< От Иоанна святое благовествование 20 >

1 Во едину же от суббот Мариа Магдалина прииде заутра, еще сущей тме, на гроб, и виде камень взят от гроба:
आठवड्याच्या पहिल्या दिवशी, पहाटेस अंधारातच, मग्दालीया नगराची मरीया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले.
2 тече убо и прииде к Симону Петру и к другому ученику, егоже любляше Иисус, и глагола има: взяша Господа от гроба, и не вем, где положиша Его.
तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्या दुसर्‍या शिष्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आणि त्यास कोठे ठेवले हे आम्हास माहीत नाही.”
3 Изыде же Петр и другий ученик и идяста ко гробу:
म्हणून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले.
4 течаста же оба вкупе: и другий ученик тече скорее Петра и прииде прежде ко гробу,
तेव्हा ते दोघे जण बरोबर धावत गेले; पण तो दुसरा शिष्य पेत्राच्या पुढे धावत गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला.
5 и приник виде ризы лежащя: обаче не вниде.
त्याने ओणवून आत डोकावले आणि त्यास तागाची वस्त्रे पडलेली दिसली. पण तो आत गेला नाही.
6 Прииде же Симон Петр вслед его, и вниде во гроб, и виде ризы (едины) лежащя
शिमोन पेत्रहि त्याच्यामागून येऊन पोहचला व तो कबरेत शिरला;
7 и сударь, иже бе на главе Его, не с ризами лежащь, но особь свит на единем месте.
आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो त्या तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून ठेवलेला होता.
8 Тогда убо вниде и другий ученик, пришедый прежде ко гробу, и виде и верова:
तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला.
9 не у бо ведяху Писания, яко подобает Ему из мертвых воскреснути.
कारण त्याने मरण पावलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे, हा शास्त्रलेख त्यांना अजून कळला नव्हता.
10 Идоста же паки к себе ученика.
१०मग ते शिष्य पुन्हा आपल्या घरी गेले.
11 Мариа же стояше у гроба вне плачущи: якоже плакашеся, приниче во гроб,
११पण इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि ती रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले;
12 и виде два Ангела в белых (ризах) седяща, единаго у главы и единаго у ногу, идеже бе лежало тело Иисусово.
१२आणि जेथे येशूचे शरीर आधी ठेवलेले होते तेथे ते शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक डोक्याकडील बाजूस आणि एक पायांकडील बाजूस बसलेले दिसले.
13 И глаголаста ей она: жено, что плачешися? Глагола има: яко взяша Господа моего, и не вем, где положиша Его.
१३आणि ते तिला म्हणाले, “मुली, तू का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्यास कोठे ठेवले हे मला माहीत नाही.”
14 И сия рекши обратися вспять и виде Иисуса стояща, и не ведяше, яко Иисус есть.
१४असे बोलून ती मागे वळली आणि तो तिला येशू उभा असलेला दिसला; पण तो येशू आहे हे तिने ओळखले नाही.
15 Глагола ей Иисус: жено, что плачеши? Кого ищеши? Она (же) мнящи, яко вертоградарь есть, глагола Ему: господи, аще ты еси взял Его, повеждь ми, где еси положил Его, и аз возму Его.
१५येशूने तिला म्हटले, “मुली, तू का रडतेस? तू कोणाला शोधतेस?” तो माळी आहे असे समजून त्यास म्हणाली, “साहेब, तू त्यास येथून नेले असेल तर कोठे ठेवलेस ते मला सांग म्हणजे मी त्यास घेऊन जाईन.”
16 Глагола ей Иисус: Марие. Она (же) обращшися глагола Ему: Раввуни, еже глаголется, Учителю.
१६येशूने तिला म्हटले, “मरीये,” ती वळून त्यास इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी,” (म्हणजे गुरूजी)
17 Глагола ей Иисус: не прикасайся Мне, не у бо взыдох ко Отцу Моему: иди же ко братии Моей и рцы им: восхожду ко Отцу Моему и Отцу вашему, и Богу Моему и Богу вашему.
१७येशूने तिला म्हटले, “मला शिवू नकोस; कारण, मी अजून पित्याकडे वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन, त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता, माझा देव आणि तुमचा देव आहे त्याच्याकडे मी वर जातो.”
18 Прииде (же) Мариа Магдалина поведающи учеником, яко виде Господа, и сия рече ей.
१८मग्दालीया नगराची मरीया गेली आणि आपण प्रभूला पहिल्याचे आणि त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळविले.
19 Сущу же позде в день той во едину от суббот, и дверем затворенным, идеже бяху ученицы (Его) собрани, страха ради Иудейска, прииде Иисус и ста посреде и глагола им: мир вам.
१९त्या दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.”
20 И сие рек, показа им руце (и нозе) и ребра Своя. Возрадовашася убо ученицы, видевше Господа.
२०आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात आणि कूस दाखवली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले
21 Рече же им Иисус паки: мир вам: якоже посла Мя Отец, и Аз посылаю вы.
२१तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हास पाठवतो.”
22 И сие рек, дуну и глагола им: приимите Дух Свят:
२२एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणाला, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा.
23 имже отпустите грехи, отпустятся им: и имже держите, держатся.
२३ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.”
24 Фома же, един от обоюнадесяте, глаголемыи Близнец, не бе (ту) с ними, егда прииде Иисус.
२४येशू आला तेव्हा, बारांतील एक, ज्याला दिदुम म्हणत तो थोमा त्यांच्याबरोबर नव्हता.
25 Глаголаху же ему друзии ученицы: видехом Господа. Он же рече им: аще не вижу на руку Его язвы гвоздинныя, и вложу перста моего в язвы гвоздинныя, и вложу руку мою в ребра Его, не иму веры.
२५म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्यास सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी त्याच्या हातात खिळ्यांची खूण बघितल्याशिवाय, खिळ्यांच्या जागी माझे बोट घातल्याशिवाय आणि त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही.”
26 И по днех осмих паки бяху внутрь ученицы Его, и Фома с ними. Прииде Иисус дверем затворенным, и ста посреде (их) и рече: мир вам.
२६आणि पुन्हा, आठ दिवसानी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दरवाजे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्हास शांती असो.”
27 Потом глагола Фоме: принеси перст твой семо и виждь руце Мои: и принеси руку твою и вложи в ребра Моя: и не буди неверен, но верен.
२७मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट पुढे कर आणि माझे हात बघ; तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल; आणि विश्वासहीन होऊ नकोस पण विश्वास ठेवणारा हो.”
28 И отвеща Фома и рече Ему: Господь мой и Бог мой.
२८आणि थोमाने त्यास म्हटले, “माझा प्रभू आणि माझा देव!”
29 Глагола ему Иисус: яко видев Мя, веровал еси: блажени не видевшии и веровавше.
२९येशूने त्यास म्हटले, “तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे आहे ते धन्य!”
30 Многа же и ина знамения сотвори Иисус пред ученики Своими, яже не суть писана в книгах сих:
३०आणि या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांसमोर केली.
31 сия же писана быша, да веруете, яко Иисус есть Христос Сын Божий, и да верующе живот имате во имя Его.
३१पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हास त्याच्या नावात जीवन मिळावे.

< От Иоанна святое благовествование 20 >