< Откровение ап. Иоанна Богослова 19 >

1 И по сих слышах глас велий народа многа на небеси, глаголющаго: аллилуиа: спасение и слава, и честь и сила Господу нашему,
या गोष्टींनंतर मी जणू एक, विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली; ती म्हणाली हालेलूया, तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचीच आहेत,
2 яко истинни и прави суди Его: яко судил есть любодейцу велику, яже посмради землю любодеянием своим, и отмстил кровь рабов Своих от руки ея.
कारण त्याचे न्याय खरे आणि नीतीचे आहेत; कारण ज्या महावेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे. आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.
3 И второе реша: аллилуиа. И дым ея восхождаше во веки веков. (aiōn g165)
आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलूया तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. (aiōn g165)
4 И падоша двадесять и четыри старцы и четыри животна и поклонишася Богови седящему на престоле, глаголюще: аминь, аллилуиа.
तेव्हा ते चोवीस वडील व चार जिवंत प्राणी पालथे पडले, त्यांनी राजासनावर बसलेल्या देवाला नमन केले आणि ते म्हणालेः आमेन; हालेलूया.
5 И глас изыде от престола глаголющь: пойте Богу нашему, вси раби Его и боящиися Его, и малии и велицыи.
आणि राजासनाकडून एक वाणी आली; ती म्हणालीः तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहानमोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिणारे, आपल्या देवाची स्तुती करा.
6 И слышах яко глас народа многа, и яко глас вод многих, и яко глас громов крепких, глаголющих: аллилуиа, яко воцарися Господь Бог Вседержитель:
आणि, मी जणू एका, विशाल समुदायाची वाणी, ऐकली; ती वाणी महापूराच्या आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटांच्या आवाजासारखी होती. ती म्हणाली, हालेलूया; कारण, आमचा प्रभू सर्वसत्ताधारी देव हा राज्य करीत आहे.
7 радуимся и веселимся, и дадим славу Ему: яко прииде брак Агнчий, и жена Его уготовила есть себе.
या, आपण आनंद करू, हर्ष करू, आणि त्यास गौरव देऊ; कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे.
8 И дано бысть ей облещися в виссон чист и светел: виссон бо оправдания святых есть.
आणि तिला नेसायला, स्वच्छ, शुभ्र, चमकणारे तलम तागाचे वस्त्र दिले आहे. (हे तलम वस्त्र म्हणजे पवित्रजनांच्या नीतिमत्त्वाची कामे होत.)
9 И глагола ми: напиши: блажени званнии на вечерю брака Агнча. И глагола ми: сия словеса истинна Божия суть.
आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः कोकऱ्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत.” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत.”
10 И пад пред ногама его, поклонихся ему: и глагола ми: виждь, ни: клеврет ти есмь и братий твоих имущих свидетелство Иисусово: Богу поклонися: свидетелство бо Иисусово есть дух пророчествия.
१०आणि, मी त्यास नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवानीचा आत्मा आहे.”
11 И видех небо отверсто, и се, конь бел, и седяй на нем Верен и Истинен, и Правосудный и Воинственный:
११तेव्हा मी बघितले की, स्वर्ग उघडला आणि पाहा, एक पांढरा घोडा आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव विश्वासू आणि खरा आहे, तो नीतीने न्याय करतो, आणि युद्ध करतो,
12 очи же Ему (еста) яко пламень огнен, и на главе Его венцы мнози: имый имя написано, еже никтоже весть, токмо Он Сам:
१२त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते; ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही.
13 и облечен в ризу червлену кровию. И нарицается имя Его Слово Божие.
१३त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे;
14 И воинства небесная идяху вслед Его на конех белых, облечени в виссон бел и чист.
१४आणि स्वर्गातल्या सेना पांढऱ्या घोड्यांवर बसून शुभ्र, स्वच्छ, तलम तागाची वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या.
15 И из уст Его изыде оружие остро, да тем избиет языки: и Той упасет я жезлом железным, и Той перет точило вина ярости и гнева Божия Вседержителева.
१५आणि त्याने राष्ट्रांवर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तलवार निघते, तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालवील; तो सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाचे द्राक्षकुंड तुडवील.
16 И имать на ризе и на стегне Своем имя написано: Царь царем и Господь господем.
१६त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे.
17 И видех единаго Ангела стояща на солнце: и возопи гласом велиим, глаголя всем птицам парящым посреде небесе: приидите и соберитеся на вечерю великую Божию,
१७आणि मी बघितले की, एक देवदूत सूर्यात उभा होता; तो आकाशात उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणालाः या आणि देवाच्या मोठ्या भोजनासाठी जमा व्हा;
18 да снесте плоти царей и плоти крепких и плоти тысящников, и плоти коней и седящих на них, и плоти всех свободных и рабов, и малых и великих.
१८म्हणजे तुम्ही राजांचे सेनापतीचे मांस खाल आणि बलवान पुरुषांचे मांस खाल; घोड्यांचे आणि त्यावर बसणाऱ्यांचे मांस खाल, स्वतंत्र आणि दास, लहान आणि मोठे अशा सर्वांचे मांस खाल.
19 И видех зверя и цари земныя и вои их собраны сотворити брань с Седящим на кони и с воинствы Его.
१९आणि मी बघितले की, तो जो घोड्यावर बसला होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या सेनेबरोबर लढाई करायला तो पशू व पृथ्वीचे राजे आणि त्यांच्या सेना एकत्र आल्या होत्या.
20 И ят бысть зверь и с ним лживый пророк, сотворивый знамения пред ним, имиже прельсти приемшыя начертание зверино и покланяющыяся иконе его: жива ввержена быста оба в езеро огненное горящее жупелом: (Limnē Pyr g3041 g4442)
२०मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले; त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूने शिक्का घेणाऱ्यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांस फसवले होते. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले; (Limnē Pyr g3041 g4442)
21 а прочии убиени быша оружием Седящаго на кони, изшедшим из уст Его: и вся птицы насытишася от плотей их.
२१बाकीचे लोक जो घोड्यावर बसला होता त्याच्या तोंडातून बाहेर येणाऱ्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सगळे पक्षी तृप्त झाले.

< Откровение ап. Иоанна Богослова 19 >