< 2 Kroniška 4 >
1 Poleg tega je naredil oltar iz brona, dvajset komolcev dolg, dvajset komolcev širok in deset komolcev visok.
१शलमोनाने पितळेची वेदी बनवली. तीची लांबी तीस हात, रूंदी तीस हात व उंची दहा हात होती.
2 Prav tako je naredil ulito morje desetih komolcev od roba do roba, okroglo naokoli in pet komolcev je bila njegova višina in vrvica tridesetih komolcev ga je obdajala naokoli.
२त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळदेखील केले. हे गोल असून त्याचा व्यास दहा हात होता. त्याची उंची पाच हात आणि त्याचा कडेचा परीघ तीस हात होता.
3 Pod tem je bila podobnost volov, ki so ga obdajali naokoli. Deset na komolec, obdajajoč morje naokoli. Dve vrsti volov sta bili uliti, ko je bilo to ulito.
३प्रत्येकी एक हाताच्या अंतरावर या गंगाळाच्या खालच्या कडेला सर्वत्र दहा दहा बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. गंगाळ घडवतानाच एकसंध तुकड्यातून ते बनवले होते.
4 Stalo je na dvanajstih volih, trije so gledali proti severu, trije so gledali proti zahodu, trije so gledali proti jugu in trije so gledali proti vzhodu. Morje je bilo postavljeno zgoraj nad njimi in vsi njihovi zadnji deli so bili [obrnjeni] navznoter.
४बारा घडीव बैलांनी हे प्रशस्त गंगाळ तोललेले होते. तीन पुर्वभीमुख होते, तीन उत्तराभिमुख तीन पश्चिमाभिमुख, तीन दक्षिणभिमुख व गंगाळ त्यांच्यावर होते सर्व बैलांचा पार्श्व भाग आतील बाजूकडे होता.
5 Njegova debelina je bila širina dlani in njegov rob, podoben robu čaše, s cvetovi lilij in ta je sprejel in držal tri tisoč čebrov.
५या पितळी गंगाळाची जाडी हाता एवढी असून, त्याचे गोलाकार तोंड उमललेल्या कमलपुष्पासारखे होते. त्यामध्ये तीन हजार बुधले पाणी मावू शकत होते.
6 Naredil je tudi deset [okroglih] umivalnikov in pet jih je položil na levo roko, pet pa na desno, da so se umivali v njih. Takšne stvari, kot so jih darovali za žgalno daritev, so umivali v njih, toda morje je bilo, da so se v njem umivali duhovniki.
६याखेरीज शलमोनाने दहा तस्ते बनवली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला पाच अशी बसवली. होमार्पणात द्यावयाच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही दहा तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी, होते.
7 Naredil je deset svečnikov iz zlata glede na njihovo obliko in jih postavil v templju, pet na desni roki in pet na levi.
७शलमोनाने सोन्याचे दहा दिपस्तंभही त्यांच्या विधीनुसार बनविले, आणि मंदिरात डावीकडे पाच व उजवीकडे पाच असे ठेवले.
8 Naredil je tudi deset miz in jih postavil v templju, pet na desni strani in pet na levi. Naredil je sto umivalnikov iz zlata.
८तसेच दहा मेज बनवून पाच डावीकडे आणि पाच उजवीकडे अशा पद्धतीने ठेवले. शिवाय सोन्याचे शंभर वाडगे बनवले.
9 Nadalje je naredil dvor duhovnikov in velik dvor in vrata za dvor in jih prevlekel z bronom.
९याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक दालन व एक प्रशस्त दालन आणि दरवाजे केले. दालनांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले.
10 Morje je postavil na desni strani vzhodnega konca, nasproti jugu.
१०एवढे झाल्यावर आग्नेयला दिशेस मंदिराच्या उजवीकडे त्याने ते मोठे पितळी गंगाळ ठेवले.
11 Hurám je naredil lonce, lopate in umivalnike. Hurám je končal delo, ki ga je imel za opraviti za kralja Salomona za Božjo hišo:
११हिराम या कारागिराने हंडे, फावडी व शिंपडण्यासाठी वाडगे बनवले. देवाच्या मंदीराचे जे काम त्यास शलमोनासाठी करायचे होते ते त्याने पूर्ण केले.
12 namreč dva stebra in zaobljena glaviča in kapitele, ki so bili na vrhu dveh stebrov; dve mreži, da pokrijeta dva zaobljena glaviča kapitelov, ki so bili na vrhu stebrov;
१२दोन स्तंभ, स्तंभावरचे कळस, त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.
13 štiristo granatnih jabolk na dveh mrežah; dve vrsti granatnih jabolk na vsakem vencu, da pokrijeta dva zaobljena glaviča kapitelov, ki sta bila na stebrih.
१३त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबाच्या दोन ओळी होत्या. स्तंभावरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.
14 Naredil je tudi podstavke in na podstavkih je naredil [okrogle] umivalnike.
१४तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.
15 Eno morje in dvanajst volov pod njim.
१५मोठे पितळी गंगाळ आणि त्यास आधार देणारे बारा बैल हिरामनेच केले.
16 Tudi lonce, lopate, kavlje za meso in vse njihove priprave je Hirám, njegov oče, pripravil za kralja Salomona za Gospodovo hišo iz svetlega brona.
१६शलमोनासाठी हिरामाने हंडे, फावडी, मांस खाण्यासाठी काटे इत्यादी परमेश्वराच्या मंदिरातली उपकरणे केली त्यासाठी लखलखीत, उजळ पितळ वापरलेले होते.
17 Na jordanski ravnini jih je kralj ulil, v ilovnati zemlji med Sukótom in Cerédo.
१७या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकणमातीचे साचे बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधली, यार्देन खोऱ्यातली माती वापरली.
18 Tako je Salomon naredil vseh teh posod v velikem obilju, kajti teže brona niso mogli ugotoviti.
१८शलमोनाने मोठ्या प्रमाणात ही भांडी बनवीली. त्यासाठी लागलेल्या पितळाचे वजन कोणालाच समजले नाही.
19 Salomon je naredil vse te posode, ki so bile za Božjo hišo, tudi zlati oltar in mize, na katerih so bili postavljeni hlebi navzočnosti,
१९याखेरीज आणखी काही गोष्टी शलमोनाने देवाच्या मंदिरासाठी केल्या. सोन्याची वेदी, व समर्पित भाकर ठेवण्याची मेजे ही केली.
20 poleg tega svečnike s svojimi svetilkami, ki naj bi po navadi gorele pred orakljem iz čistega zlata,
२०सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते.
21 cvetove, svetilke in utrinjače, narejene iz zlata in to popolnega zlata,
२१याव्यतिरिक्त फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुद्ध सोन्याचे होते.
22 utrinjala, umivalnike, žlice in kadilnice iz čistega zlata. Vhod hiše, njegova notranja vrata za najsvetejši prostor in vrata hiše templja, so bila iz zlata.
२२कातऱ्या, वाडगी, कटोरे, चमचे, धुप जाळावयाची पात्रे शलमोनाने शुद्ध सोन्याची बनवीली त्याचप्रमाणे मंदिराची दरवाजे, अत्यंत पवित्र अशा गाभाऱ्यातली दरवाजे, आणि मुख्य दालनाचे दरवाजे हे ही सोन्याचे होते.