< Псалтирь 4 >

1 В конец, в песнех, Псалом Давиду. Внегда призвати ми, услыша мя Бог правды моея: в скорби распространил мя еси: ущедри мя и услыши молитву мою.
प्रमुख वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तोत्र. मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा. संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले, माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक.
2 Сынове человечестии, доколе тяжкосердии? Вскую любите суету и ищете лжи?
अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार? किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला
3 И уведите, яко удиви Господь преподобнаго Своего. Господь услышит мя, внегда воззвати ми к Нему.
परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे. मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल.
4 Гневайтеся, и не согрешайте, яже глаголете в сердцах ваших, на ложах ваших умилитеся:
भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका! तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा.
5 пожрите жертву правды и уповайте на Господа.
न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा.
6 Мнози глаголют: кто явит нам благая? Знаменася на нас свет лица Твоего, Господи.
बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.”
7 Дал еси веселие в сердцы моем: от плода пшеницы, вина и елеа своего умножишася:
त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षरसाची समृध्दी असते, तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू मला दिला आहे.
8 в мире вкупе усну и почию, яко Ты, Господи, единаго на уповании вселил мя еси.
मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो, कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस.

< Псалтирь 4 >