< Éxodo 28 >
1 Haz que tu hermano Aarón venga a ti, junto con sus hijos Nadab, Abiú, Eleazar e Itamar. Ellos, de todos los israelitas, me servirán como sacerdotes.
१परमेश्वर मोशेला म्हणाला, याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे येण्यास सांग.
2 Harás que se hagan ropas sagradas para tu hermano Aarón para que se vea espléndido y digno.
२आणि गौरवासाठी व शोभेसाठी तुझा भाऊ अहरोन याच्यासाठी पवित्र वस्रे तयार कर.
3 Debes dar instrucciones a todos los obreros hábiles, a los que han recibido de mí sus habilidades, sobre cómo hacer la ropa para la dedicación de Aarón, para que pueda servirme como sacerdote.
३ही वस्रे बनवणारे कारागीर ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना अहरोनाची वस्रे तयार करण्यास सांग. त्यामुळे तो माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल.
4 Estas son las ropas que deben hacer: un pectoral, un efod, una túnica, una túnica plisada, un turbante y una faja. Estos son los vestidos sagrados que harán para tu hermano Aarón y sus hijos para que puedan servirme como sacerdote.
४तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून कारागिरांनी त्यांच्यासाठी ही पवित्र वस्त्रे ऊरपट, एफोद, झगा, चौकड्याचा अंगरखा, मंदिल व कमरबंद तयार करावीत.
5 Los trabajadores usarán hilo de oro, junto con hilo azul, púrpura y carmesí, y lino finamente hilado.
५त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड वापरून ही वस्रे तयार करावीत.
6 Harán el efod de lino finamente tejido y bordado con oro, y con hilos azules, púrpura y carmesí, hábilmente trabajado.
६सोन्याची जर व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत तसेच कातलेल्या तलम सणाचे कापड घेऊन कुशल कारागिराकडून त्यांचे एफोद तयार करून घ्यावे;
7 Dos piezas de hombro deben ser unidas a las piezas delanteras y traseras.
७एफोदाच्या दोन खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्यात, त्याची दोन टोके जोडावी.
8 La cintura del efod será una pieza hecha de la misma manera, usando hilo de oro, con hilo azul, púrpura y carmesí, y con lino finamente tejido.
८एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर कुशलतेने विणलेली एक पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड असावी; सोन्याच्या जरीची, व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सुताची व कातलेल्या तलम सणाच्या कापडाची ती असावी.
9 Escribe en dos piedras de ónice los nombres de las tribus de Israel,
९मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या पुत्रांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरावी.
10 seis nombres en una piedra, y seis en la otra, en orden de nacimiento.
१०त्यांच्या नावांपैकी सहा नावे एका रत्नावर व बाकीची सहा नावे दुसऱ्या रत्नांवर कोरावी.
11 Escribe los nombres en las dos piedras de la misma manera que un joyero graba un sello personal. Luego coloque las piedras en un adorno de oro.
११रत्नावर कोरीव काम करणारा कारागीर कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नांवर इस्राएलाच्या बारा पुत्रांची नावे कोरावीत आणि ती सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसवावीत.
12 Ata ambas piedras a las piezas del hombro del efod como recordatorio para las tribus israelitas. Aarón debe llevar sus nombres en sus dos hombros para recordar a los israelitas que los representa cuando va a la presencia del Señor.
१२ती दोन्ही रत्ने एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर लावावी. ती इस्राएल लोकांची स्मारकरत्ने होत, म्हणजे अहरोन त्यांची नावे परमेश्वरासमोर आपल्या दोन्ही खांद्यांवर स्मरणार्थ वागवील.
१३त्याचप्रमाणे सोन्याची जाळीदार कोंदणे करावीत.
14 y dos cadenas trenzadas de oro puro, y sujetar estas cadenas a los adornos.
१४पीळ घातलेल्या दोरीसारख्या शुद्ध सोन्याच्या दोन साखळ्या कराव्यात व त्या पीळ घातलेल्या साखळ्या त्या कोंदणात बसवाव्या.
15 También debe hacer un pectoral para las decisiones de la misma manera hábil que el efod, para ser usado en la determinación de la voluntad del Señor. Háganlo usando hilo de oro, con hilo azul, púrpura y carmesí, y con lino finamente tejido.
