< 2 Kroniška 11 >
1 Ko je Rehabám prišel v Jeruzalem, je iz Judove in Benjaminove hiše zbral sto osemdeset tisoč izbranih mož, ki so bili bojevniki, da se borijo zoper Izrael, da bi kraljestvo lahko ponovno privedli k Rehabámu.
१यरूशलेमेला आल्यावर रहबामाने एक लाख ऐंशी हजार उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामीन या घराण्यांमधून त्यानेही निवड केली. इस्राएलाशी युध्द करून स्वत: कडे राज्य खेचून आणण्यासाठी त्यानेही जमवाजमव केली.
2 Toda beseda od Gospoda je prišla Božjemu možu Šemajáju, rekoč:
२पण परमेश्वराचा मनुष्य शमाया याच्याकडे परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्यास म्हणाला,
3 »Govori Rehabámu, Salomonovemu sinu, Judovemu kralju in vsemu Izraelu v Judu in Benjaminu, rekoč:
३“शमाया, यहूदाचा राजा, शलमोन पुत्र रहबाम याच्याशी तू बोल तसेच यहूदा आणि बन्यामीन इथल्या इस्राएल लोकांशीही बोल. त्यांना म्हणावे.
4 ›Tako govori Gospod: ›Ne boste šli gor niti se ne boste borili zoper svoje brate. Vsak mož naj se vrne k svoji hiši, kajti ta stvar je storjena od mene.‹« Ubogali so Gospodove besede in se vrnili pred [tem, da bi] šli zoper Jerobeáma.
४परमेश्वराचे म्हणणे असे आहे आपल्या बांधवांशी लढू नका. प्रत्येकाने घरी जावे. मीच हे सर्व व्हायला कारणीभूत आहे.” तेव्हा राजा रहबाम आणि त्याचे सैन्य यांनी परमेश्वराचा संदेश मानला आणि ते परत गेले. यराबामावर त्यांनी हल्ला केला नाही.
5 Rehabám je prebival v Jeruzalemu in gradil mesta za obrambo v Judu.
५रहबाम यरूशलेमेमध्ये राहिला. हल्ल्यांचा प्रतिकार करायला सज्ज अशी भक्कम नगरे त्याने यहूदात बाधली.
6 Zgradil je celo Bethlehem, Etám, Tekóo,
६बेथलेहेम, एटाम, तकोवा,
7 Bet Cur, Sohóm, Adulám,
७बेथ-सूर, शोखो, अदुल्लाम,
9 Adorájim, Lahíš, Azéko,
९अदोरइम, लाखीश, अजेका,
10 Coro, Ajalón in Hebrón, ki so v Judu in v Benjaminu utrjena mesta.
१०सरा, अयालोन व हेब्रोन या तटबंदी असलेल्या नगरांची डागडुजी केली. यहूदा आणि बन्यामीन मधली ही नगरे चांगली भक्कम करण्यात आली.
11 Utrdil je oporišča in vanje postavil poveljnike in zaloge živeža, olja in vina.
११किल्ले मजबूत झाल्यावर रहबामाने त्यांच्यावर नायक नेमले. अन्नसामग्री, तेल, द्राक्षरस यांचा साठा त्याने तेथे केला.
12 V vsako posamezno mesto je postavil ščite in sulice ter jih naredil silno močne, [ker je] imel Juda in Benjamin na svoji strani.
१२प्रत्येक नगरात ढाली आणि भाले यांचा पुरवठा करून गावे अधिकच मजबूत केली. यहूदा आणि बन्यामीन मधील ही नगरे आणि तेथील लोक यांना रहबामाने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले.
13 Duhovniki in Lévijevci, ki so bili po vsem Izraelu, so zahajali k njemu iz vseh svojih krajev.
१३सर्व इस्राएलामधील याजक आणि लेवी रहबामाशी सहमत होते. ते त्यास येऊन मिळाले.
14 Kajti Lévijevci so zapustili svoja predmestja in svojo lastnino ter prišli k Judu in Jeruzalemu, kajti Jerobeám in njegovi sinovi so jih zavrgli pred izvrševanjem duhovniške službe Gospodu.
१४लेवींनी आपली शेती आणि मालमत्ता सोडली आणि ते यहूदा व यरूशलेम येथे आले. परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करायला यराबाम आणि त्याचे पुत्र यांनी लेवींना हाकलून लावले म्हणून ते आले.
15 Odredil si je duhovnike za visoke kraje, za hudiče in za teleti, ki ju je naredil.
१५यराबामाने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ती उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले.
16 Za njimi so iz vseh Izraelovih rodov [prišli] tisti, ki so svoja srca naravnali, da iščejo Gospoda Boga. Iz Izraela so prišli v Jeruzalem, da darujejo Gospodu, Bogu svojih očetov.
१६इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, त्यांच्या पुर्वजांचा देव परमेश्वरास यज्ञार्पणे करण्यासाठी यरूशलेमेला आले.
17 Tako so tri leta krepili Judovo kraljestvo in Salomonovega sina Rehabáma naredili močnega, kajti tri leta so hodili po Davidovi in Salomonovi poti.
१७त्यामुळे यहूदाचे राज्य बळकट झाले. त्यांनी शलमोनाचा पुत्र रहबाम याला तीन वर्षे पाठिंबा दिला. या काळात त्यांनी दावीद आणि शलमोन यांच्यासारखेच आचरण ठेवले.
18 Rehabám si je za ženo vzel Mahaláto, hčer Davidovega sina Jerimóta in Abihájilo, hčer Jesejevega sina Eliába,
१८रहबामाने दावीदपुत्र यरीमोथ आणि इशायपुत्र अलीयाब ह्याची कन्या अबीहाईल ह्यांच्यापासून झालेली महलथ हिच्याशी विवाह केला;
19 ki sta mu rodila otroke: Jeúša, Šemarjája in Zaháma.
१९महलथापासून रहबामाला यऊश, शमऱ्या आणि जाहम हे पुत्र झाले.
20 Za njo je vzel Absalomovo hčer Maáho, ki mu je rodila Abíja, Atája, Zizá in Šelomíta.
२०मग रहबामाने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची कन्या. माकाला रहबामापासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ हे पुत्र झाले.
21 Rehabám je ljubil Absalomovo hčer Maáho bolj, kot vse svoje žene in svoje priležnice, (kajti vzel je osemnajst žena in šestdeset priležnic ter zaplodil osemindvajset sinov in šestdeset hčerá.)
२१रहबामाचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामाला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्यास अठ्ठावीस पुत्र आणि साठ कन्याहोत्या.
22 Rehabám je postavil Maáhinega sina Abíja, da bo vladar med svojimi brati, kajti mislil je, da ga postavi za kralja.
२२माकाचा पुत्र अबीया याला रहबामाने सर्व भावडांमध्ये अग्रक्रम दिला. कारण त्यास राजा करावे अशी त्याची इच्छा होती.
23 Modro je ravnal in vse svoje otroke razpršil po vseh Judovih in Benjaminovih deželah, do vsakega utrjenega mesta in dal jim je živeža v obilju. In želel je mnogo žená.
२३रहबामाने मोठ्या चतुराईने आपल्या सर्व पुत्रांना यहूदा आणि बन्यामीन येथील भक्कम तटबंदी असलेल्या नगरांमध्ये विखरून ठेवले. त्यांना उत्तम रसद पुरवली. त्यांची लग्ने लावून दिली.