< 4 Mojzes 35 >
1 Gospod je spregovoril Mojzesu na moábskih ravninah, poleg Jordana, blizu Jerihe, rekoč:
१परमेश्वर मोशेशी बोलला. हे मवाबामधील यार्देनाच्या खोऱ्यात यरीहोसमोर यार्देन नदीजवळ घडले. परमेश्वर म्हणाला,
2 »Zapovej Izraelovim otrokom, da dajo Lévijevcem dediščino njihovih posestnih mest, da prebivajo v njih. Lévijevcem boste dali tudi predmestja za mesta okoli njih.
२इस्राएल लोकांस सांग की, त्यांनी त्यांच्या वतनातील काही नगरे लेवी लोकांस द्यावी. इस्राएल लोकांनी काही नगरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकांस द्यावी.
3 Mesta bodo imeli, da prebivajo v njih, njihova predmestja pa bodo za njihovo živino, za njihove dobrine in za vse njihove živali.
३लेवी लोक त्या नगरात राहतील आणि लेवी लोकांची कुरणे गाईबैल आणि शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांसाठी असावीत.
4 Predmestja mest, ki jih boste dali Lévijevcem, bodo segala od mestnega obzidja navzven, tisoč komolcev naokoli.
४आणि नगराची जी कुरणे लेव्यांना जी गायराने द्याल ती हजार हात सभोवार असावी.
5 Izmerili boste mesto od zunaj, na vzhodni strani dva tisoč komolcev, na južni strani dva tisoč komolcev, na zahodni strani dva tisoč komolcev in na severni strani dva tisoč komolcev, in mesto bo v sredi. To jim bodo predmestja mest.
५नगरांच्या तटबंदी बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दोन हजार हात दक्षिणेला, दोन हजार हात पश्चिमेला आणि दोन हजार हात उत्तर बाजूस मोजावे. नगर मध्ये असावे.
6 Med mesti, ki jih boste dali Lévijevcem, bo tam šest mest za zatočišče, ki jih boste določili za ubijalca, da bo lahko pobegnil tja. In tem boste dodali dvainštirideset mest.
६त्यापैकी सहा शहरे शरणपुरे असतील. जर एखाद्या मनुष्याने चुकून कुणाला मारले तर तो मनुष्य संरक्षणासाठी त्या शहरात जाऊ शकतो. त्या सहा शहरांखेरीज आणखी बेचाळीस नगरे तुम्ही लेवींना द्या.
7 Tako bo vseh mest, ki jih boste dali Lévijevcem, oseminštirideset mest. Te boste dali z njihovimi predmestji.
७म्हणजे तुम्ही एकूण अठ्ठेचाळीस नगरे लेवींना द्या. त्या शहरांभोवतालची जमीनही तुम्ही लेवींना द्या.
8 Mesta, ki jih boste dali, bodo od posesti Izraelovih otrok, od tistih, ki imajo mnogo, boste dali mnogo, toda od tistih, ki imajo malo, boste dali malo. Vsak bo od svojih mest Lévijevcem dal glede na njegovo dediščino, ki jo deduje.«
८इस्राएलाच्या मोठ्या कुटुंबांना वतनाचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान वतनातून कमी अशी द्यावीत. प्रत्येक वंशाने आपआपल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावी.
9 Gospod je spregovoril Mojzesu, rekoč:
९नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
10 »Govori Izraelovim otrokom in jim reci: ›Ko boste čez Jordan prešli v kánaansko deželo,
१०इस्राएलाच्या वंशाशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही लोक यार्देन नदी पार करून कनानच्या प्रदेशात जाल.
11 potem si boste določili mesta, da bodo za vas zavetna mesta, da tja lahko pobegne ubijalec, ki nenamerno ubije katerokoli osebo.
११तेव्हा तुम्ही शरणपुरे निवडा. जर एखाद्याने चुकून कुणाला ठार मारले तर तो संरक्षणासाठी त्यापैकी एखाद्या शहरात जाऊ शकतो.
12 Ta vam bodo mesta za zatočišče pred maščevalcem, da ubijalec ne umre, dokler stoji pred skupnostjo v sodbi.
१२आणि ती नगरे सूड घेणाऱ्यापासून आश्रयासाठी असावी. त्या मनुष्याचा न्याय होईपर्यंत तो तेथे सुरक्षित राहू शकतो.
