< Левит 21 >
1 И рече Господь к Моисею, глаголя: рцы жерцем сыном Аароним, и речеши им: над душами да не осквернятся в языце своем,
१परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे पुत्र, जे याजक त्यांना असे सांग की, आपल्या लोकांमधील मरण पावलेल्या मनुष्यास स्पर्श करून याजकाने स्वत: ला अशुद्ध करून घेऊ नये.
2 но разве в дому ближняго своего, над отцем и материю, и сынами и дщерьми, над братом
२परंतु आपले जवळचे नातलग म्हणजे आपली आई, बाप मुलगा, मुलगी, भाऊ,
3 и над сестрою своею девою, яже есть ближняя ему, не дана мужу, над сими да осквернятся:
३आणि आपल्याजवळ असलेली आपली अविवाहित बहीण जिला पती नाही तिचे मात्र सुतक धरावे.
4 да не осквернится внезапу в людех своих, во осквернение свое.
४याजक आपल्या लोकांचा प्रमुख असल्यामुळे त्याने सामान्य मनुष्याप्रमाणे लग्न करून स्वत: ला अपवित्र करून घेऊ नये.
5 И да не обриете главы по мертвем, и обличия брады да не обриют, и на плотех своих да не сотворят язв:
५याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत;
6 святи да будут Богу своему и не осквернят имене Бога своего: жертвы бо Господни дары Бога своего сами приносят, и будут святи.
६त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र रहावे आणि आपल्या देवाच्या नावाचा मान राखावा. त्याचे भय धरावे. आणि त्याच्या नांवाला काळिमा लावू नये; ते अग्नीद्वारे परमेश्वरास अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी अवश्य पवित्र रहावे.
7 Жены блудницы и осквернены да не поймут, и жены изгнаныя от мужа ея да не поймут: яко святи суть Господу Богу своему:
७याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली पत्नी करून घेऊ नये.
8 и да освятиши его: дары Господа Бога вашего сей приносит, свят будет: яко свят Аз есмь Господь Бог ваш освящая их.
८याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्यास पवित्र मानावे, त्यास तू पवित्र लेखावे; कारण तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.
9 И дщерь человека жерца аще осквернится, еже соблудити, имя отца своего сия оскверняет: огнем да сожжется.
९एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करील तर ती भ्रष्ट होईल, व आपल्या पावित्र्याचा नाश करून घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाला कलंक लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे.
10 И жрец великий от братий своих, емуже возлиян на главу елей помазания, и совершенный, еже облачитися в ризы, главы да не открыет, и риз своих да не раздерет,
१०आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांमध्ये शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत;
11 и ко всякой души умершей да не приидет: над отцем своим и над материю своею да не осквернится,
११त्याने आपणाला अशुद्ध करून घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या वडिलाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये.
12 и от святых да не изыдет, и да не осквернит имене святаго Бога своего, яко святый елей помазания Бога его на нем: Аз Господь.
१२त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये, त्याने अशुद्ध होऊ नये व आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करु नये; त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे व त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे!
13 Сей в жену деву от рода своего да поймет:
१३मुख्य याजकाने कुमारीशीच लग्न करावे,
14 вдовицы же и изгнаныя, и оскверненыя и блудницы, сих да не поймет: но девицу от племене своего да поймет в жену:
१४भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने पत्नी करून घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारीशीच लग्न करावे.
15 и да не осквернит семене своего в людех своих: Аз Господь Бог освящаяй его.
१५अशा प्रकारे त्याने आपल्या लोकात आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये; कारण मी जो परमेश्वर त्या मी त्यास पवित्र सेवेसाठी पवित्र केले आहे.”
16 И рече Господь к Моисею, глаголя:
१६परमेश्वर मोशेला म्हणाला,
17 рцы ко Аарону, глаголя: человек от рода твоего в родех ваших, аще коему будет на нем порок, да не приступит приносити дары Бога своего:
१७“अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यानमध्ये, तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग शारीरिक दोष निघाले तर त्याने आपल्या देवाकरता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये.
18 всяк человек, емуже аще будет на нем порок, да не приступит: человек слеп, или хром, или корносый, или ухорезан,
१८शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही मनुष्याने मला अर्पण आणू नये; याजक या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी: आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला,
19 или человек, емуже есть сокрушение руки или сокрушение ноги,
१९मोडक्या पायाचा, थोटा,
20 или горбат, или гноеточив очима, или бельмоочен, или человек, на немже суть красты дивия, или лишаи, или единоятрный:
२०कुबडा, ठेंगू, डोळयात दोष असलेला, पुरळ किंवा त्वचेचे इतर वाईट रोग झालेला अथवा भग्नांड असलेला;
21 всяк, емуже аще будет на нем порок от семене Аарона жерца, да не приступит принести жертв Богу твоему, зане порок на нем: даров Божиих да не приступит приносити:
२१अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणास असे व्यंग असेल तर त्याने परमेश्वरास अर्पण किंवा अन्न अर्पावयास वेदीजवळ जाऊ नये; त्याने आपल्या देवाला अन्न अर्पण करण्यासाठी जवळ जाऊ नये.
22 дары Бога своего святая святых, и от святых да снест:
२२तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने त्याच्या देवाचे पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे;
23 обаче к завесе да не приступит, и ко олтарю да не приближится, яко порок имать: и да не осквернит святилища Бога своего, яко Аз Господь освящаяй их.
२३परंतु त्यास व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परमपवित्र स्थाने भ्रष्ट करु नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे!”
24 И глагола Моисей ко Аарону и сыном его, и ко всем сыном Израилевым.
२४तेव्हा मोशेने अहरोन, त्याचे पुत्र व सगळे इस्राएल लोक ह्याना हे सर्व सांगितले.