< Génesis 5 >
1 Este es el registro de los descendientes de Adán. Cuando Dios creó a los seres humanos, los hizo semejantes a él.
१आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.
2 Los creó varón y hembra, y los bendijo. El día que los creó, los llamó “humanos”.
२त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले.
3 Cuando Adán cumplió la edad de 130 años, tuvo un hijo semejante a él, hecho a su imagen, y le puso el nombre de Set.
३आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
4 Después del nacimiento de Set, Adán vivió 800 años más, y tuvo más hijos e hijas.
४शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
5 Y Adán vivió en total 930 años, y entonces murió.
५अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
6 Cuando Set cumplió la edad de 105 años, tuvo a Enoc.
६शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला
7 Después del nacimiento de Enoc, Set vivió 807 años más, y tuvo más hijos e hijas.
७अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
8 Enós vivió en total 912 años, y entonces murió.
८शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
9 Cuando Enós cumplió la edad de 90 años, tuvo a Cainán.
९अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला;
10 Después del Nacimiento de Cainán, Enoc vivió 815 años más y tuvo más hijos e hijas.
१०केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
11 Enoc vivió en total 905 ños y entonces murió.
११अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
12 Cuando Cainán cumplió la edad de 70 años, tuvo a Malalel.
१२केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर तो महललेलाचा पिता झाला;
13 Después del Nacimiento de Malalel, Cainán vivió 840 años más, y tuvo más hijos e hijas.
१३महललेल झाल्यावर केनान आठशेचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
14 Y Cainán vivió en total 910 años, y entonces murió.
१४केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला.
15 Cuando Malalel cumplió la edad de 65 años, tuvo a Jared.
१५महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला;
16 Y después del Nacimiento de Jared, Malalel vivió 830 años más y tuvo más hijos e hijas.
१६यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
17 Y Malalel vivió en total 895 años, y entonces murió.
१७महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
18 Cuando Jared cumplió la edad de 162 años, tuvo a Enoc.
१८यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला;
19 Después del Nacimiento de Enoc, Jared vivió 800 años más y tuvo más hijos e hijas.
१९हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
20 Y Jared vivió en total 962 años, y entonces murió.
२०यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
21 Cuando Enoc cumplió 65 años, tuvo a Matusalén.
२१हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास मथुशलह झाला;
22 Y Enoc tuvo una relación muy estrecha con Dios. Después del nacimiento de Matusalén, Enoc vivió 300 años más y tuvo más hijos e hijas.
२२मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
23 Y Enoc vivió en total 365 años.
२३हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला;
24 Pero Enoc tenía una relación tan estrecha con Dios que no murió, sino que desapareció porque Dios se lo llevó.
२४हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.
25 Cuando Matusalén cumplió la edad de 187 años, tuvo a Lamec.
२५मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला.
26 Después del Nacimiento de Lamec, Matusalén vivió 782 años más y tuvo más hijos e hijas.
२६लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
27 Y Maturalén vivió en total 969 años, y entonces murió.
२७मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.
28 Cuando Lamec cumplió 182 años, tuvo un hijo.
२८लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला.
29 Y le puso por nombre Noé, con la explicación “Él nos dará alivio del arduo trabajo que debemos hacer para cultivar la tierra que el Señor maldijo”.
२९लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.
30 Después del Nacimiento de Noé, Lamec vivió 595 años más y tuvo más hijos e hijas.
३०नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
31 Y Lamec vivió en total 777 años, y entonces murió.
३१लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला.
32 Noé vivió 500 años antes de tener a Sem, Cam y Jafet.
३२नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले.