< Псалтирь 51 >

1 В конец, псалом Давиду, внегда внити к нему Нафану пророку, егда вниде к Вирсавии жене Уриеве. Помилуй мя, Боже, по велицей милости Твоей, и по множеству щедрот Твоих очисти беззаконие мое.
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र; जेव्हा तो बथशेबापाशी गेल्यानंतर नाथान भविष्यवादी त्याच्याकडे आला तेव्हाचे. हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक.
2 Наипаче омый мя от беззакония моего и от греха моего очисти мя:
देवा माझे अपराध धुऊन टाक, आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर.
3 яко беззаконие мое аз знаю, и грех мой предо мною есть выну.
कारण माझे अपराध मला माहित आहेत. आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर आहेत.
4 Тебе единому согреших и лукавое пред Тобою сотворих: яко да оправдишися во словесех Твоих и победиши, внегда судити Ти.
तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे, आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो. तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो.
5 Се бо, в беззакониих зачат есмь, и во гресех роди мя мати моя.
पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे, आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
6 Се бо, истину возлюбил еси, безвестная и тайная премудрости Твоея явил ми еси.
पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो, तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे.
7 Окропиши мя иссопом, и очищуся: омыеши мя, и паче снега убелюся.
मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन.
8 Слуху моему даси радость и веселие: возрадуются кости смиренныя.
आनंद व हर्ष मला ऐकू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
9 Отврати лице Твое от грех моих и вся беззакония моя очисти.
माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.
10 Сердце чисто созижди во мне, Боже, и дух прав обнови во утробе моей.
१०देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर. आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल.
11 Не отвержи мене от лица Твоего и Духа Твоего Святаго не отими от мене.
११तुझ्या उपस्थितीतून मला दूर लोटू नकोस, आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 Воздаждь ми радость спасения Твоего и Духом владычним утверди мя.
१२तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे, आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर.
13 Научу беззаконныя путем Твоим, и нечестивии к Тебе обратятся.
१३तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील.
14 Избави мя от кровей, Боже, Боже спасения моего: возрадуется язык мой правде Твоей.
१४हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर, आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन.
15 Господи, устне мои отверзеши, и уста моя возвестят хвалу Твою.
१५प्रभू, माझे ओठ उघड, आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल.
16 Яко аще бы восхотел еси жертвы, дал бых убо: всесожжения не благоволиши.
१६कारण यज्ञाची आवड तुला नाही, नाहीतर मी ते दिले असते, होमार्पणाने तुला संतोष होत नाही.
17 Жертва Богу дух сокрушен: сердце сокрушенно и смиренно Бог не уничижит.
१७देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय, तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
18 Ублажи, Господи, благоволением Твоим Сиона, и да созиждутся стены Иерусалимския:
१८हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर. आणि यरूशलेमेच्या भींती पुन्हा बांध.
19 тогда благоволиши жертву правды, возношение и всесожегаемая: тогда возложат на олтарь Твой телцы.
१९तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील. तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील.

< Псалтирь 51 >