< Ezekiel 33 >
1 Ponovno je prišla k meni Gospodova beseda, rekoč:
१मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले,
2 »Človeški sin, spregovori otrokom svojega ljudstva in jim reci: ›Ko privedem meč nad deželo, če ljudstvo dežele vzame človeka iz svojih obal in ga postavi za svojega stražarja.
२“मानवाच्या मुला, तुझ्या लोकांशी बोल त्यांना सांग की, जेव्हा मी कोणत्याही देशाविरूद्ध तलवार आणीन, तेव्हा त्या देशाचे लोक आपल्यातील एका मनुष्यास घेतात आणि त्यास आपल्यासाठी पहारेकरी करतात.
3 Če ta zatrobi na šofar in posvari ljudstvo, kadar vidi nad deželo prihajati meč;
३तो देशावर तलवार येत आहे असे पाहून आणि तो त्याचे शिंग फुंकून लोकांस सावध करतो.
4 potem kdorkoli sliši zvok šofarja in ne sprejme svarila; če pride meč in ga vzame, bo njegova kri na njegovi lastni glavi.
४जर लोकांनी शिंगाचा आवाज ऐकला पण त्याकडे लक्ष दिले नाही, आणि जर त्यांच्यावर तलवार आली व त्यांना मारले, तर प्रत्येकाचे रक्त त्यांच्या स्वतःच्या डोक्यावर राहिल.
5 Slišal je zvok šofarja in ni sprejel svarila; njegova kri bo nad njim. Toda kdor sprejme svarilo, bo rešil svojo dušo.
५जर कोणी एखाद्याने शिंगाचा आवाज ऐकला आणि लक्ष दिले नाही, त्याचे रक्त त्यावर राहिल. पण जर त्याने लक्ष दिले, तो आपला स्वतःचा जीव वाचवील.
6 Toda če stražar vidi prihajati meč, pa ne zatrobi na šofar in ljudstvo ni posvarjeno, če pride meč in vzame kateregakoli človeka izmed njih, je ta odvzet v svoji krivičnosti; toda njegovo kri bom zahteval iz stražarjeve roke.
६पण, कदाचित्, जर जसे पहारेकरी तलवार येत आहे असे पाहील, पण जर त्याने शिंग फुंकले नाही, त्याचा परीणाम लोकांस सावध केले नाही, आणि जर तलवार आली आणि कोणाचा जीव घेतला, तर तो त्याच्या पापात मरेल, पण त्याचे रक्त मी पहारेकऱ्याकडून मागून घेईन.
7 Tako sem tebe, oh človeški sin, postavil [za] stražarja Izraelovi hiši; zato boš slišal besedo pri mojih ustih in jih posvaril v mojem imenu.
७आता, मानवाच्या मुला, मी तुला इस्राएलाच्या घराण्यासाठी पहारेकरी केले आहे. तू माझ्या मुखातून वचन ऐकून आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर.
8 Ko rečem zlobnemu: ›Oh zlobni človek, zagotovo boš umrl; ‹ če ne spregovoriš, da zlobnega posvariš pred njegovo potjo, bo ta zloben človek umrl v svoji krivičnosti, toda njegovo kri bom zahteval pri tvoji roki.
८जर मी दुष्टाला म्हणतो, अरे दुष्टा तू खचित मरशील, पण जर तू दुष्टाला त्याच्या मार्गापासून फिरवण्यासाठी तू त्यास बजावून सांगण्यासाठी त्याच्याशी बोलणार नाही तर तो दुष्ट आपल्या पापत मरेल, पण त्याचे रक्त मी तुझ्यापासून मागेन.
9 Vendar če posvariš zlobnega o njegovi poti, da se odvrne od nje; če se ta ne odvrne iz svoje poti, bo umrl v svoji krivičnosti; toda ti si rešil svojo dušo.
९पण तू त्या पाप्यास सावध करून कुमार्ग सोडून सन्मार्ग धरण्यास सांगितलेस आणि त्याने ह्यास नकार दिला, तर तो मनुष्य त्याच्या पापामुळे मरेल. पण तू वाचशील.
