< Псалтирь 24 >

1 Господня земля, и исполнение ея, вселенная и вси живущии на ней.
दाविदाचे स्तोत्र. भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत.
2 Той на морях основал ю есть и на реках уготовал ю есть.
कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला, आणि जलांवर त्याने ती स्थापली.
3 Кто взыдет на гору Господню? Или кто станет на месте святем Его?
परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?
4 Неповинен рукама и чист сердцем, иже не прият всуе душу свою и не клятся лестию искреннему своему:
ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.
5 сей приимет благословение от Господа и милостыню от Бога Спаса своего.
तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल, आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल.
6 Сей род ищущих Господа, ищущих лице Бога Иаковля.
हिच पिढी त्यास शोधणारी आहे, जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते.
7 Возмите врата князи ваша, и возмитеся врата вечная: и внидет Царь славы.
अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा. पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.
8 Кто есть сей Царь славы? Господь крепок и силен, Господь силен в брани.
गौरवशाली राजा कोण आहे? तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे.
9 Возмите врата князи ваша, и возмитеся врата вечная: и внидет Царь славы.
वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. सर्वकाळच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.
10 Кто есть сей Царь славы? Господь сил, Той есть царь славы.
१०तो गौरवशाली राजा कोण आहे? सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे.

< Псалтирь 24 >