< Proverbios 20 >
1 El vino es un burlador y la cerveza es un pendenciero. Quien se deja llevar por ellos no es sabio.
१द्राक्षरस चेष्टा करणारा आहे आणि मादक पेय भांडखोर आहे; पिण्याने झिंगणारा शहाणा नाही.
2 El terror de un rey es como el rugido de un león. Quien lo provoque a la ira perderá su propia vida.
२राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो; जो त्यास राग आणतो तो आपल्याच जीवाविरूद्ध पाप करतो.
3 Es un honor para un hombre mantenerse alejado de las disputas, pero todos los tontos se pelearán.
३जो कोणी भांडण टाळतो त्यास आदर आहे, पण प्रत्येक मूर्ख वादविवादात उडी मारतो.
4 El perezoso no arará a causa del invierno; por lo que mendigará en la cosecha, y no tendrá nada.
४आळशी मनुष्य हिवाळा लागल्यामुळे नांगरीत नाही, तो हंगामाच्या वेळी पिक शोधेल पण त्यास काहीही मिळणार नाही.
5 El consejo en el corazón del hombre es como las aguas profundas, pero un hombre comprensivo lo sacará.
५मनुष्याच्या मनातील योजना खोल पाण्यासारख्या असतात; पण समजदार मनुष्य त्या बाहेर काढतो.
6 Muchos hombres pretenden ser hombres de amor indefectible, pero ¿quién puede encontrar un hombre fiel?
६बरेच व्यक्ती विश्वासू असल्याची घोषणा करतात, पण जो कोणी विश्वासू आहे त्या व्यक्तीस कोण शोधून काढेल? पण खरोखरच असा व्यक्ती सापडणे कठीण असते.
7 El hombre justo camina con integridad. Benditos sean sus hijos después de él.
७जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो, आणि त्याच्या मागे त्याची मुले त्यास अनुसरतात आणि ते सुखी होतात.
8 Un rey que se sienta en el trono del juicio dispersa todo el mal con sus ojos.
८जेव्हा राजा राजासनावर बसून न्यायनिवाड्याचे कार्य करतो, तो आपल्या डोळ्यांनी सर्व वाईट गोष्टी उडवून टाकतो.
9 ¿Quién puede decir: “He purificado mi corazón”? Estoy limpio y sin pecado”.
९मी आपले हृदय शुद्ध केले आहे, मी आपल्या पापापासून मोकळा झालो आहे असे कोण म्हणू शकेल?
10 Pesos y medidas diferentes, ambos por igual son una abominación para Yahvé.
१०भिन्नभिन्न अशी खोटी वजने आणि असमान मापे, या दोन्हींचा परमेश्वरास तिरस्कार आहे.
11 Hasta un niño se da a conocer por sus actos, si su trabajo es puro, y si es correcto.
११तरुणसुध्दा आपल्या कृतीने आपली वर्तणूक शुद्ध आणि सरळ आहे की नाही ते दाखवतो.
12 El oído que oye y el ojo que ve, Yahvé ha hecho incluso a los dos.
१२ऐकणारे कान आणि बघणारे डोळे, हे दोन्ही परमेश्वरानेच केले आहेत.
13 No ames el sueño, no sea que llegues a la pobreza. Abre los ojos y te saciarás de pan.
१३झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील; आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल.
14 “No es bueno, no es bueno”, dice el comprador; pero cuando se va por su camino, entonces se jacta.
१४विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो.
15 Hay oro y abundancia de rubíes, pero los labios del conocimiento son una joya rara.
१५तेथे सोने आहे आणि विपुल किंमती खडे आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहेत.
16 Toma la prenda de quien pone una garantía para un extranjero; y lo tienen en prenda por una mujer descarriada.
१६जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, जेव्हा तो परक्यास जामीन झाला आहे म्हणून त्यास तारणादाखल ठेव.
17 La comida fraudulenta es dulce para el hombre, pero después se le llena la boca de grava.
१७कपटाची भाकर गोड लागते, पण त्यानंतर त्याचे तोंड सर्व वाळूंनी भरेल.
18 Los planes se establecen mediante asesoramiento; ¡con una guía sabia haces la guerra!
१८सल्ल्याद्वारे योजना प्रस्थापित होतात, म्हणून केवळ ज्ञानाच्या मार्गदर्शनाने लढाई चालू कर.
19 El que va de un lado a otro como portador de cuentos revela secretos; por tanto, no te hagas compañía de quien abre mucho los labios.
१९लावालावी करणारा गुप्त गोष्टी प्रगट करतो, म्हणून बडबड करणाऱ्यांची संगत धरू नकोस.
20 El que maldiga a su padre o a su madre, su lámpara se apagará en la oscuridad de las tinieblas.
२०जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल, तर त्याचा दीप अंधारात विझून जाईल.
21 Una herencia ganada rápidamente al principio no será bendecido al final.
२१सुरवातीला उतावळीने मिळवलेल्या संपत्तीचा शेवट आशीर्वादित होणार नाही.
22 No digas: “Pagaré el mal”. Espera a Yahvé, y él te salvará.
२२मी चुकीच्या बदल्यात परतफेड करीन असे म्हणू नकोस, परमेश्वराची वाट पाहा आणि तो तुझे रक्षण करील.
23 Yahvé detesta las diferencias de peso, y las balanzas deshonestas no son agradables.
२३असमान वजनाचा परमेश्वरास तिरस्कार आहे आणि अप्रामाणिक तराजू चांगले नाही.
24 Los pasos del hombre son de Yahvé; ¿cómo puede entonces el hombre entender su camino?
२४मनुष्याच्या पावलास परमेश्वर वाट दाखवतो. तर कोणत्या मार्गाने जावे हे त्यास कसे कळेल?
25 Es una trampa para el hombre hacer una entrega precipitada, para luego considerar sus votos.
२५हे पवित्र आहे असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर मग विचार करीत बसणे हे मनुष्याने पाशात पडणे होय.
26 Un rey sabio selecciona a los malvados, y conduce el trillo sobre ellos.
२६सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून टाकतो, आणि मळणी करण्याचे चक्र त्यांच्यावर फिरवतो.
27 El espíritu del hombre es la lámpara de Yahvé, buscando en todas sus partes más íntimas.
२७मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय, तो त्याच्या अंतर्यामाच्या सर्व भागांचा शोध घेतो.
28 El amor y la fidelidad mantienen al rey a salvo. Su trono se sustenta en el amor.
२८कराराचा प्रामाणिपणा आणि विश्वसनियता राजाचे रक्षण करतात, तो प्रेमाने राजासन बळकट करतो.
29 La gloria de los jóvenes es su fuerza. El esplendor de los ancianos son sus canas.
२९तरुण मनुष्याचे वैभव त्याचे बळ आहे. आणि पिकलेले केस वृद्धाचे सौंदर्य आहे.
30 Los golpes que hieren limpian el mal, y los golpes purgan las partes más íntimas.
३०जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करतात.