< Josué 24 >

1 Josué convocó a todas las tribus de Israel en Siquem. Luego llamó a los ancianos, a los líderes, a los jueces y a los funcionarios, y vinieron y se pusieron de pie ante el Tabernáculo de Dios.
तेव्हा यहोशवाने इस्राएलाचे सर्व वंश शखेमात एकवट करून इस्राएलाचे वडील व त्याचे पुढारी व त्याचे न्यायाधीश व त्यावरले अधिकारी यांस बोलावले, आणि ते देवापुढे हजर झाले.
2 Josué dijo a todo el pueblo: “El Señor, el Dios de Israel, dice esto: ‘Hace mucho, mucho tiempo, tus antepasados, incluso Taré, padre de Abraham y de Nacor, vivían más allá del río Éufrates, y adoraban a otros dioses.
तेव्हा यहोशवाने सर्व लोकांस सांगितले, “इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो की, पूर्वकाळी तुमचे पूर्वज फरात महानदी पलीकडे राहत होते; अब्राहामाचा पिता व नाहोराचा पिता तेरह तेथे होता; तेव्हा त्यांनी दुसऱ्या देवाची सेवा केली.
3 Yo traje a tu padre Abraham desde el otro lado del Éufrates y lo conduje por toda la tierra de Canaán y le di muchos descendientes. Le di a Isaac.
परंतु त्याने तुमचा पूर्वज अब्राहाम ह्याला महानदीच्या पलीकडून आणले, आणि त्यास कनान देशात नेले आणि तेव्हा मी त्यास इसहाकाद्वारे पुष्कळ वंशज दिले,
4 A Isaac le di Jacob y Esaú. A Esaú le di en propiedad la región montañosa de Seír, pero Jacob y sus hijos bajaron a Egipto.
आणि इसहाकाला याकोब व एसाव दिला, एसावाला सेईर डोंगर तो वतन करून दिला, परंतु याकोब हा त्याच्या पुत्रपौत्रांसह मिसर देशी गेला.
5 “Envié a Moisés y a Aarón, e hice caer plagas sobre el pueblo de Egipto, y te saqué a ti.
मग मी मोशे व अहरोन यांना पाठवले आणि मिसऱ्यांना पीडा देऊन पीडिले, नंतर मी तुम्हाला बाहेर आणले.
6 Sí, saqué a tus antepasados, pero cuando llegaste al Mar Rojo los egipcios perseguían a tus antepasados con carros y jinetes.
तेव्हा मी तुमच्या पूर्वजांस मिसर देशातून बाहेर आणले आणि तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहचला, तेव्हा मिसरी, रथ व घोडे घेऊन, तांबड्या समुद्रापर्यंत त्यांच्या पाठीस लागले.
7 Tus antepasados le pidieron ayuda al Señor, y él puso la oscuridad entre ustedes y los egipcios. Luego hizo que el mar volviera sobre ellos y se ahogaron. Viste con tus propios ojos lo que hizo en Egipto. Luego vivieron muchos años en el desierto.
तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला, मग त्याने तुमच्या व मिसऱ्यांच्या मध्ये काळोख पाडला, आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना बुडवले; मी मिसरात जे केले, ते तर तुमच्या डोळ्यांनी पाहिले, आणि मग तुझी रानात बहुत दिवस राहिला.
8 “Después te llevé a la tierra de los amorreos que vivían al otro lado del Jordán. Ellos lucharon contra ti, pero te los entregué para que los derrotaras y te apoderaras de su tierra. Yo los destruí delante de ti.
मग जे अमोरी यार्देनेच्या पलीकडे राहत होते, त्यांच्या देशात मी तुम्हाला आणले; तेव्हा त्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले, आणि तुम्ही त्यांचा देश ताब्यात घेतला; मी त्यांचा तुमच्यापुढे नाश केला.
9 “Cuando Balac, hijo de Zipor, el rey de Moab, quiso luchar contra Israel, mandó a llamar a Balaam, hijo de Beor, para que viniera a maldecirte.
नंतर मवाबाचा राजा सिप्पोरपुत्र बालाक त्याने उठून इस्राएलाशी लढाई केली; तेव्हा त्याने दूत पाठवून बौराचा पुत्र बलाम याला तुम्हाला शाप देण्यासाठी बोलावले.
10 Pero no estaba dispuesto a escuchar a Balaam, así que en su lugar te bendijo repetidamente y te salvó de Balac.
१०परंतु बलामाचे मी ऐकले नाही; यास्तव त्याने तुम्हाला आशीर्वाद दिला, आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडवले.
11 “Cruzaste el Jordán y llegaste a Jericó, donde los hombres de Jericó lucharon contra ti. También lo hicieron los amorreos, los ferezeos, los cananeos, los hititas, los gergeseos, los heveos y los jebuseos.
