< 2 Korinčanom 4 >

1 Za to imajoč to službo, kakor smo usmiljenje dobili, ne oslabevamo.
म्हणून, आमच्यावर देवाची दया झाल्यामुळे ही सेवा आम्हास देण्यात आली आहे, म्हणून आम्ही खचत नाही.
2 Nego odrekli smo se skrivnih del sramote ter ne hodimo v zvijačah: tudi ne preobračamo besede Božje, nego z razodevanjem resnice stavimo sami sebe pred vsako vest človečjo pričo Boga.
आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सदविवेकबुद्धीला पटवितो.
3 Če je pa tudi zakrit evangelj naš, v tistih je zakrit, kteri se pogubljajo;
पण आमची सुवार्ता आच्छादली गेली असेल तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी ती आच्छादली गेली आहे.
4 V kterih je Bog tega veka oslepil pameti nevernih, da jim ne zasveti svetlost evangelja slave Kristusa, kteri je podoba Božja. (aiōn g165)
जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने या युगाच्या दुष्ट दैवताने आंधळी केलीली आहेत. (aiōn g165)
5 Kajti sami sebe ne oznanjujemo, nego Kristusa Jezusa Gospoda; a sami sebe kakor služabnike vaše za voljo Jezusa.
कारण आम्ही स्वतःची घोषणा करीत नाही पण ख्रिस्त येशू जो प्रभू आहे त्याची आम्ही घोषणा करतो आणि येशूकरता आम्ही तुमचे दास आहोत.
6 Ker Bog, kteri je rekel iz tme luči zasvetiti, sam je, kteri je zasvetil v srcih naših na svetlost poznanja slave Božje v obličji Jezusa Kristusa.
कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
7 Imamo pa ta zaklad v lončenih posodah, da bi bila preobilnost moči Božja in ne iz nas.
पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे.
8 V vsem nas stiskajo, ali nismo na tesnem; v zadregah smo, ali ne omagujemo.
आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, आम्ही गोधळलेलो आहोत पण निराश झालो नाही.
9 Preganjajo nas, ali nismo zapuščeni; pobijajo nas, ali ne ginemo.
आमचा पाठलाग केला गेला, पण त्याग केला गेला नाही, आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही.
10 Vsegdar umiranje Gospoda Jezusa na telesu s seboj nosimo, da bi se tudi življenje Jezusovo na našem telesu pokazalo.
१०आम्ही निरंतर आमच्या शरीरात येशूचे मरण घेऊन जात असतो; यासाठी की, आमच्या शरीरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे.
11 Kajti vedno se mi živi na smrt izdajemo za voljo Jezusa, da bi se tudi življenje Jezusovo pokazalo na smrtnem mesu našem.
११कारण आम्ही जे जिवंत आहोत ते येशूकरता मरणाच्या सतत स्वाधीन केले जात आहोत; म्हणजे आमच्या मरणाधीन देहात येशूचे जीवनही प्रकट व्हावे.
12 Tako smrt v nas dela, a življenje v vas.
१२म्हणून, आमच्यात मरण, पण तुमच्यात जीवन हे कार्य करते.
13 A imajoč istega duha vere poleg pisanega; "Veroval sem, za to sem govoril", tudi mi verujemo, za to tudi govorimo;
१३मी विश्वास ठेवला आणि म्हणून मी बोललो, हे पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही विश्वास ठेवला आहे आणि म्हणून बोलतो; कारण आमच्यात तोच विश्वासाचा आत्मा आहे.
14 Vedoč, da kteri je obudil Gospoda Jezusa, obudil bo tudi nas po Jezusu in postavil z vami.
१४कारण आम्ही हे जाणतो की, प्रभू येशूला ज्याने उठवले तो आपल्यालाही येशूबरोबर उठवील आणि आम्हास तुमच्याबरोबरच सादर करील.
15 Kajti vse je za voljo vas, da bi milost pomnožena po mnogih zahvalo poobilšala na slavo Božjo.
१५सर्व गोष्टी तुमच्याकरता आहेत, म्हणजे ही विपुल कृपा पुष्कळ जणांच्या उपकारस्मरणाने, देवाच्या गौरवार्थ बहुगुणित व्हावी.
16 Za to ne pešamo; ali če se tudi zunanji naš človek pokončuje, pa se notranji obnavlja od dne do dne.
१६म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे.
17 Kajti sedanja lahka stiska naša spravlja nam obilno, preobilno večno vse pretežno slavo, (aiōnios g166)
१७कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते. (aiōnios g166)
18 Ker ne gledamo nato, kar se vidi, nego na to, kar se ne vidi; kajti to, kar se vidi, začasno je, ali kar se ne vidi, večno je. (aiōnios g166)
१८आता आम्ही दिसणार्‍या गोष्टींकडे पाहत नाही पण न दिसणार्‍या गोष्टींकडे पाहतो कारण दिसणार्‍या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्‍या गोष्टी सार्वकालिक आहेत. (aiōnios g166)

< 2 Korinčanom 4 >