< Salmos 120 >
1 Cántico gradual. A Yahvé clamé en medio de mi tribulación y Él me escuchó.
१माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले.
2 Yahvé, libra mi alma del labio engañoso, de la lengua astuta.
२हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.
3 ¿Qué te dará o qué te añadirá (Yahvé), oh lengua astuta?
३हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?
4 Saetas de un potente aguzadas en ascuas de retama.
४तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.
5 ¡Ay de mí, advenedizo en Mósoc, alojado en las tiendas de Cedar!
५मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.
6 Demasiado tiempo ha habitado mi alma entre los que odian la paz.
६शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.
7 Yo soy hombre de paz; apenas hablo, y ellos mueven la guerra.
७मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.