< 2 Mojzes 17 >
1 Vsa skupnost Izraelovih otrok je odpotovala iz Sinske divjine, po njihovih potovanjih, glede na Gospodovo zapoved in utaborili so se v Refidímu. Tam pa ni bilo nobene vode, da bi ljudstvo pilo.
१सर्व इस्राएल लोकांचा समुदाय सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेला, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदिम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी मिळेना.
2 Zakaj ljudstvo se je pričkalo z Mojzesom in govorilo: »Daj nam vode, da lahko pijemo.« Mojzes pa jim je rekel: »Zakaj se pričkate z menoj? Zakaj skušate Gospoda?«
२तेव्हा इस्राएल लोक मोशेविरूद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हांला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही मजशी का भांडता? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहत आहात?”
3 Ljudstvo pa je hlepelo po vodi in ljudstvo je mrmralo zoper Mojzesa ter reklo: »Zakaj je to, da si nas izpeljal iz Egipta, da z žejo ubiješ nas, naše otroke in našo živino?«
३परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हांला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुले, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हांला तू येथे आणलेस काय?”
4 Mojzes je vpil h Gospodu, rekoč: »Kaj naj storim temu ljudstvu? Skoraj so pripravljeni, da me kamnajo.«
४तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी या लोकांस काय करू? ते तर मला दगडमार करावयास उठले आहेत.”
5 Gospod je rekel Mojzesu: »Pojdi naprej pred ljudstvom in s seboj vzemi Izraelove starešine, in svojo palico, s katero si udaril reko, vzemi v svojo roko in pojdi.
५परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडील माणसे तुजबरोबर घे. नील नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल.
6 Glej, stal bom pred teboj, tam na skali na Horebu, ti pa boš udaril skalo in iz nje bo pritekla voda, da bo ljudstvo lahko pilo.« In Mojzes je tako storil v očeh Izraelovih starešin.
६पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन, त्या खडकावर ती काठी आपट, त्यातून पाणी निघेल. म्हणजे ते हे लोक पितील,” मोशेने हे सर्व इस्राएलांच्या वडिलासमोर केले.
7 Ime kraja je imenoval Masa in Meríba, zaradi pričkanja Izraelovih otrok in ker so skušali Gospoda, rekoč: »Je Gospod med nami ali ni?«
७मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा व मरीबा ठेवले; कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी तेथे कलह केला आणि “परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही” असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली.
8 Potem je prišel Amálek in se z Izraelom bojeval v Refidímu.
८रफीदिम येथे अमालेकी लोक इस्राएल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली.
9 Mojzes je rekel Józuetu: »Izmed nas izberi može in pojdite ven in se bojujte z Amálekom. Jutri bom stal na vrhu hriba z Božjo palico v svoji roki.«
९तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, “काही लोकांस निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात घेऊन मी डोंगराच्या माथ्यावर उभा राहीन.”
10 Józue je storil tako, kakor mu je rekel Mojzes in se bojeval z Amálekom. Mojzes, Aron in Hur pa so odšli na vrh hriba.
१०यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरूद्ध लढावयास गेला, त्या वेळी मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले.
11 Pripetilo se je, ko je Mojzes držal svojo roko pokonci, da je prevladoval Izrael. Ko pa je svojo roko spustil, je prevladoval Amálek.
११जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा अमालेकी लोकांची सरशी होई.
12 Vendar pa sta bili Mojzesovi roki težki. Vzela sta kamen in ga položila pod njega in sedel je nanj. Aron in Hur pa sta opirala njegovi roki, eden na eni strani, drugi pa na drugi strani, in njegovi roki sta bili stabilni do sončnega zahoda.
१२काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशाच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर स्थिर धरून ठेवले.
13 In Józue je z ostrino meča porazil Amáleka in njegovo ljudstvo.
१३तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकी लोकांचा पराभव केला.
14 Gospod je rekel Mojzesu: »Zapiši to za spomin v knjigo in to ponovi v Józuetova ušesa, kajti jaz bom popolnoma izbrisal spomin na Amáleka izpod neba.«
१४नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “लढाई विषयीच्या या सर्व गोष्टी एका ग्रंथात लिहून ठेव आणि यहोशवाला सांग. कारण मी अमालेकी लोकांस पृथ्वीतलावरून नक्की पूर्णपणे नष्ट करीन.”
15 Mojzes je zgradil oltar in njegovo ime imenoval JAHVE–nisi,
१५मग मोशेने तेथे एक वेदी बांधून तिला “परमेश्वर माझा झेंडा” असे नाव दिले.
16 kajti rekel je: »Ker je Gospod prisegel, da bo imel Gospod vojno z Amálekom od roda do roda.«
१६आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासनावर अमालेकी लोकांनी हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यानपिढ्या युध्द होईल.”