< 2 Kroniška 24 >
1 Joáš je bil star sedem let, ko je začel kraljevati in v Jeruzalemu je kraljeval štirideset let. Ime njegove matere je bilo Cibja iz Beeršébe.
१योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या. ही बैर-शेबा नगरातली होती.
2 Joáš je delal to, kar je bilo pravilno v Gospodovih očeh, vse dni duhovnika Jojadája.
२यहोयादा हयात असेपर्यंत योवाशाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती.
3 Jojadá je zanj vzel dve ženi in zaplodil je sinove in hčere.
३यहोयादाने योवाशाला दोन पत्नी करून दिल्या. त्यास अपत्ये झाली.
4 Za tem se je pripetilo, da je imel Joáš na srcu, da popravi Gospodovo hišo.
४पुढे योवाशाने परमेश्वराच्या मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे ठरवले.
5 Skupaj je zbral duhovnike in Lévijevce ter jim rekel: »Pojdite ven v Judova mesta in od vsega Izraela zbirajte denar za popravilo hiše svojega Boga iz leta v leto in glejte, da pohitrite zadevo. Vendar Lévijevci niso pohiteli.
५तेव्हा त्याने याजक आणि लेवी यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “यहूदामधील सर्व गावांमध्ये जा आणि इस्राएल लोकांकडून पैसे जमा करा. त्या पैशातून देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या.” या कामाला विलंब लावू नका पण लेवींनी याबाबतीत तप्तरता दाखवली नाही.
6 Kralj je dal poklicati vodja Jojadája ter mu rekel: »Zakaj nisi od Lévijevcev zahteval, da iz Juda in Jeruzalema prinašajo nabirko, glede na zapoved Mojzesa, Gospodovega služabnika in iz Izraelove skupnosti za šotorsko svetišče pričevanja?
६तेव्हा राजा योवाशाने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि विचारले की, “लेवीना तू यहूदा आणि यरूशलेमेतून कर गोळा करायला का लावले नाहीस? परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएली लोक यांनी हा कर आज्ञापटाच्या तंबूसाठी म्हणून वापरलेला आहे.”
7 Kajti sinovi te zlobne ženske Atalje so razbili Božjo hišo in tudi vse posvečene stvari Gospodove hiše so podelili Báalom.
७पूर्वी अथल्याच्या पुत्रांनी परमेश्वराच्या मंदिरात घुसून तिथल्या पवित्र वस्तू बआल दैवतांच्या पूजेसाठी वापरल्या होत्या. अथल्या ही एक दुष्ट स्त्री होती.
8 Na kraljevo zapoved so naredili zaboj in ga postavili zunaj pri velikih vratih Gospodove hiše.
८राजा योवाशाच्या आज्ञेवरुन एक पेटी तयार करून ती परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यात आली.
9 Naredili so razglas po vsem Judu in Jeruzalemu, naj prinašajo Gospodu nabirko, ki jo je Božji služabnik Mojzes naložil Izraelu v divjini.
९लेवींनी मग यहूदा व यरूशलेमेमध्ये ते जाहीर केले. परमेश्वरासाठी बसवलेला कर भरायला त्यांनी लोकांस सांगितले. इस्राएल लोक वाळवंटात असताना परमेश्वराचा सेवक मोशे याने तो इस्राएल लोकांवर बसवला होता.
10 Vsi princi in vse ljudstvo se je veselilo, prinašalo in metalo v zaboj, dokler niso končali.
१०तेव्हा अधिकाऱ्यांनी आणि लोकांनी मोठ्या आनंदाने कर आणून पेटीत जमा केला. पेटी भरेपर्यंत ते पैसे देत गेले.
11 Torej pripetilo se je, da kadar je bil zaboj po roki Lévijevcev prinesen v kraljevo pisarno in ko so videli, da je bilo v njem veliko denarja, sta prišla kraljevi pisar in častnik vélikega duhovnika ter izpraznila zaboj in ga vzela ter ga ponovno odnesla na njegov kraj. Tako so delali dan za dnem in zbrali denarja v obilju.
११पेटी भरली की लेवी राजाच्या कारभाऱ्यांकडे ती जमा करत. पैशाने भरलेली ती पेटी पाहून राजाचे सचिव आणि मुख्य याजकाचा कारभारी येऊन त्यातले पैसे काढून घेत. पेटी पुन्हा पहिल्या जागी नेऊन ठेवली जाई. असे अनेकदा होऊन मुबलक पैसा जमा झाला.
