< Josué 1 >

1 Tras la muerte de Moisés, el siervo del Señor, el Señor habló con Josué, el hijo de Nun, que había sido asistente de Moisés. Y le dijo:
परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मरणानंतर असे झाले की, नूनाचा पुत्र यहोशवा, मोशेचा मुख्य मदतनीस याच्याशी परमेश्वर बोलला,
2 “Mi siervo Moisés ha muerto. Así que ve y cruza el Jordán, tú y todo el pueblo, y entren en el país que yo le entrego a los israelitas.
“माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही यार्देन, ओलांडून जो देश मी इस्राएल लोकांस, देत आहे त्यामध्ये जा.
3 Como se lo prometí a Moisés, dondequiera que pongas un pie, será tierra que yo te daré,
मी मोशेला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला दिले आहे.
4 desde el desierto hasta el Líbano, y hasta el río Éufrates; toda la tierra de los hititas, y hasta la costa oeste del Mar Mediterráneo. Este será su territorio.
रान व हा लबानोन यापासून महानद, फरात नदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश, व मावळतीकडे भूमध्य सागराचा प्रदेश तुमचा होईल.
5 Nadie podrá enfrentarse a ti mientras vivas. Tal como lo hice con Moisés, estaré contigo. Nunca te dejaré y nunca te abandonaré.
तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन, मी तुला सोडून जाणार नाही. व तुला टाकणार नाही.
6 “¡Sé fuerte! ¡Sé valiente! Serás el líder del pueblo mientras habiten la tierra que le prometí a sus antepasados.
बलवान हो, धैर्य धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील.
7 Sé fuerte y muy valiente, y asegúrate de obedecer toda la ley que mi siervo Moisés te ha ordenado seguir. No te apartes de ella, ni a la derecha ni a la izquierda, para que tengas éxito en todo lo que hagas.
मात्र तू बलवान हो व धैर्य धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ, ते सोडून उजवीडावीकडे वळू नको, म्हणजे तू जाशील तिकडे यशस्वी होशील.
8 Sigue recordándole al pueblo la ley. Mediten en ella de día y de noche, para estés seguro de hacer lo que es debido. Entonces tendrás éxito y prosperarás en lo que hagas.
नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, त्या जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
9 No te olvides lo que te dije: ¡Sé fuerte! ¡Sé valiente! ¡No tengas miedo! ¡No te desanimes! Porque el Señor tu Dios está contigo dondequiera que vayas”.
मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”
10 Entonces Josué le dio una orden a los líderes del pueblo:
१०मग यहोशवाने लोकांच्या पुढाऱ्यांना अशी आज्ञा केली की,
11 “Vayan por todo el campamento y díganle al pueblo: ‘Preparen todo, porque en tres días cruzaremos el Jordán, para ir a tomar la tierra que Dios les da’”.
११“छावणीतून फिरून लोकांस अशी आज्ञा द्या की, स्वतःसाठी अन्नसामग्री तयार करा. कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला ताब्यात देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसाच्या आत तुम्हाला ही यार्देन ओलांडायची आहे.”
12 Pero a las tribus de Rubén y Gad, y a la mitad de la tribu de Manasés, Josué les dijo:
१२मग यहोशवाने रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना म्हटले,
13 “Recuerden lo que Moisés, el siervo del Señor, les ordenó hacer: ‘El Señor su Dios les está dando descanso, y les dará esta tierra’.
१३“परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हाला जी आज्ञा दिली होती तिची आठवण करा, तो तुम्हाला म्हणाला होता की, तुम्हाला विसावा मिळावा म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देत आहे.
14 Sus esposas, hijos, y su ganado se quedarán aquí en la tierra que Moisés les asignó cuando estaban al oriente del Jordán. Pero todos sus hombres armados, listos para la batalla, irán delante y cruzarán primero para ayudarles,
१४या यार्देनेच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हाला दिला आहे त्यामध्येच तुमच्या स्त्रिया, पुत्र-मुलेबाळे आणि गुरेढोरे ह्यांनी रहावे, पण तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवांपुढे नदीपलीकडे जावे आणि त्यांना मदत करावी.
15 hasta que el Señor les de descanso, como los ha dejado descansar a ustedes, y cuando hayan tomado posesión de la tierra que el Señor les entrega. Entonces podrán regresar y ocupar la tierra que Moisés les asignó al oriente del Jordán”.
१५परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना विसावा देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा ते ही ताबा घेतील, मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे, त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा.”
16 Entonces ellos le dijeron a Josué: “Haremos todo lo que nos has dicho, e iremos a donde nos envíes.
१६तेव्हा त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “जे काही करण्याची तू आम्हांला आज्ञा केली आहेस ते सर्व आम्ही करू आणि तू आम्हांला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ.
17 Te obedeceremos como obedecimos a Moisés en todo. Que el Señor Dios esté contigo como estuvo con Moisés.
१७जसे आम्ही सर्व बाबतींत मोशेचे सांगणे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू, मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो.
18 Cualquiera que se rebele contra lo que dices y no siga tus órdenes, y quienquieraque no obedezca todo lo que dices, será ejecutado. ¡Sé fuerte! Sé valiente!”
१८जो कोणी तुझ्या आज्ञेविरूद्ध बंड करेल व तुझे शब्द पाळणार नाही त्यास देहान्त शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व धैर्य धर.”

< Josué 1 >