११मग तुम्ही यार्देन उतरून यरीहोजवळ आला, तेव्हा यरीहोचे मालक, अमोरी, आणि परिज्जी व कनानी व हित्ती व गिर्गाशी, हिव्वी व यबूसी, ह्यांनी तुमच्याशी लढाई केली, परंतु मी ते तुमच्या हाती दिले;
12 Pero te los entregué para que los derrotaras. Y envié al hornete delante de ti para que expulsara a los dos reyes de los amorreos. ¡No ganaron con sus propias espadas y arcos!
१२मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवल्या, आणि त्यांनी त्यांना तुमच्यासमोरून घालवले; अमोऱ्याचे दोन राजे यांना घालवले; तुझ्या तलवारीने व धनुष्यानेही हे झाले नाही.
13 Les di una tierra por la que no trabajaron y ciudades que no construyeron. Ahora viven en ellas y comen de viñas y olivares que no plantaron’.
१३याप्रमाणे ज्या देशाविषयी तुम्ही श्रम केले नाहीत, जी नगरे तुम्ही बांधली नाहीत, ती मी तुम्हाला दिली आहेत, तुम्ही त्यामध्ये राहत आहा; द्राक्षमळे व जैतूनबने जी तुम्ही लावली नाहीत, त्यांचे तुम्ही फळ खात आहात.
14 “Así que respeten al Señor y adórenlo, sincera y fielmente. Desháganse de los dioses que sus antepasados adoraron más allá del Éufrates y en Egipto, y adoren al Señor.
१४तर आता तुम्ही पूर्णपणाने व सत्यतेने परमेश्वरास भिऊन त्याची सेवा करा, आणि फरात नदीच्या पूर्वेकडे व मिसर देशात तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली, त्यांना दूर करून परमेश्वर देवाचीच सेवा करा.
15 Pero si no quieren adorar al Señor, ¡elijan hoy a quién quieren adorar! ¿Adorarána los dioses que adoraron sus antepasados más allá del Éufrates? ¿O a los dioses de los amorreos en cuya tierra viven ahora? Pero yo y mi familia adoraremos al Señor”.
१५जर परमेश्वर देवाची सेवा करणे हे जर तुम्हाला वाईट वाटते, तर तुम्ही ज्याची सेवा कराल, त्यास आज आपल्यासाठी निवडून घ्या; फरात नदीच्या पूर्वेकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली, त्यांची सेवा करा, किंवा ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांची सेवा करा, परंतु मी व माझ्या घरची माणसे आम्ही परमेश्वराचीच सेवा करू.”
16 El pueblo respondió: “¡Nunca abandonaremos al Señor ni adoraremos a otros dioses!
१६तेव्हा लोकांनी असे उत्तर केले की, “परमेश्वर देवाला सोडून आम्ही दुसऱ्या देवांची सेवा कधीच करणार नाही;
17 Porque el Señor, nuestro Dios, nos sacó a nosotros y a nuestros antepasados de la esclavitud en Egipto. Él fue quien hizo grandes milagros ante nuestros ojos. Él cuidó de nosotros en el camino mientras viajábamos por las tierras de muchas naciones.
१७कारण परमेश्वर आमचा देव आहे; त्यानेच आम्हांला व आमच्या पूर्वजांना मिसर देशांच्या दास्यातून बाहेर आणले; आणि ज्याने आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले, आणि ज्या वाटेने आम्ही गेलो व ज्या ज्या राष्ट्रामधून आम्ही मार्गक्रमण केले त्यामध्ये त्याने आमचे रक्षण केले,
18 El Señor expulsó ante nosotros a los amorreos y a todas las demás naciones que habitaban la tierra. Así que adoraremos al Señor, porque es nuestro Dios”.
१८आणि देशात राहणाऱ्या अमोऱ्यांनासह सर्व राष्ट्रांस परमेश्वराने आमच्यापुढून घालवले आहे; आणखी परमेश्वर आमचा देव आहे म्हणून आम्ही त्याची सेवा करू.”
19 Josué le dijo al pueblo: “Recuerden que el Señor es un Dios santo y celoso. No podrán adorarle, ni perdonará su rebeldía nisus pecados
१९परंतु यहोशवाने लोकांस सांगितले, “तुम्ही परमेश्वर देवाची सेवा करू शकणार नाही; कारण की तो पवित्र देव आहे. तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अधर्माची व तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. त्याने तुमचे चांगले केले तो तुम्हाला भस्म करेल.
20 si renuncian a él y adoran a dioses extranjeros. Se volverá contra ustedes y los destruirá a pesar de todo el bien que ha hecho por ustedes”.
२०जर तुम्ही परमेश्वरास सोडून आणि परक्या देवांची सेवा कराल, तो उलटून तुमचे वाईट करील, तुमची हानीही करील.”
21 “¡No digas eso!” respondió el pueblo. “¡Adoraremos al Señor!”
२१तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “असे नाही, आम्ही परमेश्वराची सेवा करू.”
22 Entonces Josué advirtió al pueblo: “Hoy se han convertido en testigos contra ustedes mismos al decir que han elegido adorar al Señor”. “Sí, somos testigos”, respondió el pueblo.
