< 4 Mojzes 8 >
1 Gospod je spregovoril Mojzesu, rekoč:
१परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2 »Govori Aronu in mu reci: ›Ko prižigaš svetilke, bo sedem svetilk dajalo svetlobo nasproti svečniku.‹«
२“अहरोनाशी बोल. त्यास सांग, जेव्हा तू दिवे लावतोस तेव्हा त्या सात दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्यासमोर पडावा.”
3 Aron je storil tako. Prižgal je svetilke nasproti svečniku, kakor je Gospod zapovedal Mojzesu.
३अहरोनाने तसे केले. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्याने दीपस्तंभावरील दिव्यांचा उजेड समोर पडावा म्हणून दिवे लावले.
4 To delo svečnika je bilo iz kovanega zlata, njegovo telo, do njegovih cvetov, je bilo kovano delo, glede na vzorec, ki ga je Gospod pokazal Mojzesu, tako je naredil svečnik.
४दीपस्तंभ याप्रमाणे बनवलेला होताः परमेश्वराने मोशेला दीपस्तंभाच्या तळापासून त्याच्या कळ्यापर्यंत दाखविल्याप्रमाणे त्याने तो घडीव सोन्याचा घडविला.
5 Gospod je spregovoril Mojzesu, rekoč:
५पुन्हा, परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
6 »Vzemi Lévijevce izmed Izraelovih otrok in jih očisti.
६लेवींना इस्राएल लोकांमधून घे व त्यांना शुद्ध कर.
7 Tako jim boš storil, da jih očistiš: nanje poškropi vodo očiščevanja in naj obrijejo vse svoje meso in naj si operejo oblačila in se tako očistijo.
७त्यांना शुद्ध करण्यासाठी हे करः पापक्षालनाचे पाणी घेऊन त्यांच्यावर शिंपड. त्या प्रत्येकाने आपल्या पूर्ण शरीरावर वस्तरा फिरवावा आणि आपले कपडे धुवावे आणि त्यामुळे स्वतःला शुद्ध करावे.
8 Potem naj vzamejo mladega bikca z njegovo jedilno daritvijo, torej fino moko, umešano z oljem in še enega mladega bikca boš vzel za daritev za greh.
८मग त्यांनी एक गोऱ्हा घ्यावा आणि तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण घ्यावे. त्यांनी पापार्पणासाठी दुसरा एक गोऱ्हा घ्यावा.
9 Lévijevce boš privedel pred šotorsko svetišče skupnosti in skupaj boš zbral celoten zbor Izraelovih otrok.
९लेवींना दर्शनमंडपासमोर सादर कर व इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला एकत्र जमव.
10 Lévijevce boš privedel pred Gospoda in Izraelovi otroci bodo svoje roke položili na Lévijevce.
१०लेवींना परमेश्वरासमोर सादर कर. तेव्हा इस्राएल लोकांनी लेवींच्या डोक्यावर आपले हात ठेवावे.
11 Aron bo daroval Lévijevce pred Gospodom za daritev Izraelovih otrok, da bodo lahko opravljali Gospodovo službo.
११अहरोनाने लेव्यांना इस्राएल लोकांच्यावतीने माझी सेवा करण्यास सादर करावे. लेव्यांनी माझी सेवा करावी यासाठी त्याने हे करावे.
12 Lévijevci bodo svoje roke položili na glave bikcev in enega boš daroval za daritev za greh, drugega pa za žgalno daritev Gospodu, da opraviš spravo za Lévijevce.
१२लेवींनी आपले हात बैलाच्या डोक्यावर ठेवावे. लेव्यांच्या प्रायश्चितासाठी एक बैल पापार्पण व दुसरा बैल माझ्या होमार्पणासाठी अर्पावा.
13 Lévijevce boš postavil pred Arona in pred njegove sinove in jih daroval za daritev Gospodu.
१३लेवींना अहरोन व त्याचे पुत्र ह्यांच्या समोर सादर कर आणि माझ्यासाठी त्यांना अर्पणाप्रमाणे उंच करावे.
14 Tako boš Lévijevce oddvojil izmed Izraelovih otrok in Lévijevci bodo moji.
१४याप्रकारे तुम्ही लेव्यांपासून इस्राएल लोकांना वेगळे करा. लेवी माझेच होतील.
15 Potem bodo Lévijevci vstopili, da opravljajo službo šotorskega svetišča skupnosti in ti jih boš očistil in jih daroval kot dar.
१५तू त्यांना शुद्ध कर. तू त्यांना अर्पणाप्रमाणे माझ्यापर्यंत त्यांना उंच कर. यानंतर त्यांनी दर्शनमंडपामध्ये जाऊन सेवा करावी.
