आहेस.
11 Enséñame tu camino, Yahvé. Caminaré en tu verdad. Haz que mi corazón sea indiviso para temer tu nombre.
११हे परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव, मग मी तुझ्या सत्यात चालेन. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.
12 Te alabaré, Señor mi Dios, con todo mi corazón. Glorificaré tu nombre para siempre.
१२हे प्रभू, माझ्या देवा, मी अगदी आपल्या मनापासून तुझी स्तुती करीन; मी सर्वकाळ तुझ्या नावाचे गौरव करीन.
13 Porque tu bondad es grande para conmigo. Has liberado mi alma del más bajo Seol. (Sheol h7585)
१३कारण माझ्यावर तुझी महान दया आहे; तू माझा जीव मृत्यूलोकापासून सोडवला आहेस. (Sheol h7585)
14 Dios, los soberbios se han levantado contra mí. Una compañía de hombres violentos ha buscado mi alma, y no te tienen en cuenta ante ellos.
१४हे देवा, उद्धट लोक माझ्याविरूद्ध उठले आहेत. हिंसाचारी लोकांची टोळी माझा जीव घेण्यास पाहत आहे. त्यांना तुझ्यासाठी काही आदर नाही.
15 Pero tú, Señor, eres un Dios misericordioso y bondadoso, lento para la ira, y abundante en bondad y verdad.
१५तरी हे प्रभू, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस. मंदक्रोध, आणि दया व सत्य यामध्ये विपुल आहेस.
16 ¡Vuelve a mí y ten piedad de mí! Da tu fuerza a tu siervo. Salva al hijo de tu siervo.
१६तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या दासास आपले सामर्थ्य दे; आपल्या दासीच्या मुलाचे तारण कर.
17 Muéstrame una señal de tu bondad, para que los que me odian lo vean y se avergüencen, porque tú, Yahvé, me has ayudado y me has consolado.
१७हे परमेश्वरा, तुझ्या अनुग्रहाचे चिन्ह दाखव. कारण तू माझे साहाय्य व सांत्वन केले आहे. मग माझा द्वेष करणाऱ्यांनी ते पाहावे, आणि लज्जित व्हावे.

< Salmos 86 >