१५न्यायाचा ऊरपटही तयार कुशल कारागिराकडून तयार करावा. जसा एफोद तयार केला, तसाच तो करावा. तो सोन्याच्या जरीचा, आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा करावा;
16 Tiene que ser cuadrado cuando se pliega, midiendo alrededor de nueve pulgadas de largo y ancho.
१६तो चौरस व दुहेरी असावा; व त्याची लांबी व रुंदी प्रत्येकी एक वीत असावी.
17 Adjunta un arreglo de piedras preciosas en cuatro filas como sigue: En la primera fila cornalina, peridoto y esmeralda.
१७त्यामध्ये रत्ने खोचलेल्या चार रांगा असाव्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
18 En la segunda fila turquesa, lapislázuli y sardónice.
१८दुसऱ्या रांगेत पाचू, इंद्रनीलमणी व हिरा;
19 En la tercera fila jacinto, ágata y amatista.
१९तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;
20 En la cuarta fila topacio, berilo y jaspe. Coloca estas piedras en los adornos de oro.
२०आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात खोचावीत.
21 Cada una de las doce piedras se grabará como un sello personal con el nombre de una de las doce tribus israelitas y las representará.
२१ऊरपटावर इस्राएलाच्या प्रत्येक पुत्राच्या नावाच्या संख्येएवढी ही रत्ने असावीत. त्यांच्या संख्येइतकी बारा नावे असावीत. मुद्रा जशी कोरतात तसे बारा वंशांपैकी एकेकाचे नाव एकेका रत्नावर कोरावे.
22 Haz cordones de cadenas trenzadas de oro puro para sujetar el pectoral.
२२ऊरपटावर लावण्यासाठी दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या कराव्यात.
23 Harás dos anillos de oro y sujételos a las dos esquinas superiores del pectoral.
२३ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात; त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांना लावाव्यात;
24 Ata las dos cadenas de oro a los dos anillos de oro de las esquinas del pectoral,
२४ऊरपटाच्या टोकांना लावलेल्या या दोन कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घालाव्यात.
25 y luego ata los extremos opuestos de las dos cadenas a los adornos de oro de los hombros de la parte delantera del efod.
२५पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी टोके दोन्ही कोंदणात खोचून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या बाजूला लावाव्यात.
26 Haz dos anillos de oro más y fíjelos a las dos esquinas inferiores del pectoral, en el borde interior junto al efod.
२६सोन्याच्या आणखी दोन कड्या करून न्यायाच्या ऊरपटाच्या आतल्या दोन्ही कोपऱ्यांना एफोदाच्या बाजूला लावाव्या.
27 Haz dos anillos de oro más y póngalos en la parte inferior de las dos hombreras de la parte delantera del efod, cerca de donde se une a su cintura tejida.
२७सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या खांदपट्ट्याखालील एफोदाच्या समोर त्याच्या जोडाजवळील पट्टीवर लावाव्या.
28 Ata los anillos del pectoral a los anillos del efod con un cordón de hilo azul, para que el pectoral no se suelte del efod.
२८त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या फितीने बांधाव्या, ह्याप्रमाणे तो कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर राहील, आणि ऊरपट एफोदावरून घसरणार नाही.
29 Así, cada vez que Aarón entre en el Lugar Santo, llevará los nombres de las tribus israelitas sobre su corazón en el pectoral, como un recordatorio constante ante el Señor.
२९अहरोन पवित्रस्थानात प्रवेश करील तेव्हा त्याच्या ऊरपटावर म्हणजे आपल्या हृदयावर त्याने इस्राएलाच्या मुलांची नावे कोरलेली असतील, त्यामुळे परमेश्वरास इस्राएलाच्या बारा पुत्रांची सतत आठवण राहील.
30 Coloca el Urim y Tumim en el pectoral de la decisión, para que ellos también estén sobre el corazón de Aarón siempre que venga a la presencia del Señor. Aarón llevará continuamente los medios de decisión sobre su corazón ante el Señor.
३०ऊरपटात तू उरीम व थुम्मीम ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असतील. त्यामुळे इस्राएल लोकांचा न्याय करण्याचा मार्ग तो नेहमी आपल्या हृदयावर घेऊन जाईल.
