< Job 2 >

1 También el día en que los hijos de Dios vinieron a presentarse ante Yahvé, Satanás vino también entre ellos para presentarse ante Yahvé.
पुन्हा एके दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहीले, त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर हजर झाला होता.
2 Yahvé dijo a Satanás: “¿De dónde vienes?” Satanás respondió a Yahvé, y dijo: “De ir y venir por la tierra, y de andar arriba y abajo en ella”.
परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू कोठून येत आहेस?” सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “पृथ्वीवर हिंडून फिरून आणि येथून तेथून चालत जाऊन परत आलो आहे.”
3 Yahvé dijo a Satanás: “¿Has considerado a mi siervo Job? Porque no hay nadie como él en la tierra, un hombre intachable y recto, que teme a Dios y se aparta del mal. Todavía mantiene su integridad, aunque tú me incitaste contra él, para arruinarlo sin causa”.
नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला, “माझा सेवक ईयोब याच्याकडे तूझे लक्ष गेले का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही, तो सात्विक आणि सरळ मनुष्य आहे, तो देवाचे भय धरीतो आणि दुष्ट गोष्टींपासून दूर राहतो. जरी त्याच्याविरुध्द कोणतेही कारण नसतांना त्याचा नाश करण्यास तू मला तयार केले, तरीही त्याने आपली सात्विक्ता अंखड धरून ठेवली आहे.”
4 Satanás respondió a Yahvé y dijo: “Piel por piel. Sí, todo lo que el hombre tiene lo dará por su vida.
सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, आणि म्हटले, “कातडीसाठी कातडी, खरोखर मनुष्य स्वतःच्या जीवासाठी आपले सर्वकाही देईल.
5 Pero extiende ahora tu mano y toca su hueso y su carne, y te denunciará en tu cara.”
परंतु जर तू तुझा हात लांब करून त्याच्या हाडांना आणि शरीराला स्पर्श केलास, तर तो तुझ्या तोंडावर तुझा नकार करील.”
6 Yahvé dijo a Satanás: “Mira, está en tu mano. Sólo perdona su vida”.
परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, तो आता तुझ्या हाती आहे, मात्र त्याचा जीव राखून ठेव.”
7 Entonces Satanás salió de la presencia de Yahvé, e hirió a Job con llagas dolorosas desde la planta del pie hasta la cabeza.
मग सैतान परमेश्वराच्या उपस्थितीतून निघून गेला आणि त्याने ईयोबाला तळपायांपासुन डोक्यापर्यंत वेदनांनी भरलेल्या फोडांनी पीडिले.
8 Tomó para sí un tiesto para rasparse, y se sentó entre las cenizas.
ईयोबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी खापराचा तुकडा घेतला आणि तो राखेत जाऊन बसला.
9 Entonces su mujer le dijo: “¿Aún mantienes tu integridad? Renuncia a Dios y muere”.
नंतर त्याची पत्नी त्यास म्हणाली, “तुम्ही अजूनही तुमची सात्विक्ता धरून ठेवली आहे का? तुम्ही देवाचा त्याग करा आणि मरा,”
10 Pero él le dijo: “Hablas como una de las mujeres necias. ¿Qué? ¿Recibiremos el bien de la mano de Dios, y no recibiremos el mal?” En todo esto Job no pecó con sus labios.
१०परंतू तो तिला म्हणाला, “तू मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस. देवाच्या हातातून आपण चांगलेच घेतले पाहीजे वाईट नाही काय?” तू असाच विचार करतेस ना? या सर्व बाबतीत ईयोबाने त्याच्या बोलण्याद्बारे पाप केले नाही.
11 Cuando los tres amigos de Job se enteraron de todo este mal que le había sobrevenido, vinieron cada uno de su lugar: Elifaz el temanita, Bildad el suhita y Zofar el naamatita; y se citaron juntos para venir a compadecerse de él y a consolarlo.
११ईयोबाचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि सोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी त्याच्यावर आलेल्या संकटाविषयी ऐकले होते, ईयोबाला भेटून त्याच्यासोबत शोक करण्यास आणि त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले, तेव्हा ते आपआपल्या ठिकाणाहून आले.
12 Cuando alzaron los ojos desde lejos y no lo reconocieron, alzaron la voz y lloraron; cada uno de ellos rasgó su manto y esparció polvo sobre sus cabezas hacia el cielo.
१२जेव्हा त्यांनी दुरून आपले डोळे वर करून पाहिले तेव्हा त्यांनी त्यास आळखले नाही, ते मोठ्याने रडले, प्रत्येकाने आपआपला स्वतःचा झगा फाडला आणि हवेत धूळ उडवली आणि स्वतःच्या डोक्यावरही घेतली.
13 Y se sentaron con él en el suelo durante siete días y siete noches, sin que nadie le dirigiera la palabra, porque veían que su dolor era muy grande.
१३मग ते त्याच्याबरोबर सात दिवस आणि सात रात्री जमीनीवर बसून राहिले, आणि त्याच्याशी एक शब्दही कोणी बोलले नाही कारण त्याचा शोक अतिशय तीव्र होता असे त्यांनी पाहीले.

< Job 2 >