13 Od teh mest, ki jih boste dali, boste šest mest imeli za zatočišče.
१३अशी सहा संरक्षक शहरे असतील.
14 Dali boste tri mesta na tej strani Jordana in tri mesta v kánaanski deželi, ki bodo zavetna mesta.
१४यापैकी तीन शहरे यार्देन नदीच्या पूर्वेला असतील आणि तीन शहरे कनानाच्या प्रदेशात यार्देन नदीच्या पश्चिमेला असतील ती तुम्ही आश्रयाची नगरे म्हणून द्या.
15 Teh šest mest bo zatočišče, tako za Izraelove otroke in za tujca in za začasnega prebivalca med njimi, da vsak, kdor nenamerno ubije katerokoli osebo, lahko pobegne tja.
१५ही शहरे इस्राएलाच्या नागरिकांसाठी, परदेशी नागारिकासाठी आणि प्रवाशांसाठी शरणपुरे असतील. यांच्यापैकी कोणीही चुकून कुणाला ठार मारले तर ते संरक्षणसाठी या शहरात जाऊ शकतात.
16 Če ga udari z železno pripravo, tako da ta umre, je morilec. Morilec bo zagotovo usmrčen.
१६जर एखादा मनुष्य कुणाला मारण्यासाठी लोखंडी शस्त्राचा उपयोग करत असेल तर त्याने मरण पावले पाहिजे.
17 Če ga udari z metom kamna, s katerim lahko umre in ta umre, je morilec. Morilec bo zagotovo usmrčen.
१७आणि जर एखाद्याने दगड घेऊन कुणाला मारले तर त्यानेसुध्दा मरण पावले पाहिजे. पण त्या दगडाचा आकार एखाद्याला मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडाएवढा असला पाहिजे.
18 Ali če ga udari z ročnim orožjem iz lesa, s katerim ta lahko umre in ta umre, je morilec. Morilec bo zagotovo usmrčen.
१८आणि जर एखादा मनुष्य कुणाला मारण्यासाठी लाकडाच्या तुकड्याचा उपयोग करीत असेल तर तो मनुष्य सुद्धा मेला पाहीजे. हा लाकडाचा तुकडा म्हणजे सामान्यतः कोणाला तरी मारण्यासाठी उपयोगात आणतात तसे लाकडाचे शस्त्र असले पाहिजे.
19 Sam krvni maščevalec naj ubije morilca. Ko ga sreča, ga bo ubil.
१९मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्यास ठार मारू शकतो.
20 Toda če ga sune iz sovraštva ali se nanj zažene s prežanjem iz zasede, da ta umre,
२०मनुष्य एखाद्याला हाताने मारून सुद्धा ठार मारू शकतो. किंवा एखाद्याला ढकलून देऊन सुद्धा ठार मारू शकतो. किंवा कोणाला काही फेकून मारून सुद्धा त्यास ठार करु शकतो.
21 ali ga v mržnji udari s svojo roko, da ta umre; kdor ga je udaril, bo zagotovo usmrčen, kajti morilec je. Krvni maščevalec naj morilca ubije, ko ga sreča.
२१जर कोणी ते हेतूपूर्वक द्वेषबुद्धीने केले असेल तर तो खुनी ठरतो. त्या मनुष्यास ठार मारलेच पाहिजे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्यास मारु शकतो.
22 Toda če ga je nenadoma sunil brez mržnje ali je brez prežanja v zasedi nanj vrgel kakršnokoli stvar
२२एखादा मनुष्य अपघाताने दुसऱ्याला मारू शकेल. मरण पावलेल्या मनुष्याचा त्याने द्वेष केला नाही त्यास त्याने चुकून मारले असेल. किंवा त्याने एखादी वस्तू चुकून फेकली असेल आणि ती चुकून एखाद्याला लागून तो मेला तर त्याने ते विचारपूर्वक केले असे नाही.
23 ali s kakršnimkoli kamnom, s katerim lahko človek umre, pa ga ni videl in ga je vrgel nanj, da umre in ni bil njegov sovražnik niti ni iskal njegove škode,
२३किंवा एखाद्या मनुष्याने दगड फेकला आणि तो त्यास न दिसलेल्या मनुष्यास लागला व तो मेला तर त्या मनुष्याने योजनापूर्वक मारले असे नाही. तो मनुष्य मरण पावलेल्या मनुष्याचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला.
