< Книга пророка Иеремии 3 >
1 Аще отпустит муж жену свою, и отидет от него и будет мужу иному, еда возвращающися возвратится к нему паки? Еда непорочна будет и неосквернена жена та? Ты же соблудила еси с пастырьми многими, и возвращалася еси и ко Мне, глаголет Господь.
१ते म्हणतात, एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला सोडले, तर ती त्याच्यापासून निघून जाऊन इतर पुरुषाची झाली, तर तो पुन्हा तिच्यापाशी परत जाईल का? ती पूर्णपणे विटाळलेली नसेल काय? ती स्री ही भूमी आहे. तू वेश्येसारखी पुष्कळ सहयोगीं सोबत वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे? असे परमेश्वर म्हणतो.
2 Воздвигни очи твои на правоту и виждь, где не смесилася еси? На путех сидела еси аки врана особящаяся и осквернила еси землю в любодеяниих и в лукавствех твоих,
२डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या वेश्या व्यवसायाने व दुष्टतेने राष्ट्र भ्रष्ट केले आहेस.
3 и имела еси пастырей многих в претыкание себе: лице жены блудницы бысть тебе, не хотела еси постыдетися ко всем.
३म्हणून वसंत ऋतूतील पाऊस थांबवण्यात आला आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही. पण तरी तुझा चेहरा गर्विष्ठ आहे, जसा वारांगनेचा असतो तसा. तू तुझ्या कृत्यांबद्दल लाजत नाहीस.
4 Не аки ли домом Мене нарекла еси и Отцем и вождем девства твоего?
४माझ्या बापा, मी तरूण असताना तुच माझा जवळचा मित्र आहेस. असे आतापासून तू मला म्हणणार नाही काय.
5 Еда пребудет во век, или сохранится в победу? Сия глаголала еси, и сотворила еси злая, и возмогла еси.
५“तो नेहमीच रागावणार काय? तो राग सतत बाळगेल काय?” पाहा, “तू असे म्हणतेस, पण तू दुष्कृत्ये केली आहेस आणि ते सतत करीत आहेस.”
6 И рече Господь ко мне во дни Иосии царя: видел ли еси, яже сотвори ми дом Израилев? Поидоша на всяку гору высоку и под всяко древо листвяно и соблудиша тамо.
६नंतर योशीया राजाच्या दिवसात परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, इस्राएल माझ्या बाबतीत कसा अविश्वासू आहे, हे तू पाहिलेस का? एका व्यभिचारीणी प्रमाणे तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली व्यभिचार केला.
7 И рекох по внегда прелюбодействовати ему во всех сих: ко Мне обратися. И виде преступление его преступница Иудеа сестра его.
७मी म्हणालो, “ही दुष्कृत्ये करून झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.” पण ती माझ्याकडे परत आली नाही. तेव्हा इस्राएलने काय केले हे इस्राएलाच्या अविश्वासू बहीण, यहूदाने पाहिले.
8 И видех, яко о всех (изобличен есть), в нихже ят бысть, в нихже любодействова дом Израилев: сего ради отпустих и и дах ему книгу распустную в руце его. Обаче не убояся преступница Иудеа (сестра его), но иде и соблудила есть и та:
८धर्मत्यागी इस्राएल! या सर्व कारणांमुळे तीने व्यभिचार का केला हे मला दिसून आले आहे. तिने व्यभिचार केला म्हणून मी तिला सूटपत्र दिले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण यहूदा भयभीत झाली नाही आणि तिनेसुद्धा बाहेर जाऊन व्यभिचारीणीप्रमाणे व्यवहार केला.
9 и бысть ни во что блуд ея, и оскверни землю, и соблудила есть с каменем и со древом.
९तिने तिचा राष्ट्र “भ्रष्ट” केला ह्याची तिला पर्वा नव्हती, म्हणून दगड आणि लाकूड यांपासून त्यांनी मूर्ती तयार केल्या.
10 И во всех сих не обратися ко Мне преступница сестра ея Иудеа от всего сердца своего, но во лжи, рече Господь.
१०इस्राएलची विश्वासघातकी बहीण (यहूदा) मनापासून माझ्याकडे परत आली नाही, तर येण्याचे तिने फक्त ढोंग केले. असे परमेश्वर म्हणतो
11 И рече Господь ко мне: оправда душу свою отступница Израиль, паче преступницы Иудеи:
११तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “विश्वासहीन इस्राएल अविश्वासू यहूदापेक्षा अधिक नीतिमान ठरला आहे!
