< 1 Crónicas 25 >
1 David y los jefes del ejército separaron para el culto a los que de entre los hijos de Asaf, de Hemán y de Jedutún tenían que ejercer la música sacra con cítaras, salterios y címbalos. He aquí el número de los hombres que hacían esto en su ministerio:
१दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
2 De los hijos de Asaf: Zacur, José, Netanías y Asarela, hijos de Asaf, bajo la dirección de Asaf, que ejercía su ministerio según las órdenes del rey.
२आसाफाच्या वंशातले: जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.
3 De Jedutún: los hijos de Jedutún: Gedalías, Serí, Isaías, Hasabías, Matatías (y Simeí), seis, bajo la dirección de su padre Jedutún, que cantaba con la cítara para celebrar y alabar a Yahvé.
३यदूथूनाचे वंशज: गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे.
4 De Hemán: los hijos de Hemán: Bukías, Matanías, Uciel, Sebuel, Jerimot, Hananías, Hananí, Eliata, Gidalti, Romamtiéser, Josbecasa, Malloti, Hotir y Mahasiot.
४हेमानाचे वंशज: बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
5 Todos estos eran hijos de Hemán, vidente del rey en las cosas de Dios para ensalzar su poder. Dios había dado a Hemán catorce hijos y tres hijas.
५हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले.
6 Todos estos estaban bajo la dirección de su padre en el canto de la Casa de Yahvé, con címbalos, salterios y cítaras para cumplir su ministerio en la Casa de Dios. Asaf, Jedutún y Hemán estaban a las órdenes del rey.
६हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
7 El número de ellos, con sus hermanos, los que eran instruidos en el canto de Yahvé, todos ellos maestros, era de doscientos ochenta y ocho.
७ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
8 Echaron suertes para (determinar) sus funciones, sobre pequeños y grandes, hábiles y menos hábiles.
८त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली.
9 Salió la primera suerte de (la casa de) Asaf: para José, la segunda para Gedalías, para él, sus hermanos e hijos: doce;
९तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत: पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली; दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.
10 la tercera para Zacur, con sus hijos y hermanos: doce;
१०तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले.
11 la cuarta para Isrí, con sus hijos y hermanos: doce;
११चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले.
12 la quinta para Netanías, con sus hijos y hermanos: doce;
१२पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण.
13 la sexta para Bukías, con sus hijos y hermanos: doce;
१३सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
14 la séptima para Jesarela, con sus hijos y hermanos: doce;
१४सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
15 la octava para Isaías, con sus hijos y hermanos: doce;
१५यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून बाराजण.
16 la nona, para Matanías, con sus hijos y hermanos: doce;
१६नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण.
17 la décima para Simeí, con sus hijos y hermanos: doce;
१७दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
18 la undécima para Asarel, con sus hijos y hermanos: doce;
१८अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण.
19 la duodécima para Hasabías, con sus hijos y hermanos: doce;
१९बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण.
20 la decimotercia para Subael, con sus hijos y hermanos: doce;
२०तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
21 la decimocuarta para Matatías, con sus hijos y hermanos: doce;
२१चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
22 la decimoquinta para Jeremot, con sus hijos y hermanos: doce;
२२पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा.
23 la decimosexta para Hananías, con sus hijos y hermanos: doce;
२३सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
24 la decimoséptima para Josbecasa, con sus hijos y hermanos: doce;
२४सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
25 la decimoctava para Hananí, con sus hijos y hermanos: doce;
२५अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
26 la decimonona para Malloti, con sus hijos y hermanos: doce;
२६एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण.
27 la vigésima para Eliata, con sus hijos y hermanos: doce;
२७विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
28 la vigésimo prima para Hotir, con sus hijos y hermanos: doce;
२८एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
29 la vigesimosegunda para Gidalti, con sus hijos y hermanos: doce;
२९बावीसावी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
30 la vigesimotercera para Mahasiot, con sus hijos y hermanos: doce;
३०तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
31 la vigesimocuarta para Romamtiéser, con sus hijos y hermanos: doce.
३१चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.