10 Zato, oh ti, človeški sin, spregovori Izraelovi hiši: ›Tako govorite, rekoč: ›Če so naši prestopki in naši grehi nad nami in v njih hiramo, kako bi potem živeli?‹
१०म्हणून हे मानवाच्या मुला, इस्राएलाच्या घराण्याला सांग, तुम्ही म्हणता, की, आमचे अपराध व आमची पापे यांचा बोजा आम्हावर आहे व त्यामुळे त्यामध्ये आम्ही कुजत आहोत. आम्ही कसे जगावे?
11 Reci jim: › Kakor jaz živim, ‹ govori Gospod Bog, ›nobenega zadovoljstva nimam v smrti zlobnega; temveč, da se zlobni odvrne od svoje poti in živi. Obrnite se, obrnite se od svojih zlih poti; kajti zakaj hočete umreti, oh hiša Izraelova?‹
११त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे, मला ‘दुष्टांच्या मरणाने आनंद होत नाही, कारण जर दुष्टाने आपल्या मार्गापासून पश्चाताप केला, तर मग तो जिवंत राहील! पश्चाताप करा! तुमच्या दुष्ट मार्गापासून पश्चाताप करा! कारण इस्राएल घराण्यांनो, तुम्ही का मरावे?’
12 Zato ti, človeški sin, reci otrokom svojega ljudstva: ›Pravičnost pravičnega ga ne bo rešila na dan njegovega prestopka. Glede zlobnosti zlobnega, on s tem ne bo padel na dan, ko se obrne od svoje zlobnosti; niti pravični ne bo zmožen živeti po svoji pravičnosti na dan, ko greši.
१२आणि मानवाच्या मुला, तू तुझ्या लोकांस सांग, धार्मिक पाप करील तर त्याची धार्मिकता त्यास वाचविणार नाही. आणि दुष्टाने आपल्या पापाचा पश्चाताप केला तर दुष्टतेमुळे त्याचा नाश होणार नाही. कारण धार्मिक पाप करू लागला तर तो आपल्या धार्मिकतेमुळे वाचू शकणार नाही.
13 Ko bom rekel pravičnemu, da bo zagotovo živel; če ta zaupa svoji lastni pravičnosti in zagreši krivičnost, se vse njegove pravičnosti ne bo spominjalo; toda zaradi svoje krivičnosti, ki jo je zagrešil, bo zaradi nje umrl.‹
१३जर मी धार्मिकाला म्हणालो, तो खचित जिवंत राहिल! आणि जर तो आपल्या धार्मिकतेवर भाव ठेवून अन्याय करील, तर त्याची सर्व धार्मिकतेची कृत्ये मी आठवणार नाही. त्याने केलेल्या दुष्कृत्यांमुळे तो मरेल.
14 Ponovno, kadar rečem zlobnemu: ›Ti boš zagotovo umrl; ‹ če se ta obrne od svojega greha in dela to, kar je zakonito in pravilno;
१४आणि जर मी दुष्टाला म्हणालो तू खचित मरशील! पण जर त्याने त्याच्या पापापासून पश्चाताप केला आणि जे काही योग्य व न्याय्य आहे ते केले,
15 če zlobni povrne jamstvo, ponovno da, kar je naropal, se ravna po zakonih življenja, ne da bi zagrešil krivičnost; zagotovo bo živel, ne bo umrl.
१५जर दुष्ट गहाण परत देईल, व जे चोरून घेतलेले ते परत भरून देईल, जर तो अन्याय न करता जीवनाच्या नियमांमध्ये वागेल तर तो वाचेलच, तो मरणार नाही.
16 Nobeden izmed njegovih grehov, ki jih je zagrešil, mu ne bo omenjen. Storil je to, kar je zakonito in pravilno; zagotovo bo živel.‹
१६त्याने पूर्वी केलेली पापे मी स्मरणार नाही. जे योग्य व न्यायाने ते त्याने केले आहे, तो खचित जगेल.