24 potem bo glede teh sodb skupnost sodila med ubijalcem in krvnim maščevalcem
२४जर असे घडले तर काय करायचे ते लोकांनी ठरवायचे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील एखादा मनुष्य त्यास मारु शकतो की नाही ते लोक न्यायालयाने ठरवायचे.
25 in skupnost bo ubijalca osvobodila iz roke krvnega maščevalca in skupnost ga bo vrnila v mesto njegovega zatočišča, kamor je pobegnil in ta bo ostal v njem do smrti vélikega duhovnika, ki je bil maziljen s svetim oljem.
२५जर लोकांनी खुन्याचे त्या कुटुंबापासून रक्षण कराचये असे ठरवले तर लोकांनी खुन्याला संरक्षक शहरात परत न्यावे आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरत नाही तोपर्यंत खुन्याने तिथेच रहावे.
26 Toda če bo ubijalec kadarkoli prišel izven meje mesta svojega zatočišča, kamor je pobegnil
२६त्या मनुष्याने संरक्षक शहराच्या बाहेर जायचे नाही. जर त्याने त्या सीमा ओलांडल्या
27 in ga krvni maščevalec najde zunaj meje mesta njegovega zatočišča in krvni maščevalec ubije ubijalca, ne bo kriv krvi,
२७आणि आश्रयाच्या नगराच्या सीमेबाहेर मृत मनुष्याच्या कुटुंबाने त्यास पकडले आणि मारले तर त्या कुटुंबातील तो मनुष्य खुनाचा अपराधी ठरणार नाही.
28 ker bi do smrti vélikega duhovnika moral ostati v mestu svojega zatočišča. Toda po smrti vélikega duhovnika se bo ubijalec lahko vrnil v deželo svoje posesti.
२८एखाद्या मनुष्याने चुकून कोणाला मारले असेल तर त्याने मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिले पाहिजे. मुख्य याजक मेल्यानंतर तो मनुष्य त्याच्या स्वत: च्या प्रदेशात जाऊ शकतो.
29 Torej te stvari vam bodo za zakon sodbe skozi vaše rodove v vseh vaših prebivališčih.
२९तुम्हा लोकांच्या सर्व शहरांमध्ये हाच नियम सदैव लागू राहील.
30 Kdorkoli ubije katerokoli osebo, bo morilec usmrčen po ustih prič. Toda ena priča ne bo pričevala zoper katerokoli osebo, da bi ji povzročila, da ta umre.
३०मारणाऱ्याला मरणाची शिक्षा जर साक्षीदार असेल तरच दिली जाईल. जर एकच साक्षीदार असेल तर कोणालाही मरणाची शिक्षा दिली जाणार नाही.
31 Poleg tega ne boste sprejeli nobene odkupnine za življenje morilca, ki je kriv smrti, temveč bo ta zagotovo usmrčen.
३१जर एखाद्या मनुष्यावर खुनाचा दोष असेल तर त्यास मारलेच पाहिजे. पैसे घेऊन त्याची शिक्षा बदलू नका, त्या खुन्याला आवश्य जीवे मारावे.
32 Nobene odkupnine ne boste jemali za tistega, ki je pobegnil k mestu svojega zatočišča, da bi ta lahko ponovno prišel, da prebiva v deželi, do smrti duhovnika.
३२जर एखाद्याने कुणाला मारले आणि तो संरक्षक शहरात पळून गेला तर घरी जाण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊ नका. मुख्य याजक मरेपर्यंत त्याने शरणापुरातच राहिले पाहिजे.
33 Tako ne boste oskrunili dežele, v kateri ste, kajti kri omadežuje deželo in dežela ne more biti očiščena krvi, ki je v njej prelita, razen po krvi tistega, ki jo je prelil.
३३ज्या देशात तुम्ही रहाल तो भ्रष्ट करू नका. कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित होऊ शकत नाही.
34 Ne omadežujte torej dežele, ki jo boste poselili, v kateri prebivam, kajti jaz, Gospod, prebivam med Izraelovimi otroki.‹«
३४मी परमेश्वर आहे. मी तुमच्या देशात इस्राएल लोकांबरोबर राहीन. मी तिथे राहणार आहे. म्हणून ती जागा निष्पाप लोकांच्या रक्ताने अशुद्ध करु नका.