< Levítico 17 >

1 El Señor le dijo a Moisés,
परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 “Dile a Aarón, a sus hijos y a todos los israelitas que esto es lo que el Señor ordena:
“अहरोन त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने जी आज्ञा दिली आहे ती ही:
3 Cualquier israelita que mate un toro, un cordero o una cabra, ya sea dentro o fuera del campamento,
इस्राएल घराण्यातील एखाद्या मनुष्याने, छावणीत किंवा छावणीबाहेर एखादा बैल; कोकरू किंवा बकरा मारला,
4 en lugar de llevarlo a la entrada del Tabernáculo de Reunión para presentarlo como ofrenda al Señor allí, esa persona será considerada culpable de asesinato ilegal. Han derramado sangre y deben ser expulsados de su pueblo.
परंतु परमेश्वराच्या निवासमंडपासमोर अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणला नाही, तर त्या मनुष्यास रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने त्या प्राण्याचा वध करून रक्त सांडले आहे म्हणून त्या मनुष्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
5 “Por eso los israelitas tienen que llevar al Señor los sacrificios que actualmente ofrecen en los campos. Deben llevarlos al sacerdote a la entrada del Tabernáculo de Reunión y ofrecerlos como ofrendas de paz al Señor.
या नियमाचा हेतू असा की इस्राएल लोक आपले पशू खुल्या शेतात मारतात ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे, व परमेश्वराकरिता शांत्यर्पणे म्हणून अर्पावे.
6 El sacerdote rociará la sangre sobre el altar del Señor a la entrada del Tabernáculo de Reunión, y quemará la grasa, agradable al Señor.
याजकाने त्यांचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वरास सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.
7 “No deben seguir ofreciendo sus sacrificios al diablo de las cabras con el que han actuado como prostitutas. Esta es una regulación para todos los tiempos y para todas las generaciones futuras.
आणि ह्यामुळे त्यांनी व्यभिचारी मतीने ‘अजमूर्तींच्या मागे लागून त्यांना आपले यज्ञपशु अर्पण करु नयेत. हे तुम्हास पिढ्यान् पिढ्या कायमचे विधी नियम आहेत!
8 “Adviértanles que cualquier israelita o extranjero que viva entre ellos que ofrezca un holocausto o un sacrificio
तू त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,
9 sin llevarlo a la entrada del Tabernáculo de Reunión para sacrificarlo al Señor debe ser expulsado de su pueblo.
तर त्याने तो परमेश्वरास अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा; त्याने तसे न केल्यास आपल्या लोकांतून त्यास बाहेर टाकावे.
10 Desconoceré a cualquier israelita o extranjero que viva entre ellos y coma sangre y los expulsaré de su pueblo.
१०इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी रक्त सेवन केले! तर मी त्या मनुष्यापासून आपले तोंड फिरवीन व त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
11 La vida está en la sangre del cuerpo. Os la he dado para que, poniéndola en el altar, sus vidas puedan ser rectificadas, porque es la sangre que rectifica la vida de la gente.
११कारण प्राण्याचे जीवन त्यांच्या रक्तात असते आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते तुम्हास दिले आहे; कारण रक्तानेच प्रायश्चित होते हेच ते रक्त आहे की ज्याद्वारे जिवाचे प्रायश्चित होते.
12 Por eso les advierto a los israelitas: Ninguno de ustedes puede comer sangre, y ningún extranjero que viva entre ustedes puede comer sangre.
१२म्हणून मी इस्राएल लोकांस सांगतले आहे की तुमच्यातील कोणीही, तसेच तुमच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांनीही रक्त सेवन करु नये.
13 “Cualquier israelita o extranjero que viva entre ellos y que cace y mate un animal salvaje o un pájaro que esté permitido comer, debe drenar la sangre de su cuerpo y cubrirlo con tierra,
१३इस्राएल लोकांपैकी असो किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांपैकी असो! कोणी खाण्यास योग्य पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.
14 porque la vida está en la sangre del cuerpo. Por eso he advertido a los israelitas: No se permite comer la sangre de nada viviente, porque la vida está en la sangre del cuerpo. Cualquiera que la coma debe ser expulsado.
१४कारण प्राणीमात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जिवन आहे ह्यामुळे मी इस्राएल लोकांस म्हणालो आहे की कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करु नये, कारण सर्व प्राण्यांचे जिवन हेच त्यांचे रक्त आहे.
15 “Todo israelita o extranjero que coma algo que haya sido encontrado muerto o matado por animales salvajes debe lavar sus ropas y lavarlas con agua, y estarán inmundos hasta la noche. Entonces estarán limpios.
१५“कोणी मनुष्याने मग तो त्यांच्यामध्ये राहणार किंवा परदेशीय असो! तो जर मरण पावलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्याचे मांस खाईल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; म्हणजे तो शुद्ध होईल.
16 Pero si no lavan sus ropas y se lavan con agua, entonces son responsables de su culpa”.
१६त्याने आपले कपडे धुतले नाहीत किंवा स्नान केले नाही तर तो आपल्या अपराधाबद्दल दोषी ठरेल, त्याने त्याबद्दल शिक्षा भोगावी.”

< Levítico 17 >