17 Vendar otroci tvojega ljudstva pravijo: ›Gospodova pot ni enakovredna.‹ Toda kar se tiče njih, njihova pot ni enakovredna.
१७पण तुझे लोक म्हणतात, प्रभूचे मार्ग योग्य नाहीत, परंतु तुझे मार्ग योग्य नाहीत!
18 Ko se pravični obrne od svoje pravičnosti in grešno zagreši krivičnost, bo s tem torej umrl.
१८जेव्हा धार्मिक आपल्या धार्मिकतेपासून फिरून व पाप करू लागला, तर तो त्यामध्ये मरेल.
19 Toda če se zlobni odvrne od svoje zlobnosti in počne to, kar je zakonito in pravilno, bo s tem živel.
१९आणि जेव्हा दुष्ट आपल्या दुष्टतेपासून फिरून जे योग्य व न्याय्य आहे ते करतो तर तो त्या गोष्टीमुळे जगेल.
20 Vendar vi pravite: ›Gospodova pot ni enakovredna.‹ Oh vi, hiša Izraelova, vsakogar bom sodil po njegovih poteh.‹«
२०पण तुम्ही लोक म्हणता, प्रभूचा मार्ग बरोबर नाही! इस्राएलाच्या घराण्यांनो मी तुमच्या प्रत्येकाचा न्याय त्याच्या मार्गाप्रमाणे करीन.”
21 In pripetilo se je v dvanajstem letu našega ujetništva, v desetem mesecu, na peti dan meseca, da je tisti, ki je pobegnil iz [prestolnice] Jeruzalem, prišel k meni, rekoč: »Mesto je udarjeno.«
२१आमच्या बंदिवासाच्या बाराव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी असे झाले की, यरूशलेमेमधून एक फरारी माझ्याकडे आला व म्हणाला, “नगर काबीज झाले आहे.”
22 Torej Gospodova roka je bila nad menoj zvečer, prej, preden je prišel ta, ki je pobegnil. Odprl je moja usta, dokler ni oni zjutraj prišel k meni; in moja usta so bila odprta in nisem bil več nem.
२२तो फरारी संध्याकाळी येण्यापूर्वी परमेश्वराचा हात माझ्यावर होता, आणि तो सकाळी माझ्याकडे येण्याच्या वेळी परमेश्वराने त्याने माझे मुख उघडले होते. म्हणून माझे मुख उघडे होते; मी मुका राहिलो नाही.
23 Potem je prišla k meni Gospodova beseda, rekoč:
२३मग परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
24 »Človeški sin, tisti, ki poseljujejo opustošenosti dežele Izrael, govorijo, rekoč: ›Abraham je bil en in je podedoval deželo, toda nas je mnogo. Dežela nam je dana v dediščino.‹
२४“मानवाच्या मुला, जे इस्राएल देशाच्या विध्वंस झालेल्या नगरातून राहत आहेत ते बोलतात व म्हणतात, अब्राहाम फक्त एकच पुरुष होता आणि त्यास या देशाचे वतन मिळाले परंतु आम्ही तर पुष्कळ आहोत! देश आम्हास वतनासाठी दिला आहे.
25 Zato jim reci: ›Tako govori Gospod Bog: ›Vi jeste s krvjo in svoje oči povzdigujete k svojim malikom in prelivate kri; in ali boste vzeli v last deželo?
२५म्हणून तू त्यांना सांग की प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, तुम्ही रक्तासकट मांस खाता. तुम्ही आपल्या मूर्तीकडे डोळे लावता, तुम्ही लोकांचे रक्त पाडता. तर मग तुम्ही खरोखर देश वतन करून घ्याल का?
26 Stojite na svojem meču, počnete ogabnost in omadežujete, vsak ženo svojega soseda; in ali boste vzeli v last deželo?‹
२६तुम्ही तुमच्या स्वत: च्या तलवारीवर अवलंबून राहता आणि तुम्ही अमंगळ गोष्टी करता. प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीला अशुद्ध करतो, तुम्ही खरोखर देश वतन करून घ्याल का?