12 Kralj in Jojadá sta ga dajala tistim, ki so opravljali delo službe Gospodove hiše ter najemala zidarje in tesarje, da obnovijo Gospodovo hišo in tudi tiste, ki so kovali železo in bron, da popravijo Gospodovo hišo.
१२राजा योवाश आणि यहोयादा यांनी मग ही रक्कम परमेश्वराच्या मंदिराचे काम करणाऱ्यांच्या हवाली केली. या लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी कसबी सुतार, कोरीव काम करणारे, लोखंड, पितळ या धातूचे काम करणारे कारागीर यांना मजुरीवर कामाला घेतले.
13 Tako so delavci delali in delo dovršili in Božjo hišo so postavili v njeno stanje in jo utrdili.
१३या कामावर देखरेख करणारे लोक अतिशय विश्वासू होते. परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम पूर्ण झाले. देवाचे मंदिर पुन्हा पूर्वीसारखेच नीटनेटके आणि पहिल्यापेक्षा भक्कम झाले.
14 Ko so jo končali, so preostanek denarja prinesli pred kralja in Jojadája, s čimer so bile narejene posode za Gospodovo hišo, torej posode za služenje in da z njimi darujejo ter žlice in posode iz zlata in srebra. In nenehno so darovali žgalne daritve v Gospodovi hiši, vse Jojadájeve dni.
१४कारागिरांचे काम आटोपल्यावर उरलेली रक्कम त्यांनी योवाश आणि यहोयादा यांना आणून दिली. त्या पैशातून परमेश्वराच्या मंदिरातील सेवेची उपकरणे आणि होमबलीसाठी वापरायची पात्रे बनविण्यात आली. त्यांनी याव्यतिरिक्त सोन्यारुप्याचे कटोरे व इतर पात्रे तयार केली. या परमेश्वराच्या मंदिरात यहोयाद जिवंत असेपर्यंत याजक दररोज होमबली अर्पण करत असत.
15 Toda Jojadá se je postaral in ko je umrl, je bil izpolnjen z dnevi in ko je umrl, je bil star sto trideset let.
१५पुढे यहोयादा वयोवृध्द झाला. तो दीर्घायुषी होऊन मरण पावला. मृत्युवेळी त्याचे वय एकशेतीस वर्षे इतके होते.
16 Pokopali so ga med kralji v Davidovem mestu, ker je delal dobro v Izraelu, tako za Boga kot za svojo hišo.
१६दावीद नगरात इतर राजांच्या कबरी शेजारीच लोकांनी त्याचे दफन केले. देवासाठी आणि त्याच्या मंदिरासाठी त्याने इस्राएलमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या हयातीत केल्या म्हणून लोकांनी त्याचे याठिकाणी दफन केले.
17 Torej po smrti Jojadája so prišli Judovi princi in se globoko priklonili kralju. Potem jim je kralj prisluhnil.
१७यहोयादा मरण पावल्यावर यहूदाच्या सरदारांनी राजा योवाशाला येऊन मुजरा केला. राजाने त्याचे ऐकून घेतले.
18 Zapustili so hišo Gospoda, Boga svojih očetov in služili ašeram in malikom in zaradi tega njihovega prekrška je prišel bes nad Juda in Jeruzalem.
१८पुढे राजा आणि हे सरदार यांनी परमेश्वर देवाच्या मंदिराचा त्याग केला. त्यांचे पूर्वज या परमेश्वर देवाला शरण गेले होते पण यांनी अशेरा देवीचे खांब आणि इतर मूर्ती यांची पूजा सुरु केली. राजा आणि सरदार यांच्या या अपराधांमुळे यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांवर देवाचा कोप झाला.
19 Vendar jim je pošiljal preroke, da jih ponovno privedejo h Gospodu in ti so pričevali zoper njih, toda oni jim niso hoteli prisluhnili.
१९लोकांस परत आपल्याकडे वळवायला परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्ट्यांना पाठवले, संदेष्ट्यांनी लोकांस परमेश्वराच्या क्रोधाची पूर्वकल्पना दिली पण लोक ऐकेनात.