16 Kajti oni so v celoti dani meni izmed Izraelovih otrok namesto tistega, ki odpre vsako maternico, celo namesto prvorojenca izmed vseh Izraelovih otrok sem jih vzel k sebi.
१६हे करा, कारण इस्राएल लोकांमधून ते पूर्णपणे माझे आहेत. इस्राएल वंशातील गर्भाशयातून निघणारे प्रत्येक प्रथम पुरुष मूलाची ते जागा घेतील. मी लेवींना आपल्या स्वतःसाठी घेतले आहे.
17 Kajti vsi prvorojenci izmed Izraelovih otrok so moji, tako človek in žival. Na dan, ko sem udaril vsakega prvorojenca v egiptovski deželi, sem jih posvetil zase.
१७इस्राएल लोकांतले, मनुष्यापैकी आणि पशूपैकी या दोन्हीमधील सर्व प्रथम जन्मलेले माझे आहेत. मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेली मुले व पशू मी मारले त्यादिवशी मी त्यांना आपल्याकरता पवित्र केले.
18 Lévijevce sem vzel za vse prvorojence izmed Izraelovih otrok.
१८मी इस्राएल लोकातील सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवींना घेतले आहे.
19 Izmed Izraelovih otrok sem dal Lévijevce kakor darilo Aronu in njegovim otrokom, da opravljajo službo Izraelovih otrok v šotorskem svetišču skupnosti in da opravijo spravo za Izraelove otroke, da tam ne bo nadloge med Izraelovimi otroki, ko se Izraelovi otroci približajo svetišču.«
१९अहरोन व त्याच्या मुलांना मी लेवींना दान म्हणून दिले आहेत. दर्शनमंडपामध्ये सर्व इस्राएल लोकांचे काम करण्यासाठी मी त्यांना घेतले आहे. जेव्हा लोक पवित्रस्थानाजवळ येतील तर त्यांनी मरीने नाश होऊ नये म्हणून इस्राएल लोकांसाठी प्रायाश्चिताची अर्पणे करावी.
20 Mojzes, Aron in vsa skupnost Izraelovih otrok so Lévijevcem storili glede na vse, kar je Gospod zapovedal Mojzesu glede Lévijevcev, tako so jim Izraelovi otroci storili.
२०तेव्हा मोशे, अहरोन आणि सर्व इस्राएल लोकांची मंडळी ह्यांनी ह्याप्रकारे लेव्यांना केले. परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे सर्व काही केले. इस्राएलाच्या लोकांनी त्याच्याबरोबर हे केले.
21 Lévijevci so bili očiščeni in oprali so svoja oblačila in Aron jih je daroval kakor daritev pred Gospodom in Aron je zanje opravil spravo, da jih očisti.
२१लेव्यांनी आपले कपडे धुऊन स्वतःला पापापासून शुद्ध केले. तेव्हा अहरोनाने त्यांना अर्पणाप्रमाणे परमेश्वरास सादर केले आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले.
22 Potem so Lévijevci vstopili, da opravljajo svojo službo v šotorskem svetišču skupnosti pred Aronom in pred njegovimi sinovi. Kakor je Gospod zapovedal Mojzesu glede Lévijevcev, tako so jim storili.
२२त्यानंतर, लेवी दर्शनमंडपामध्ये अहरोनापुढे व त्याच्या मुलांपुढे आपली नेमलेली सेवा करण्यास आत गेले. परमेश्वराने मोशेला लेव्याबद्दल आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्यांनी सर्व लेव्यांना ह्याप्रकारे वागवले.
23 Gospod je spregovoril Mojzesu, rekoč:
२३पुन्हा, परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला,
24 »To je to, kar pripada Lévijevcem: od petindvajset let stari in starejši bodo vstopili, da čakajo na službo šotorskega svetišča skupnosti,
२४जे लेवी पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत त्या सर्वासाठी हे आहे. त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करण्यास मंडळात भाग घ्यावा.
25 in od starosti petdesetih let bodo prenehali čakati na njegovo služenje in ne bodo več služili,
२५त्यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षांपासून सेवेत याप्रकारे थांबावे. नंतर त्यांनी थांबावे.
26 temveč bodo služili s svojimi brati v šotorskem svetišču skupnosti, da pazijo na zadolžitev in ne bodo opravljali služenja. Tako boš storil Lévijevcem glede njihove zadolžitve.«
२६त्यांनी दर्शनमंडपामध्ये सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी, परंतु त्यांनी अधिक सेवा करु नये. तू लेव्यांना या सर्व गोष्टीत मार्गदर्शन करावे.