< 1 Tesaloničanom 4 >

1 V ostalem pa, bratje, prosimo vas in opominjamo v Gospodu Jezusu, da, kakor ste prejeli od nas, kako vam je živeti in Bogu ugajati, če dalje bolj rastete v tem;
बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, कोणत्या वागणूकीने देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा, त्यामध्ये तुमची अधिकाधिक वाढ व्हावी.
2 Kajti veste, kake nauke smo vam dali po Gospodu Jezusu.
कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत.
3 To namreč je volja Božja, posvečenje vaše, da se zdržujete kurbarije;
कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दूर रहावे
4 Da vé vsak izmed vas posodo svojo pridobiti si v posvečenji in časti;
आणि तुमच्यातील प्रत्येकाला समजावे की, ज्याने त्याने आपल्या देहाला पवित्रतेने व आदरबुद्धीने आपल्या स्वाधीन कसे करून घ्यावे.
5 Ne v poželenja strasti, kakor tudi pogani ne poznajoči Boga;
देवाला न ओळखऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे वासनेच्या लोभाने करू नये.
6 Da ne prestopate in ne prekanjate brata svojega v stvari; ker Gospod je kaznovatelj vsega tega, kakor smo vam tudi naprej povedali in pričali.
कोणी या गोष्टींचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये कारण प्रभू या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे; हे आम्ही तुम्हास आधीच सांगितले होते व बजावलेही होते.
7 Kajti Bog nas ni poklical za nečistost, nego v posvečenje.
कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रेतेसाठी पाचारण केले आहे.
8 Zatorej kdor zameta, ne zameta človeka, nego Boga, njega, ki je tudi dal Duha svojega svetega med nas.
म्हणून जो कोणी नाकार करतो तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा नाकार करतो.
9 Za bratoljubje pa ni treba vam pisati; kajti sami ste od Boga učeni, ljubiti se med seboj;
बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हास देवानेच शिकविले आहे;
10 Saj tudi ravnate tako z vsemi brati po vsej Macedoniji. Opominjamo pa vas, bratje, da vedno bolj rastete,
१०आणि अखिल मासेदोनियांतील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, ती अधिकाधिक करावी.
11 In da si prizadevate mirno živeti, in opravljate svoje, in delate sè svojimi rokami, kakor smo vam naročili;
११आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे शांतीने राहा. आपआपला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची आवड तुम्हास असावी.
12 Da živite spodobno pred njimi, ki so zunaj, in ne potrebujete nikogar.
१२बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये.
13 Nočem pa, da bi ne vedeli, bratje, za pokojne, da se ne žalite, kakor tudi drugi, ki nimajo upanja.
१३पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे मरण पावलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये.
14 Kajti če verujemo, da je Jezus umrl in vstal, tako bode tudi Bog pokojne po Kristusu peljal z njim.
१४कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो, तर येशूमध्ये जे मरतात त्यांनाही देव त्याच्याबरोबर आणील.
15 To namreč vam pravimo v besedi Gospodovi, da mi živeči, ostali za prihod Gospodov, ne bodemo prehiteli pokojnih;
१५कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हास हे सांगतो की, आपण जे जिवंत आहोत व जे प्रभूच्या येण्यापर्यंत मागे राहू, ते आपण तोपर्यंत मरण पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही.
16 Ker Gospod sam bode v zapovedi, v glasu nadangelovem in v trombi Božji stopil dol z nebes, in mrtvi v Kristusu bodo vstali najprej.
१६कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील.
17 Potem bodemo mi živeči, ostali, z njimi vred zgrabljeni v oblakih Gospodu naproti kvišku, in tako bodemo vedno z Gospodom.
१७मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.
18 Zato se opominjajte s temi besedami med seboj.
१८म्हणून तुम्ही या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.

< 1 Tesaloničanom 4 >