< Ezra 6 >

1 Potem je kralj Darej izdal odlok in narejena je bila preiskava v hiši zvitkov, kjer so bili v Babilonu shranjeni zakladi.
तेव्हा राजा दारयावेशाने बाबेलच्या ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेण्याचा आदेश दिला.
2 In tam pri Ahmeti, v palači, ki je v provinci Medijcev, je bil najden zvitek in v njem je bil tako zapisan zapis:
मेदी प्रांतातील अखमथा राजवाड्यात एक गुंडाळी सापडली. तिच्यावर लिहिले होते.
3 ›V prvem letu kralja Kira je isti kralj Kir izdal odlok glede Božje hiše v Jeruzalemu: ›Naj bo hiša zgrajena, kraj, kjer so darovali daritve in naj bodo njeni temelji trdno položeni. Njena višina [naj bo] šestdeset in njena širina šestdeset komolcev,
“कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरूशलेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की, जेथे यज्ञ अर्पण करीत त्याठिकाणी देवाचे मंदिर बांधावे. ‘मंदिराचा पाया बांधून काढावा. त्याच्या भिंतीची उंची साठ हात आणि रुंदी साठ हात असावी.
4 s tremi vrstami velikih kamnov in vrsto iz novih tramov in stroški naj bodo poravnani iz kraljeve hiše.
मोठ्या दगडांचे तीन थर आणि मोठ्या लाकडाचा एक थर असावा. त्याचा खर्च राजाच्या घरातून केला जावा.
5 Tudi zlate in srebrne posode Božje hiše, ki jih je Nebukadnezar vzel iz templja, ki je v Jeruzalemu in jih prenesel v Babilon, naj bodo povrnjene in ponovno prinesene v tempelj, ki je v Jeruzalemu, vsako na svoj kraj in [naj] jih prinesejo v Božjo hišo.‹
देवाच्या घरातील सोन्यारुप्याची पात्रे जी नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून काढून बाबेलला आणली आहेत ती परत करावी. ती तू यरूशलेमास पाठवावी आणि देवाच्या घरात जमा करावी.’
6 ›Sedaj torej Tatenáj, voditelj onkraj reke, Šetár Boznáj in vaši družabniki, Afarsahejci, ki so onkraj reke, bodite daleč od tam.
आता नदीपलीकडील ततनइ, शथर-बोजनइ आणि तुमचे साथीदार अधिकारी जे नदीपलीकडे आहा ते तुम्ही तेथून दूर व्हा.
7 Pustite delo te Božje hiše. Naj voditelj Judov in starešine Judov zgradijo to Božjo hišo na njenem kraju.
देवाच्या घराचे काम चालू द्या. यहूदी अधिकारी आणि यहूदी वडीलांनी हे देवाचे मंदिर त्याच्या जागी पुन्हा बांधावे.
8 Poleg tega izdajam odlok, kaj boste naredili starešinam teh Judov za zgradbo te Božje hiše, da bodo od kraljevih dobrin, celó od davka onkraj reke, nemudoma izplačani stroški tem možem, da ne bodo ovirani.
आता माझा आदेश असा आहे. देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहूदी वडीलजनांसाठी पूर्ण खर्च राजाच्या निधीतून नदीच्या पलीकडील येणाऱ्या खंडणीतून त्या मनुष्यांना देण्यासाठी वापरावा. यासाठी की, त्यांनी त्यांचे काम थांबवू नये.
9 In to, kar potrebujejo, tako mlade bikce kakor ovne in jagnjeta za žgalne daritve Bogu nebes, pšenico, sol, vino in olje, glede na določilo duhovnikov, ki so v Jeruzalemu, naj jim bo to čisto gotovo dano dan za dnem,
स्वर्गातील देवाच्या होमार्पणासाठी त्या लोकांस जे काही लागेल ते बैल, मेंढे, कोकरे आणि यरूशलेमेमधील याजकांना मागतील तितके गहू, मीठ, द्राक्षरस तेल या वस्तू त्यांना रोजच्या रोज न चुकता द्या.
10 da bodo lahko darovali žrtvovanje prijetnih vonjav Bogu nebes in molili za življenje kralja in njegovih sinov.
१०हे करा यासाठी की, त्यांनी स्वर्गातील देवाला अर्पण आणावे आणि राजासाठी, माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी.
11 Prav tako sem izdal odlok, da kdorkoli bo predrugačil to besedo, naj bo tram izvlečen dol iz njegove hiše in naj bo postavljen pokonci; naj bo tisti obešen nanj in naj bo zaradi tega njegova hiša narejena za gnojišče.
११मी तुम्हास आज्ञा करतो की, जो कोणी माझ्या आज्ञेचे उल्लंघन करील त्याच्या घराचे लाकूड काढून त्याच्यावर त्यास टांगावे. त्या अपराधामुळे त्याचे घर कचऱ्याचा ढिग करावा.
