< Oseas 8 >
1 ¡Pon trompeta en tus labios! Un águila se precipita sobre la casa del Señor porque han quebrantado mi acuerdo y se han rebelado contra mi ley.
१“मुखाला तुतारी लाव, परमेश्वराच्या, घरावर गरुड येत आहे, हे यासाठी घडत आहे कारण लोकांनी माझा करार मोडून माझ्या नियम शास्त्राच्या विरोधात बंड केले आहे.
2 Israel invoca a mi: “¡Nuestro Dios, te conocemos!”
२ते माझा धावा करतात, माझ्या देवा, आम्ही इस्राएली तुला जाणतो”
3 Pero Israel ha rechazado lo que es bueno. Un enemigo los perseguirá.
३पण इस्राएलाने जे चांगले ते नाकारले आहे, आणि शत्रू त्याचा पाठलाग करेल.
4 Nombraron reyes sin mi aprobación y eligieron príncipes sin hacérmelo saber. Elaboraron ídolos con su oro y su plata para su propia destrucción.
४त्यांनी राजे नेमले, पण माझ्या द्वारे नाही; त्यांनी राजपुत्र स्थापले आहे, पण माझे ज्ञान न घेता त्यांनी, आपले सोने व चांदी घेऊन, स्वत: साठी मूर्ती बनविल्या आहेत. त्यानेच ते नाश पावतील.
5 ¡Samaria, yo aborrezco el ídolo con figura de becerro que has hecho! ¡Mi ira arde contra ellos! ¿Hasta cuándo serán incapaces de ser buenos?
५संदेष्टा म्हणतो, हे शोमरोना तुझे वासरू त्याने नाकारले आहे, परमेश्वर म्हणतो, या लोकांविरुध्द माझा राग पेटेल, किती वेळ ते अशुद्ध राहणार?
6 Este ídolo surgió de Israel y fue hecho por un artesano. ¡No es Dios! ¡El becerro de Samaria quedará hecho pedazos!
६कारण ही मूर्ती इस्राएलातून आली, कारागिराने बनवली, ती देव नाही शोमरोनाच्या वासराचे तुकडे होतील.
7 Los que siembran viento, cosecharán tempestad. Los tallos no tienen granos, y no producirán harina. Incluso si produjera grano, los extranjeros lo devorarían.
७कारण लोक वारा पेरतात आणि वावटळीची कापणी करतात, उभ्या पिकाला कणीस नाही, ते धान्याचे पिठ उत्पन्न करणार नाही, आणि जर त्याची पूर्ण वाढ झाली तरी परके त्यास गिळून टाकतील.
8 Israel ha sido devorado. Entre las naciones son como cosa despreciable.
८इस्राएलास गिळले आहे, आता ते देशामध्ये बिन कामाची लबाडी करतात.
9 Han acudido a Asiria como un asno errante y solitario. Efarín ha contratado amantes.
९कारण ते अश्शूरास रानगाढवासारखे गेले, एफ्राईमाने आपल्यासाठी प्रियकर नेमले आहेत.
10 Aunque han contratado aliados entre las naciones, yo las reuniré. Etonces se retorcerán bajo el agobio del gran rey.
१०जरी त्यांनी देशात प्रियकर नेमले, तरी मी त्यांना आता एकत्र करीन. राजे आणि पुढारी यांच्या दबावामुळे ते कमी होतील.
11 ¡Aún cuando Efarín construyó altares para presentar ofrendas por el pecado, se volvieron altares de pecado!
११कारण एफ्राईमाने पापबलींसाठी आपल्या वेद्या वाढवल्या आहेत, पण त्या वेद्या पाप करण्याचे कारण ठरल्या आहेत.
12 Yo les escribe muchos aspectos de mi ley, pero la consideraron como si fueran extranjeros.
१२मी असंख्य वेळा माझे नियमशास्त्र त्यांच्यासाठी लिहीले, पण ते त्याकडे अनोळख्या सारखे पाहतात.
13 Vienen a presentarme sus sacrificios y se comen la carne, pero yo, el Señor, no los acepto. Ahora él recordará su maldad y los castigará por sus pecados. Ellos volverán a Egipto.
१३मला अर्पणे करावी म्हणून ते मांस देतात व खातात, पण मी परमेश्वर, ते स्वीकारत नाही. आता मी त्यांचे पाप स्मरण करून त्यांना शासन करणार, ते मिसर देशात परत जातील.
14 Israel se ha olvidado de su Hacedor y ha construido palacios. Judá ha construido ciudades fortificdas. Pero yo haré caer fuego sobre sus ciudades y consumiré sus castillos.
१४इस्राएलाला आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा विसर पडला आहे आणि त्याने महाल बांधले आहेत, यहूदाने तटबंदीची नगरे वसवली आहेत, पण मी त्याच्या शहरावर अग्नी पाठवीन, तो त्याची तटबंदी नष्ट करून टाकेल.