< Книга Иова 21 >
१नंतर ईयोबाने उत्तर दिले.
2 послушайте, послушайте словес моих, да не будет ми от вас сие утешение:
२“मी काय म्हणतो ते निट ऐक म्हणजे माझे सांत्वन होईल.
3 потерпите ми, аз же возглаголю, таже не посмеетемися.
३मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर, माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस.
4 Что бо? Еда человеческо ми обличение? Или почто не возярюся?
४माझी लोकांविरुध्द तक्रार काय आहे? मी अधीर का होऊ नये?
5 Воззревшии на мя удивитеся, руку положше на ланите.
५माझ्याकडे बघ व आश्चर्यचकित हो, व तुझे हात तू आपल्या तोंडावर ठेव.
6 Аще бо воспомяну, ужаснуся: обдержат бо плоть мою болезни.
६माझ्यावर आलेल्या त्रांसाचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो.
7 Почто нечестивии живут, обетшаша же в богатстве?
७दुष्ट मनुष्यांना जास्त आयुष्य का असते? ते वृध्द आणि यशस्वी का होतात?
8 Семя их по души, чада же их пред очима.
८आणि त्याचे वंशज त्याच्या डोळ्यासमोर स्थापीत होतात, आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलेबाळे नांदतात.
9 Домове их обилнии суть, страх же нигде, раны же от Господа несть на них.
९त्यांची घरे भितीपासून सुरक्षित असतात, देवाची काठी त्याच्यांवर पडत नाही.
10 Говядо их не изверже: спасена же бысть их имущая во чреве и не лишися.
१०त्यांच्या बैलाचे प्रजोत्पादन असफल होत नाही. त्यांच्या गायींना वासरे होतात आणि त्यांची वासरे अकाली मृत्युमुखी पडत नाहीत.
11 Пребывают же яко овцы вечныя, дети же их предиграют,
११ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात.
12 вземше псалтирь и гусли, и веселятся гласом песни.
१२ते डफ आणि वीणेच्या आवाजावर गातात आणि ते पावांचा नाद ऐकुण आनंदी होतात.
13 Скончаша во благих житие свое, в покои же адове успоша. (Sheol )
१३ते त्यांचे दिवस भरभराटीत घालवतात, नंतर ते शांतपणे खाली अधोलोकात जातात. (Sheol )
14 Глаголют же Господеви: отступи от нас, путий Твоих ведети не хощем:
१४ते देवाला म्हणाले, आम्हास एकटे सोड आम्हास तुझ्या ज्ञानाच्या मार्गाची इच्छा नाही.
15 что достоин, яко да поработаем Ему? И кая польза, яко да взыщем Его?
१५सर्वशक्तिमान कोण आहे, की त्याची उपासना आम्ही करावी? त्याची प्रार्थना करून आम्हास काय लाभ?
16 В руках бо их бяху благая, дел же нечестивых не надзирает.
१६पाहा, त्याची भरभराट त्याच्या स्वतःच्या हाती नाही? दुष्ट मनुष्याचा सल्ला माझ्यापासुन दूर असो.
17 Обаче же и нечестивых светилник угаснет, найдет же им развращение, болезни же их оымут от гнева:
१७वांरवार दुष्टाचा दिप विझवला जातो, त्याची विपत्ती त्यांच्यावर येते? आणि असे कीतीतरी वेळ घडते की, देव त्याच्या क्रोधाने त्यांची पीडा त्यांना वाटून देतो.
18 будут же аки плевы пред ветром, или якоже прах, егоже взя вихр.
१८ते कितीदा वाऱ्यापुढे धसकटासारखे होतात, किंवा ते वादळाने उडालेल्या भूशासारखे होतात.
19 Да оскудеют сыном имения его: воздаст противу ему, и уразумеет.
१९पण तू म्हणतोस देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो. तर त्याने त्यालाच प्रतिफळ द्यावे म्हणजेच त्यास त्याचा दोष कळेल.
20 Да узрят очи его свое убиение, от Господа же да не спасется.
२०त्याच्या डोळ्यांनीच तो आपला नाश पाहो, तो सर्वशक्तिमान देवाच्या रागाचे प्राशन करो.
21 Яко воля его с ним в дому его, и числа месяцей его разделишася.
२१जेव्हा त्याच्या आयुष्याची मद्दत कमी करण्यास येईल, तेव्हा त्याच्या मरणानंतर तो त्याच्या परीवाराची काळजी कशी करील?
22 Не Господь ли есть научаяй разуму и хитрости? Тойже мудрых разсуждает.
२२देवाला कोणी ज्ञान शिकवू शकते का? तो तर उच्च पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो.
23 Той умрет в силе простоты своея, всецел же благодушествуяй и благоуспеваяй,
२३एखादा मनुष्य त्याच्या पूर्ण शक्तीतच मरतो, पुर्णपणे शांतीत आणि सहजतेने.
24 утроба же его исполнена тука, мозг же его разливается.
२४त्याची भांडी दुधाने आणि त्याची हाडे मज्जारसाने ओलसर आहेत.
25 Ов же умирает в горести души, не ядый ничтоже блага.
२५दुसरा मनुष्य मनाच्या कटूपणात मरतो, त्याने कधीच चांगले अनुभवलेले नसते.
26 Вкупе же на земли спят, гнилость же их покры.
२६शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील. किडे त्यांना झाकून टाकतील.
27 Темже вем вас, яко дерзостию належите ми,
२७पाहा, मला तुमचे विचार माहीती आहेत, कोणत्या चुकांनी मला दु: ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे.
28 яко речете: где есть дом княжь? И где есть покров селений нечестивых?
२८तू कदाचित् म्हणशील ‘आता राजाचे घर कोठे आहे? दुष्ट ज्या तंबूत राहतो तो कोठे आहे.
29 Вопросите мимоходящих путем, и знамения их не чужда сотворите.
२९तू कधीच प्रवास करणाऱ्या लोकांस विचारले नाहीस काय? ते काय चिन्ह देतील हे तुला ठावूक नाही काय,
30 Яко на день пагубы соблюдается нечестивый, и в день гнева Его отведен будет.
३०दुष्ट मनुष्य नाशाच्या दिवसासाठी ठेवलेला आहे, आणि त्यास क्रोधाच्या दिवशी बाहेर आणतील.
31 Кто возвестит пред лицем его путь его, и еже той сотвори, кто воздаст ему?
३१त्याच्या तोंडावर त्याचा मार्ग कोण प्रकट करील? त्याने जे केले त्याची परत फेड कोण करील?
32 И той во гроб отнесен бысть, и на гробищих побде.
३२नंतर त्यास कबरेकडे नेतील, त्याच्या थडग्यावर पहारा ठेवतील.
33 Усладися ему дробное камение потока, и вслед его всяк человек отидет, и пред ним безчисленнии.
३३खोऱ्यातील ढेकळे त्यास गोड लागतील, सर्व लोक त्याच्या पाठीमागे जातील जसे असंख्य लोक होऊन गेले तसे ते सर्व त्याच्या मागे जातील
34 Како же мя утешаете суетными? А еже бы мне почити от вас, ничтоже.
३४मग तुमच्या मुर्खपणाने तुम्ही माझे सांत्वन कसे करु शकता, म्हणून तुमची उत्तरे काहीच नाही ती मुर्खपणाची आहेत.”