< Salmos 99 >
1 El Señor reina; ¡Tiemblen todas las naciones! Porque él se sienta en su trono sobre los querubines; ¡Qué la tierra tiemble!
१परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत. तो करुबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो.
2 El Señor gobierna con poder sobre Sión, él es soberano sobre todas las naciones.
२सियोनात परमेश्वर महान आहे; तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे.
3 Alaben su grandeza, y respétenlo por quien es, porque él es santo,
३ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. तो पवित्र आहे.
4 y tiene poder real. Tú amas la justicias; tomas decisiones imparciales. Te has asegurado que todo esté hecho con rectitud y de acuerdo a lo que está bien.
४राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे. तू सरळपणा स्थापिला आहे; तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस.
5 ¡Brinden respeto al Señor, nuestro Dios! ¡Póstrense a sus pies, porque él es santo!
५परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. तो पवित्र आहे.
6 Moisés y Aaron estuvieron entre sus sacerdotes; Samuel también le rogó. Ellos clamaron al Señor por ayuda, y él les respondió.
६त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते, आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7 Les habló desde el pilar de nubes, y ellos guardaron las leyes y los decretos que él les dio.
७तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळले.
8 Señor nuestro Dios, tú les respondiste. Fuiste un Dios perdonador con ellos, pero los castigaste cuando hicieron algo mal.
८हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास.
9 Honren al Señor, y alábenlo en su monte santo. ¡Porque el Señor, nuestro Dios, es santo!
९परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा, आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.