< Psalmi 20 >

1 Gospod te sliši na dan stiske, ime Jakobovega Boga te brani,
मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो, याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.
2 pošlje ti pomoč iz svetišča in te okrepi s Siona,
देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो.
3 spominja se vseh tvojih daritev in sprejema tvojo žgalno daritev. (Sela)
तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.
4 Usliši te glede na tvoje lastno srce in izpolni vso tvojo namero.
तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो, आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो.
5 Veselili se bomo v tvoji rešitvi duše in svoje prapore bomo postavili v imenu svojega Boga. Gospod izpolnjuje vse tvoje prošnje.
तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू. आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू. परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो.
6 Sedaj vem, da Gospod rešuje svojega maziljenca; iz svojih svetih nebes ga bo uslišal z rešujočo močjo svoje desnice.
परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे. त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने, तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्यास उत्तर देईल.
7 Nekateri zaupajo v bojne vozove, nekateri pa v konje, toda mi se bomo spominjali imena Gospoda, svojega Boga.
काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर, परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू.
8 Oni so ponižani in padli, toda mi vstanemo in stojimo pokončno.
ते खाली आणले गेले आणि पडले, परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू!
9 Reši, Gospod. Naj nas sliši kralj, ko kličemo.
हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो.

< Psalmi 20 >