< Псалтирь 85 >
1 В конец, сыном Кореовым, псалом. Благоволил еси, Господи, землю Твою, возвратил еси плен Иаковль.
१कोरहाच्या मुलांची स्तोत्रे हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.
2 Оставил еси беззакония людий Твоих, покрыл еси вся грехи их.
२तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.
3 Укротил еси весь гнев Твой, возвратился еси от гнева ярости Твоея.
३तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे; आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस.
4 Возврати нас, Боже спасений наших, и отврати ярость Твою от нас.
४हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण, आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर.
5 Еда во веки прогневаешися на ны? Или простреши гнев Твой от рода в род?
५सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का? पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय?
6 Боже, Ты обращься оживиши ны, и людие Твои возвеселятся о Тебе.
६तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा, म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का?
7 Яви нам, Господи, милость Твою, и спасение Твое даждь нам.
७हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे; तू कबूल केलेले तारण आम्हास दे.
8 Услышу, что речет о мне Господь Бог: яко речет мир на люди Своя, и на преподобныя Своя, и на обращающыя сердца к нему.
८परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये.
9 Обаче близ боящихся Его спасение Его, вселити славу в землю нашу.
९खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.
10 Милость и истина сретостеся, правда и мир облобызастася:
१०दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
11 истина от земли возсия, и правда с небесе приниче:
११पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे.
12 ибо Господь даст благость, и земля наша даст плод свой.
१२जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल.
13 Правда пред Ним предидет, и положит в путь стопы своя.
१३त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.