< Levítico 10 >
1 Nadab y Abiú, hijos de Aarón, tomaron cada uno su incensario, pusieron fuego en él y colocaron incienso, y ofrecieron delante de Yahvé un fuego extraño que él no les había mandado.
१मग अहरोनाचे, पुत्र नादाब, व अबीहू ह्यानी आपआपली धुपाटणी घेतली व त्यामध्ये अग्नी पेटवला व त्यामध्ये धुप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला, असा अग्नी परमेश्वरासमोर नेण्याची आज्ञा नव्हती;
2 Salió fuego de delante de Yahvé y los devoró, y murieron delante de Yahvé.
२म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले.
3 Entonces Moisés le dijo a Aarón: “Esto es lo que habló Yahvé, diciendo, Me mostraré santo a los que se acerquen a mí, y ante todo el pueblo seré glorificado”. Aarón calló.
३मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील. त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे, मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांस समजलेच पाहिजे. तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.’”
4 Moisés llamó a Misael y a Elzafán, hijos de Uziel, tío de Aarón, y les dijo: “Acérquense y saquen a sus hermanos de delante del santuario fuera del campamento.”
४अहरोनाचा चुलता उज्जियेल ह्याला मिशाएल व एलसाफान असे दोन पुत्र होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, “या पवित्रस्थानाच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”
5 Se acercaron, pues, y los llevaron en sus túnicas fuera del campamento, como Moisés había dicho.
५तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते.
6 Moisés dijo a Aarón, a Eleazar y a Itamar, sus hijos: “No os soltéis el pelo de la cabeza, ni os rasguéis las vestiduras, para que no muráis, y para que no se enoje con toda la congregación; pero que vuestros hermanos, toda la casa de Israel, se lamenten por el fuego que Yahvé ha encendido.
६मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु: ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्याना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;
7 No saldrás de la puerta de la Tienda del Encuentro, para que no mueras, porque el aceite de la unción de Yahvé está sobre ti.” Ellos hicieron lo que dijo Moisés.
७पण तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली.
8 Entonces Yahvé le dijo a Aarón:
८मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला,
9 “Tú y tus hijos no deben beber vino ni bebida fuerte cada vez que entren en la Tienda del Encuentro, o morirán. Esto será un estatuto para siempre a lo largo de vuestras generaciones.
९“जेव्हा तू व तुझे पुत्र तुम्ही दर्शनमंडपामध्ये जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढया कायमचा विधि आहे.
10 Debes distinguir entre lo santo y lo común, y entre lo inmundo y lo limpio.
१०तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध ह्यामधील भेद जाणावा;
11 Enseñarás a los hijos de Israel todos los estatutos que Yahvé les ha dicho por medio de Moisés.”
११याप्रकारे परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांस शिकवावे.”
12 Moisés dijo a Aarón, a Eleazar y a Itamar, sus hijos que habían quedado: “Tomad la ofrenda que queda de las ofrendas encendidas a Yahvé, y comedla sin levadura junto al altar, porque es santísima;
१२मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे;
13 y la comeréis en lugar santo, porque es vuestra porción y la de vuestros hijos, de las ofrendas encendidas a Yahvé; porque así me ha sido ordenado.
१३परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधीनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हक्काचा आहे; परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा.
14 El pecho de la ofrenda mecida y el muslo elevado los comeréis en un lugar limpio, tú, tus hijos y tus hijas contigo, porque son dados como tu porción y la de tus hijos, de los sacrificios de las ofrendas de paz de los hijos de Israel.
१४“त्याप्रमाणे तू, तुझी मुले व तुझ्या मुली ह्यांनी, ओवाळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे.
15 Traerán el muslo elevado y el pecho mecido con las ofrendas encendidas de la grasa, para mecerlo como ofrenda mecida ante Yahvé. Será de ustedes, y de sus hijos con ustedes, como porción para siempre, como lo ha ordenado Yahvé”.
१५ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.”
16 Moisés indagó diligentemente sobre el macho cabrío de la ofrenda por el pecado, y, he aquí, fue quemado. Se enojó con Eleazar y con Itamar, los hijos de Aarón que habían quedado, diciendo:
१६मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्यास कळाले; तेव्हा अहरोनाचे पुत्र एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला,
17 “¿Por qué no habéis comido la ofrenda por el pecado en el lugar del santuario, ya que es santísima, y él os la ha dado para que carguéis con la iniquidad de la congregación, para hacer expiación por ellos ante Yahvé?
१७“तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हास दिले होते;
18 He aquí que su sangre no fue llevada al interior del santuario. Ciertamente debisteis comerlo en el santuario, como yo lo ordené”.
१८त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागी बसून अवश्य खावयाचे होते.”
19 Aarón habló a Moisés: “He aquí que hoy han ofrecido su ofrenda por el pecado y su holocausto ante Yahvé, y me han sucedido cosas como éstas. Si yo hubiera comido hoy la ofrenda por el pecado, ¿habría sido agradable a los ojos de Yahvé?”
१९परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”
20 Cuando Moisés lo oyó, le pareció bien.
२०मोशेने हे ऐकले, तेव्हा त्याचे समाधान झाले.