< Hebrejcem 13 >
१बंधुजनांवरील प्रीती निरंतर राहो.
2 Gostoljubnosti ne zabite! Z njo so namreč nevedoma nekateri sprejeli angele.
२लोकांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.
3 Spominjajte se jetnikov, kakor sojetniki; mučenih, kakor ste sami tudi v telesu.
३तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही शरीरात असल्याने जे दुःख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.
4 Čestit bodi zakon pri vseh, in postelja neoskrunjena; kurbirje pa in prešestnike bode sodil Bog.
४सर्वांनी लग्नाचा आदर करावा व अंथरूण निर्दोष असावे कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.
5 Srce nelakomno; zadovoljni s tem, kar je; kajti sam je rekel: "Ne odtegnem se ti in ne zapustim te."
५आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही”
6 Tako da zaupno govorimo: "Gospod mi je pomočnik, in ne bodem se bal, kaj mi bode storil človek."
६म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो, “देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?”
7 Spominjajte se vodnikov svojih, kateri so vam oznanjali besedo Božjo; ozirajoč se v izhod njih življenja posnemajte vero.
७ज्यांनी तुम्हास देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
8 Jezus Kristus je včeraj in danes isti in na veke. (aiōn )
८येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. (aiōn )
9 Naukom mnogoterim in tujim ne dajte se motiti; kajti dobro je, da se srce pokrepča z milostjo, ne z jedmi, od katerih niso imeli prida, kateri so se z njimi pečali.
९विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका कारण ज्यांकडून आचणाऱ्यांना लाभ नाही अशा अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.
10 Imamo oltar, s katerega jesti ne smejo, kateri služijo šatoru;
१०ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे.
11 Kajti katerih živali kri nosi višji duhovnik za grehe v svetišče, tistih trupla se sežigajo zunaj šatorišča;
११यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात.
12 Zato je tudi Jezus, da bi z lastno krvjo osvetil ljudstvo, trpel zunaj vrât.
१२म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांस पवित्र करावे यासाठी नगराच्या वेशीबाहेर मरण सोसले,
13 Zatorej izidimo k njemu zunaj Šatorišča, noseč sramoto njegovo!
१३म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ.
14 Nimamo namreč mesta tu stalnega, nego iščemo prihodnjega.
१४कारण स्थायिक असे नगर आपल्याला येथे नाही तरी भविष्यकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत.
15 Po njem torej prinašajmo vedno hvalno daritev Bogu, to je "sad ustnic" pričajočih imenu njegovemu.
१५म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.”
16 Dobrodelnosti pa in podeljevanja ne zabite; take namreč daritve so Bogu po volji.
१६आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
17 Slušajte vodnike svoje in hodite za njimi, oni namreč čujejo za duše vaše, ker bodo odgovor dajali, da to veseli storé in ne zdihujoč; kajti nekoristno vam je to.
१७आपल्या अधीकाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशोब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दुःखाने न करता आनंदाने करावे.
18 Molite za nas; kajti prepričani smo, da imamo dobro vest, ker hočemo lepo živeti v vsem.
१८आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सद्सदविवेकबुद्धी शुद्ध आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्वबाबतीत जे नेहमी बरोबर आहे तसेच सदैव वागत रहावे अशी आमची इच्छा आहे.
19 Tolikanj bolj pa vas prosim delati to, da vam bodem hitreje vrnen.
१९मी तुम्हास विनंती करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून कळकळीने प्रार्थना करा.
20 Bog pa mirú, on, ki je od mrtvih nazaj pripeljal ovác pastirja vélikega v krvi večne zaveze, (aiōnios )
२०ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकाळच्या नव्या कराराद्वारे उठवले. (aiōnios )
21 Gospoda našega Jezusa, pripravi vas v slehernem dobrem delu, da delate voljo njegovo, in delaj v vas, kar je njemu po volji, po Jezusu Kristusu, kateremu slava na vekov veke! Amen. (aiōn )
२१त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हास चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यास संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्यास सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. (aiōn )
22 Prosim pa vas, bratje, poslušajte besedo tolažbe; kajti v kratkem sem vam pisal.
२२बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंती तुम्हास करतो.
23 Vedite, da je Timotej brat oproščen, s katerim, ako skoraj pride, vas bodem videl.
२३आपला बंधू तीमथ्य हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हास भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.
24 Pozdravite vse vodnike svoje in vse svete. Pozdravljajo vas oni iz Italije.
२४तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व पवित्रजणांना सलाम सांगा, इटली येथील विश्वास ठेवणारे लोक तुम्हास सलाम सांगतात.
25 Milost z vami vsemi! Amen. Hebrejcem pisano iz Italije po Timoteji.
२५देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.