२२तेव्हा यहोशवा लोकांस म्हणाला, “तुम्ही आपल्या स्वतःचे साक्षी आहात, तुम्ही परमेश्वराची सेवा करण्यास त्यास आपल्यासाठी निवडून घेतले आहे.” ते म्हणाले, “आम्ही साक्षी आहोत.”
23 “Entonces desháganse de esos dioses extranjeros que tienen y prometan ser leales sólo al Señor, el Dios de Israel”, les dijo Josué.
२३“असे आहे तर आता तुमच्यामध्ये जे परके देव असतील, ते तुम्ही दूर करा, आणि आपले अंतःकरण इस्राएलाचा देव परमेश्वर याकडे लावा.”
24 El pueblo respondió a Josué: “Adoraremos al Señor, nuestro Dios, y le obedeceremos”.
२४तेव्हा लोकांनी यहोशवाला म्हटले, “आमचा देव परमेश्वर याची सेवा आम्ही करू; आम्ही त्याची वाणी ऐकू.”
25 Así que Josué hizo un acuerdo solemne entre el pueblo y el Señor ese día en Siquem, obligándolos a seguir todas las leyes e instrucciones del Señor.
२५त्याच दिवशी यहोशवाने लोकांबरोबर करार केला, आणि शखेमात त्याठिकाणी नियम व कायदे स्थापले.
26 Josué lo anotó en el Libro de la Ley de Dios, y colocó una gran piedra bajo la encina, cerca del santuario del Señor.
२६तेव्हा यहोशवाने ही वाक्ये देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिली, आणि मोठी धोंड घेऊन, तेथे परमेश्वराच्या पवित्र स्थानी जे एला झाड, त्याच्याखाली ती उभी केली.
27 Josué dijo al pueblo: “Miren esta piedra. Está aquí como testigo contra nosotros, pues ha oído todo lo que el Señor nos ha dicho, y será testigo contra ustedes si alguna vez niegan lo que le han prometido a su Dios”.
२७आणि यहोशवाने सर्व लोकांस म्हटले, “पाहा, ही धोंड आमच्याविषयी साक्षीदार होईल, कारण की परमेश्वराने आपली जी सर्व वचने आमच्याजवळ सांगितली ती हिने ऐकली आहेत; तर ही तुमच्याविषयी साक्षीदार यासाठी व्हावी की तुम्ही आपल्या देवाला कधी नाकारू नये.”
28 Entonces Josué despidió al pueblo, enviándolo a sus tierras asignadas.
२८मग यहोशवाने लोकांस त्यांना त्यांच्या वतनाकडे रवाना केले.
29 Más tarde, después de todo esto, Josué, hijo de Nun, siervo del Señor, murió a la edad de ciento diez años.
२९मग या गोष्टी झाल्यावर असे झाले की नूनाचा पुत्र परमेश्वराचा सेवक यहोशवा एकशेदहा वर्षांचा होऊन मेला.
30 Lo enterraron en Timnat-serah, en la región montañosa de Efraín, al norte del monte Gaas, la tierra que le había sido asignada.
३०मग त्याच्या वतनाच्या सीमेत एफ्राइमाच्या डोंगरवटीवर जे तिम्नाथ-सेरह आहे त्यामध्ये, गाश डोंगराच्या उत्तरेस लोकांनी त्यास पुरले.
31 Los israelitas siguieron adorando al Señor durante toda la vida de Josué y durante toda la vida de los ancianos que le sobrevivieron, los que habían visto todo lo que el Señor había hecho por Israel.
३१आणि यहोशवाच्या सर्व दिवसात, आणि जे वडील यहोशवाच्या मागे अधिक आयुष्य पावले, म्हणजे परमेश्वराने आपले जे काम इस्राएलासाठी केले होते, ते अवघे ज्यांनी पाहिले होते, त्यांच्या सर्व दिवसात इस्राएलांनी परमेश्वराची सेवा केली.
32 Los huesos de José, que los israelitas habían traído consigo desde Egipto, los enterraron en Siquem, en el pedazo de tierra que Jacob había comprado a los hijos de Jamor, el padre de Siquem, por cien piezas de plata. Esta tierra fue heredada por los hijos de José.
३२आणि शखेमात जो शेतभूमीचा भाग याकोबाने शखेमाचा बाप हमोर याच्या संतानांजवळून शंभर रुप्याच्या तुकड्यावर विकत घेतला होता, आणि जो योसेफाच्या संतानांच्या वतनाचा झाला त्यामध्ये, योसेफाची जी हाडे इस्राएली लोकांनी मिसर देशातून वर आणली होती, ती त्यांनी पुरली.
33 Eleazar, hijo de Aarón, murió y lo enterraron en Guibeá, en la región montañosa de Efraín, tierra que había sido dada a su hijo Finés.
३३आणि अहरोनाचा पुत्र एलाजार मेला, तेव्हा त्याचा पुत्र फिनहास याची टेकडी जी एफ्राइमाच्या डोंगरवटीत, त्यास दिली होती, तिजवर त्यांनी त्यास पुरले.

< Josué 24 >