31 Haz la túnica que va con el efod exclusivamente de tela azul,
३१एफोदाबरोबर घालावयाचा झगा संपूर्ण निळ्या रंगाचा करावा;
32 con una abertura en el medio en la parte superior. Cose un cuello tejido alrededor de la abertura para fortalecerla y que no se rompa.
३२त्याच्या मध्यभागी डोके घालण्यासाठी एक भोक असावे आणि त्याच्या भोवती कापडाचा गोट शिवावा म्हणजे झग्याचा तो भाग फाटणार नाही.
33 Haz las granadas con los hilos azul, púrpura y carmesí y pégalas alrededor de su dobladillo, con campanas de oro entre ellas,
३३निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडाची डाळिंबे काढून ती त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती लावावीत आणि दोन डाळिंबाच्या मधील जागेत सोन्याची घुंगरे लावावीत;
34 teniendo las campanas de oro y las granadas alternadas.
३४त्यामुळे झग्याच्या घेराच्या खालच्या बाजूला एक डाळिंब व एक घुंगरू अशी क्रमवार ती असावीत.
35 Aarón debe llevar la túnica siempre que sirva, y el sonido que haga se oirá cuando entre o salga del santuario al entrar en la presencia del Señor, para que no muera.
३५सेवा करताना अहरोनाने हा झगा घालावा; जेव्हा जेव्हा तो पवित्रस्थानात परमेश्वरासमोर जाईल किंवा तेथून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा त्या घुंगरांचा आवाज ऐकू येईल; त्यामुळे तो मरावयाचा नाही.
36 Haz una placa de oro puro y grabad en ella como un sello, “Consagradoal Señor”.
३६शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात तशी तिच्यावर परमेश्वरासाठी पवित्र ही अक्षरे कोरावीत.
37 Pónganlo en la parte delantera del turbante con un cordón azul.
३७ही सोन्याची पट्टी अहरोनाच्या मंदिलाला समोरील बाजूस निळ्या फितीने बांधावी;
38 Aarón lo llevará en la frente, para que se responsabilice de la culpa de las ofrendas que hagan los israelitas, y esto se aplica a todas sus santas ofrendas. Debe permanecer siempre en su frente para que el pueblo sea aceptado en la presencia del Señor.
३८ती अहरोनाच्या कपाळावर सतत असावी. ह्यासाठी की ज्या गोष्टी इस्राएल लोक परमेश्वरास पवित्र अर्पण करतील म्हणजे ज्या पवित्र भेटी त्यासंबंधीचा दोष अहरोनाने वाहावा; त्यामुळे ती दाने परमेश्वरास मान्य ठरतील.
39 Teje la túnica con lino finamente hilado y haz el turbante del mismo material, y también haz la faja y con bordado.
३९चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा करावा व एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.
40 Haz túnicas, fajas y tocados para los hijos de Aarón, para que tengan un aspecto espléndido y digno.
४०अहरोनाच्या पुत्रांसाठीही अंगरखे, कमरबंद व फेटे करावेत; ही वस्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावी.
41 Haz que tu hermano Aarón y sus hijos vistan esta ropa y luego úngelos y ordénalos. Dedícalos para que puedan servirme como sacerdotes.
४१तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या पुत्रांना ही वस्रे घालून, त्यांना अभिषेक करावा व त्यांच्यावर संस्कार करावा आणि त्यांना पवित्र कर म्हणजे मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील.
42 Elabora calzoncillos de lino para cubrir sus cuerpos desnudos, desde la cintura hasta el muslo.
४२“त्यांच्यासाठी सणाच्या कापडाचे चोळणे कर म्हणजे कमरेपासून मांडीपर्यंत त्यांचे अंग झाकलेले राहील.
43 Aarón y sus hijos deben usarlos cuando entren a el Tabernáculo de Reunión o cuando se acerquen al altar para servir en el Lugar Santo, para que no seanhallados culpables y mueran. Esta es una ley para Aarón y sus descendientes para siempre.
४३आणि अहरोन व त्याचे पुत्र दर्शनमंडपामध्ये प्रवेश करतील व पवित्रस्थानात सेवा करण्यास जातील तेव्हा त्यांनी हे चोळणे घातलेले असावे; तसे न केल्यास, दोषी ठरून ते मरतील; अहरोनाला व त्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.”