20 In Božji Duh je prišel nad Zeharjá, sina duhovnika Jojadája, ki je stal nad ljudstvom ter jim rekel: »Tako govori Bog: ›Zakaj prestopate Gospodove zapovedi, da ne morete uspevati? Ker ste zapustili Gospoda, je tudi on zapustil vas.‹«
२०तेव्हा जखऱ्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. जखऱ्या हा यहोयादा या याजकाचा पुत्र. जखऱ्या लोकांपुढे उभा राहून म्हणाला, देव म्हणतो, “तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन का करता? तुम्हास यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग केलात. आता परमेश्वरही तुम्हास सोडून देत आहे.”
21 Oni pa so se zarotili zoper njega in ga na kraljevo zapoved kamnali s kamni na dvoru Gospodove hiše.
२१पण लोकांनी जखऱ्याविरुध्द कट केला. राजाने लोकांस जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्यास दगडफेक करून मारले. हे त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनातच केले.
22 Tako se kralj Joáš ni spomnil prijaznosti, ki mu jo je storil njegov oče Jojadá, temveč je usmrtil njegovega sina. In ko je ta umiral, je rekel: » Gospod glej na to in to zahtevaj.«
२२जखऱ्याचे पिता यहोयादा यांनी दाखवलेले सौजन्य राजा योवाश विसरला. यहोयादाचा पुत्र जखऱ्या याला राजाने ठार केले. जखऱ्या मृत्यूपूर्वी म्हणाला, “हे पाहून परमेश्वर तुला शासन करो.”
23 Pripetilo se je ob koncu leta, da je zoper njega prišla sirska vojska. Prišli so do Juda in Jeruzalema in izmed ljudstva uničili vse prince ljudstva in ves njihov plen poslali h kralju v Damask.
२३वर्ष अखेरीला अरामाच्या सैन्याने योवाशावर हल्ला केला. यहूदा आणि यरूशलेमेवर हल्ला करून त्यांनी सर्व सरदारांची हत्या केली. तेथील सर्व धन लुटून त्यांनी ते दिमिष्काच्या राजाकडे पाठवले.
24 Kajti vojska Sircev je prišla z majhno skupino mož in Gospod je v njihovo roko izročil zelo veliko množico, ker so zapustili Gospoda, Boga svojih očetov. Tako so izvršili sodbo nad Joášem.
२४अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी यहूदाच्या मोठ्या सेनेवर परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिला. आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा यहूदा लोकांनी त्याग केल्यामुळे परमेश्वराने योवाशाला हे शासन केले.
25 Ko so odšli od njega (kajti zapustili so ga v velikih boleznih), so se njegovi lastni služabniki zarotili zoper njega zaradi krvi sinov duhovnika Jojadája in ga usmrtili na njegovi postelji in je umrl. Pokopali so ga v Davidovem mestu, toda niso ga pokopali v mavzolejih kraljev.
२५अरामी सेना योवाशाला घायाळ अवस्थेत सोडून गेले तेव्हा योवाशाच्या सेवकांनीच त्याच्याविरुध्द कट केला. यहोयादा या याजकाच्या पुत्राला, जखऱ्याला योवाशाने जीवे मारल्यामुळे ते या कारस्थानाला प्रवृत्त झाले. योवाशाला त्यांनी त्याच्या शय्येवरच ठार केले. दावीद नगरात लोकांनी त्यास मूठमाती दिली. पण राजांच्या दफन भूमीत त्याचे दफन केले नाही.
26 To sta tista [dva], ki sta se zarotila zoper njega: Zabád, sin Amónke Šimáte in Jozabád, sin Moábke Šimrite.
२६जाबाद आणि यहोजाबाद हे ते फितूर सेवक. जाबादच्या आईचे नाव शिमथ. ही अम्मोनची होती. यहोजाबादाच्या आईचे नाव शिम्रिथ. ही मवाबी होती.
27 Torej glede njegovih sinov in veličine bremen, položenih nadenj in obnove Božje hiše, glej, ta so zapisana v zgodbi knjige kraljev. In namesto njega je zakraljeval njegov sin Amacjá.
२७योवाशाचे पुत्र, त्यास दिलेली मोठी शिक्षा आणि त्याने केलेला देवाच्या मंदिराचा जीर्णोध्दार याविषयी राजांच्या बखरीत राजाविषयी लिहिले आहे. योवाशाचा पुत्र अमस्या हा त्यानंतर राजा झाला.