< Amós 2 >
1 Esto es lo que dice el Señor: El pueblo de Moab ha pecado en repetidas ocasiones, por lo tanto no vacilaré en castigarlos, porque han profanado los huesos del rey de Edom, quemándolos y convirtiéndolos en cal.
१परमेश्वर असे म्हणतो, “मवाबाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी अदोमाच्या राजाची हाडे जाळून त्यांचा चुना केला.
2 Por eso enviaré fuego sobre Moab, y consumiré los castillos de Queriyot; y el pueblo de Moab morirá en medio de la agitación, gritos de batalla y sonido de trompeta.
२म्हणून मी मवाबावर अग्नी पाठवीन, आणि तो करोयोथचे किल्ले खाऊन टाकील. आणि मवाब गोंधळात, आरडाओरड करत आणि रणशिंगाचा आवाज होत असता मरेल.
3 Yo eliminaré a su rey y a todos sus príncipes con él, dice el Señor.
३मी तिच्यातील न्यायकरणाऱ्यांना नष्ट करीन, आणि त्याच्यातील सरदारांनाही त्याच्याबरोबर मारून टाकीन.” असे परमेश्वर म्हणतो.
4 Esto es lo que dice el Señor: El pueblo de Judá ha pecado repetidas veces y no vacilaré en castigarlos, porque han rechazado la ley del Señor y no han guardado sus mandamientos. Sus mentiras los han descarriado. Las mismas mentiras que creyeron sus antepasados.
४परमेश्वर म्हणतो, “यहूदाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी परमेश्वराचे नियमशास्त्र नकारले आहे, आणि त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांची लबाडी त्यांच्या पापाला कारणीभूत ठरली अशाच प्रकारे त्यांचे पुर्वजसुद्धा वागत होते.
5 Por eso enviaré fuego sobre Judá y consumiré los castillos de Jerusalén.
५म्हणून मी यहूदात आग लावीन. त्या आगीत यरूशलेमचे उंच मनोरे भस्मसात होतील.”
6 Esto es lo que dice el Señor: El pueblo de Israel ha pecaso muchas veces y por ello no vacilaré en castigarlos, porque vendena personas buenas por plata, y a personas pobres por un par de sandalias.
६परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएलच्या तिन्ही अपराधांमुळे, तर अगदी चारहींमुळे, मी त्यास शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी चांदीसाठी निरपराध आणि पायातील वाहाणांच्या एका जोड्यासाठी गरिबास विकले आहे.
7 Ellos pisotean las cabezas de los pobres en el polvo, y tratan a los necesitados con in justicia. Un hombre y su padre tienen relaciones sexuales con la misma criada, y profanan así mi nombre santo.
७जसे लोक माती पायाखाली तुडवतात तसेच ते गरीबांची मस्तके मातीत तुडवतात; आणि मुलांनी व त्यांच्या वडीलांनी एकाच स्त्रीशी संबंध ठेवले, अशासाठी की माझे नाव धुळीस मिळावे.
8 Se extienden sobre cualquier altar, vestidos con ropa tomada de sus deudores como pago, en el templo de su dios beben vino arrebatado de las personas a quienes multaron.
८आणि ते प्रत्येक वेदीजवळ गहाण घेतलेल्या कपड्यांवर पडतात, आणि आपल्या दैवतांच्या मंदिरात ज्याच्याकडून दंड घेतला त्यांचा द्राक्षरस पितात.
9 Sin embargo, yo exterminé a los amorreos delante de ustedes, aunque eran tan grandes como los cedros y tan fuertes como los robles. Los destruí desde la raíz y así mismo su tallo.
९मी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोऱ्यांचा नाश केला, ज्यांची उंची गंधसरूप्रमाणे उंच होती; ते अल्लोन वृक्षांप्रमाणे बळकट होते. परंतु मी त्यांच्यावरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला.
10 Yo fui quien te sacó de la tierra de Egipto y te conduje por el desierto durante cuarenta años, a fin de que pudieras conquistar el país de los amorreos.
१०तुम्हास मिसरमधून आणणारा मीच आणि चाळीस वर्षे मीच तुम्हास वाळवंटातून पार नेले ह्यासाठी की अमोरींचा प्रदेश तुम्ही काबीज करावा.
11 Designé a algunos de tus hijos como profetas, y a algunos de tus jóvenes como nazareos. ¿No es así, pueblo de Israel?
११मी तुमच्यापैकी काही मुलांना संदेष्टे होण्यासाठी आणि तुमच्यातील काही तरुणांना नाजीर होण्यास वाढवले, इस्राएल लोकांनो, हे असे नाही काय?” असे परमेश्वरा म्हणतो.
12 Pero tú has hecho pecar a los nazareos, dándoles vino para beber; y a los profetas les has dicho: “No nos hables de la palabra de Dios”.
१२“पण तुम्ही नाजीरांचे मन वळवून त्यांना मद्य प्यायला लावले, आणि संदेष्ट्यांना भविष्य सांगण्यास मनाई केली.
13 Ahora miren lo que voy a hacer: Los aplastaré justo donde están, como lo haría un carro cargado de gavillas de grano.
१३पाहा, जसा पेंढ्यांनी भरलेली गाडी एखाद्याला दाबून टाकेल, त्याच प्रकाराने मी तुम्हास दाबून टाकीन.
14 Ni siquiera los más veloces podrán escapar; y los hombres fuertes perderán su fuerza. Incluso el guerrero más fuerte podrá salvar su vida.
१४चपळ व्यक्ती सुटणार नाही; बलवान आहे त्यास आपली शक्ती लावता यायची नाही, आणि वीराला स्वत: चा जीव वाचवता येणार नाही.
15 El arquero no podrá mantenerse en pie. Ni siquiera los más rápidos podrán huir, y tampoco los que van a caballo podrán salvarse.
१५धनुर्धाऱ्याला उभे राहता येणार नाही. आणि जोरात धावणारे सुटणार नाही; घोडेस्वार आपला जीव वाचवणार नाही.
16 Ese día, hasta los guerreros más valientes huirán desnudos, dice el Señor.
१६वीरांमध्ये जो धैर्यवान तो त्या दिवशी नागवा होऊन पळून जाईल” असे परमेश्वर म्हणतो.