12 In Bog, ki je svojemu imenu storil, da prebiva tam, naj uniči vse kralje in ljudstvo, ki bo svojo roko položilo, da spremenijo in uničijo to Božjo hišo, ki je v Jeruzalemu. Jaz, Darej, sem zapovedal ta odlok. Naj bo hitro uresničen.‹
१२यरूशलेमेतील देवाच्या या मंदिराचा नाश करण्यास किंवा उल्लंघन करणारा जो कोणी राजा असो किंवा लोक आपले हात लावतील त्यांचा नाश जो देव तेथे राहतो तो करील. मी दारयावेश हा हुकूम करीत आहे. तो पूर्णपणे पाळावा.”
13 Potem so Tatenáj, voditelj na tej strani reke, Šetár Boznáj in njihovi družabniki tako hitro storili glede na to, kar je kralj Darej poslal.
१३नदीच्या पलीकडील अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती यांनी राजा दारयावेशाच्या आदेशाच्या प्रत्येक गोष्टीचे पालन केले.
14 Starešine Judov so gradili in uspevali po prerokovanju prerokov Ageja in Idójevega sina Zaharija. Gradili so in to končali glede na zapoved Izraelovega Boga in glede zapovedi Kira, Dareja in Artakserksa, kralja Perzije.
१४यहूद्यांचे वडील बांधणीचे काम करीत राहिले. हाग्गय हा संदेष्टा आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यामध्ये त्यांना यश आले. इस्राएलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त यांच्या आदेशानुसार यांनी मंदिर बांधून पूर्ण केले.
15 Ta hiša je bila končana na tretji dan meseca adárja, ki je bil v šestem letu kraljevanja kralja Dareja.
१५हे मंदिर राजा दारयावेशाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी अदार महिन्याच्या तृतीयेला पूर्ण झाले.
16 Izraelovi otroci, duhovniki, Lévijevci in preostanek otrok iz ujetništva, so z radostjo praznovali posvetitev te Božje hiše.
१६इस्राएल लोकांनी, याजक, लेवी, बंदिवासातून आलेले यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना आनंदाने केली.
17 Pri posvetitvi te Božje hiše so darovali sto bikcev, dvesto ovnov, štiristo jagnjet. In za daritev za greh za ves Izrael dvanajst kozlov, glede na število Izraelovih rodov.
१७प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांनी शंभर बैल, दोनशे मेंढे, चारशे कोकरे होमात अर्पण केले. तसेच इस्राएलाच्या पापार्पणासाठी बारा बकरेही अर्पण केले. इस्राएलाच्या बारा घराण्यासाठी प्रत्येकी एक असे ते होते.
18 Postavili so duhovnike v svojih oddelkih in Lévijevce po svojih skupinah za Božjo službo, ki je v Jeruzalemu, kakor je to zapisano v Mojzesovi knjigi.
१८यरूशलेममधील या मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, याजकांची आणि लेव्याची त्यांच्या-त्यांच्या वर्गानुसार योजना केली.
19 Otroci iz ujetništva so praznovali pasho na štirinajsti dan prvega meseca.
१९बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडण सण पाळला.
20 Kajti duhovniki in Lévijevci so bili skupaj posvečeni, vsi izmed njih so bili čisti in zaklali so pashalno jagnje za vse otroke iz ujetništva in za njihove brate duhovnike in zase.
२०वल्हांडण सण साजरा करण्यासाठी याजक आणि लेवी यानी एकचित्ताने स्वत: ला शुद्ध केले. कैदेतून आलेल्या सर्व लोकांसाठी व आपल्यासाठी त्यांनी वल्हांडणाचा कोकरा बली दिला.
21 Izraelovi otroci, ki so ponovno prišli iz ujetništva in vsi tisti, ki so se ločili pred umazanostjo poganov dežele, da iščejo Gospoda, Izraelovega Boga, so jedli
२१बंदिवासातून परतून आलेल्या समस्त इस्राएल लोकांनी वल्हांडणाचे भोजन केले. इस्राएलाचा देव परमेश्वर याला शोधायला जे देशातील लोकांच्या अशुद्धतेपासून दूर होऊन त्यांच्याकडे आले होते त्यांनी ते खाल्ले.
22 in z radostjo so sedem dni praznovali praznik nekvašenega kruha, kajti Gospod jih je naredil radostne in obrnil srce asirskega kralja k njim, da okrepi njihove roke v delu pri Božji hiši Izraelovega Boga.
२२बेखमीर भाकरीचा सण त्यांनी उत्साहाने सात दिवस साजरा केला. कारण देवाच्या, इस्राएलाच्या देवाच्या मंदिराच्या कामात त्यांचे हात मजबूत करायला परमेश्वराने अश्शूरच्या राजाचे मन त्यांच्याकडे फिरवून त्यांना आनंदीत केले.

< Ezra 6 >