27 Tako jim reci: ›Tako govori Gospod Bog: › Kakor jaz živim, zagotovo bodo tisti, ki so v opustošenostih, padli pod mečem in kdor je na odprtem polju, ga bom izročil živalim, da bo požrt in tisti, ki so v utrdbah in votlinah, bodo umrli od kužne bolezni.
२७तू त्यांना हे सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी जिवंत आहे; त्या नाश झालेल्या नगरात राहणारे लोक तलवारीने खचित मारले जातील. जर एखादा शेतांत असेल, तर त्यास मी पशूचे भक्ष्य म्हणून देईन आणि जे कोणी किल्ल्यात व गुहेत आहेत ते मरीने मरतील.
28 Kajti jaz bom deželo naredil najbolj zapuščeno in pomp njene moči bo prenehal; in gore Izraelove bodo zapuščene, da nihče ne bo šel čeznje.
२८मग मी ती भूमी ओसाड व निर्जन करीन आणि त्याच्या सामर्थ्याचा गर्वाचा अंत होईल. इस्राएलचे पर्वत ओसाड होतील. तेथून कोणीही जाणारसुद्धा नाही.
29 Potem bodo vedeli, da jaz sem Gospod, ko sem deželo naredil najbolj zapuščeno zaradi vseh njihovih ogabnosti, ki so jih zagrešili.
२९म्हणून त्यांनी ज्या अमंगळ गोष्टी केल्या त्यामुळे जेव्हा मी तो देश ओसाड आणि दहशत असा करीन. तेव्हा त्यांना समजेल की, मीच परमेश्वर आहे.
30 Tudi ti, človeški sin, otroci tvojega ljudstva še vedno govorijo zoper tebe pri zidovih in v vratih hiš in drug drugemu govorijo, vsak svojemu bratu, rekoč: ›Pridi, prosim te in poslušaj, kakšna je beseda, ki prihaja od Gospoda.‹
३०आणि, मानवाच्या मुला, आता तुझ्याबद्दल तुझे लोक भिंतीला टेकून, त्यांच्या घराच्या दारांत उभे राहून, व एक दुसऱ्याशी व प्रत्येक आपल्या भावाशी बोलतो, ते म्हणतात चला, व परमेश्वराकडून संदेष्ट्याकडे आलेले वचन जाऊन ऐकू या.
31 In k tebi pridejo kakor prihajajo ljudje in sedijo pred teboj kakor moje ljudstvo in slišijo tvoje besede, toda nočejo jih izpolnjevati, kajti s svojimi usti so pokazali mnogo ljubezni, toda njihovo srce gre za njihovo pohlepnostjo.
३१म्हणून ते लोक येत असतात तसे ते तुझ्याकडे येतात. आणि ते माझ्या लोकांप्रमाणे तुझ्यापुढे बसतात तुझी वचने ऐकतात, परंतु ते ती आचरीत नाहीत. जरी ते आपल्या मुखाने फार प्रीती दाखवतात तरी त्यांचे चित्त त्यांच्या लाभाच्या मागे चालत जाते.
32 In glej, ti si jim kakor zelo očarljiva pesem nekoga, ki ima prijeten glas in lahko dobro igra na glasbilo, kajti slišijo tvoje besede, toda po njih se ne ravnajo.
३२कारण पाहा, ज्याचा स्वर गोड व तू त्यांना मनोहर गीतासारखा, तंतुवाद्यांवर मधुर आवाजात वाजवणारा, असा तू त्यांना आहे. म्हणून ते तुझे वचने ऐकतात, पण त्याप्रमाणे ते चालत नाहीत.
33 In ko se to zgodi (glej, to bo prišlo), potem bodo vedeli, da je bil med njimi prerok.‹«
३३म्हणून जेव्हा हे सर्व होईल, पाहा! हे होईल! मग त्यांना समजेल की आपल्यामध्ये एक संदेष्टा होता.”