< Псалтирь 139 >
1 Господи, искусил мя еси и познал мя еси: ты познал еси седание мое и востание мое.
१दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस;
2 Ты разумел еси помышления моя издалеча:
२मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे; तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात.
3 стезю мою и уже мое Ты еси изследовал и вся пути моя провидел еси.
३तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो; तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस.
4 Яко несть льсти в языце моем: се, Господи, Ты познал еси
४हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही.
5 вся последняя и древняя: Ты создал еси мя и положил еси на мне руку Твою.
५तू मागून व पुढून मला घेरले आहेस, आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस.
6 Удивися разум Твой от мене, утвердися, не возмогу к нему.
६हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; ते खूप अगम्य आहे, ते मी समजू शकत नाही.
7 Камо пойду от Духа Твоего? И от лица Твоего камо бежу?
७मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो?
8 Аще взыду на небо, Ты тамо еси: аще сниду во ад, тамо еси. (Sheol )
८मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस. (Sheol )
9 Аще возму криле мои рано и вселюся в последних моря,
९जर मी पहाटेचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस.
10 и тамо бо рука Твоя наставит мя, и удержит мя десница Твоя.
१०तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरून नेतोस.
11 И рех: еда тма поперет мя? И нощь просвещение в сладости моей.
११जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल, आणि तरीही रात्र माझ्याभोवती प्रकाशच होईल.
12 Яко тма не помрачится от Тебе, и нощь яко день просветится: яко тма ея, тако и свет ея.
१२काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही. रात्रही दिवसासारखीच प्रकाशते, कारण तुला काळोख आणि प्रकाश दोन्ही सारखेच आहेत.
13 Яко Ты создал еси утробы моя, восприял мя еси из чрева матере моея.
१३तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.
14 Исповемся Тебе, яко страшно удивился еси: чудна дела Твоя, и душа моя знает зело.
१४मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
15 Не утаися кость моя от Тебе, юже сотворил еси в тайне, и состав мой в преисподних земли.
१५मी गुप्तस्थळी निर्माण होत असता, आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.
16 Несоделанное мое видесте очи Твои, и в книзе Твоей вси напишутся: во днех созиждутся, и никтоже в них.
१६तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते.
17 Мне же зело честни быша друзи Твои, Боже, зело утвердишася владычествия их:
१७हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे.
18 изочту их, и паче песка умножатся: востах, и еще есмь с Тобою.
१८मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील. जेव्हा मी जागा होतो, तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.
19 Аще избиеши грешники, Боже: мужие кровей, уклонитеся от мене.
१९हे देवा! जर तू दुष्टांना मारुन टाकशील; अहो हिंसाचारी मनुष्यांनो! माझ्यापासून दूर व्हा.
20 Яко ревниви есте в помышлениих, приимут в суету грады Твоя.
२०ते तुझ्याविरूद्ध बंड आणि कपटाने कृती करतात; तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात.
21 Не ненавидящыя ли Тя, Господи, возненавидех, и о вразех Твоих истаях?
२१परमेश्वरा! तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्याविरुध्द उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये?
22 Совершенною ненавистию возненавидех я: во враги быша ми.
२२मी त्यांच्या पराकाष्ठेचा पूर्ण द्वेष करतो; ते माझे शत्रू झाले आहेत.
23 Искуси мя, Боже, и увеждь сердце мое: истяжи мя и разумей стези моя:
२३हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
24 и виждь, аще путь беззакония во мне, и настави мя на путь вечен.
२४माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, आणि मला सनातन मार्गाने चालीव.