12 иди, и прочти словеса та к северу, и речеши: обратися ко мне, доме Израилев, рече Господь: и не утвержду лица Моего на вас, яко милостив Аз есмь, рече Господь, и не прогневаюся на вы во веки.
१२तू जाऊन ही वचने उत्तरेकडे घोषीत कर. परमेश्वर असे म्हणतो, हे विश्वासहीन इस्राएला, परत ये! परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्यावर नेहमीच संतापणार नाही, कारण मी विश्वासू आहे, मी सर्वकाळ क्रोध धरणार नाही.
13 Обаче веждь беззаконие твое, яко в Господа Бога твоего преступила еси, и расточила еси пути твоя чуждим под всяким древом листвяным, гласа же Моего не послушала еси, рече Господь.
१३तुम्ही पाप केले आहे, तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या देवाच्या, विरूद्ध गेलात. प्रत्येक हिरव्या झाडाखाली तू अन्य दैवतांसोबत आपले मार्ग वाटून घेतले, आणि माझा शब्द ऐकला नाही, असे परमेश्वर म्हणतो.
14 Обратитеся, сынове отступившии, глаголет Господь: яко Аз возобладаю вами и поиму вы единаго от града и двух от племене, и введу вас в Сион
१४अविश्वासू लोकहो, परत या. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी तुमचा पती आहे. मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे असे मी घेईन, आणि तुम्हास सियोनला आणीन.
15 и дам вам пастыри по сердцу Моему, и упасут вас разумом и учением.
१५माझ्या मना सारखे मेंढपाळ मी तुम्हास देईन, आणि ते तुम्हास ज्ञान आणि समज हे चारतील.
16 И будет, егда умножитеся и возрастете на земли, глаголет Господь, во дни оны не рекут ктому: кивот завета Святаго Израилева: не взыдет на сердце, ни воспомянется, ниже посетится, ниже сотворится ктому.
१६आणि त्या दिवसात असे होईल की, तुम्ही देशात बहूतपट असे व्हाल आणि फळ द्याल. परमेश्वर असे म्हणतो, त्या वेळेला, लोक पुन्हा कधीही असे म्हणणार नाहीत, परमेश्वराच्या कराराचा कोश, असे ते आणखी म्हणणार नाही. येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचारसुद्धा करणार नाहीत. ते कोणी बनवणार पण नाही.
17 Во дни оны нарекут Иерусалима престол Господень, и соберутся к нему вси языцы во имя Господне во Иерусалим, и не пойдут ктому вслед похотей сердца своего злейшаго.
१७त्या वेळेला यरूशलेम बद्दल अशी घोषणा करतील, हे परमेश्वराचे सिंहासन आहे आणि परमेश्वराच्या नावाचा मान राखण्यासाठी सर्व राष्ट्रे यरूशलेममध्ये एकत्र येतील. या पुढे ते त्यांच्या दुराग्रही आणि दुष्ट मनांचे अनुसरण करणार नाहीत.
18 Во днех тех приидет дом Иудин ко дому Израилеву, и пойдут вкупе от земли северныя и от всех стран к земли, юже дах в наследие отцем их.
१८त्या दिवसात यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्यासोबत चालेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील व मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
19 Аз же рех: да будет, Господи, яко положу тя в чада и дам тебе землю избранную, достояние Бога Вседержителя языков: и рекох: отцем наречете Мя и от Мене не отвратитеся.
१९मी म्हणालो, मी तुला लेकरांमध्ये कसे ठेवीन? आणि रमणीय देश, म्हणजे राष्ट्रांच्या सैन्याचे सुशोभित वतन, तुला कसे देईन? तेव्हा मी म्हटले तुम्ही मला माझ्या ‘पिता’ असे म्हणाल व मला अनुसरण्यापासून मागे फिरणार नाही.
20 Обаче якоже отвергается жена сожителя своего, тако отвержеся от Мене дом Израилев, рече Господь.
२०पण पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे तुम्ही आहात. इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे.” परमेश्वर असे म्हणतो.
21 Глас из устен слышан бысть плача и моления сынов Израилевых, яко беззаконноваша в путех своих, забыша Господа Бога святаго своего.
२१उजाड टेकड्यांवरुन येणारा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता, इस्राएली लोक रडत आहेत. कारण त्यांनी आपले मार्ग बदलले आणि मला, त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले.
22 Возвратитеся, сынове возвращаюшиися, и изцелю сокрушения ваша. Се, рабы мы будем Тебе, Ты бо еси Господь Бог наш.
२२“विश्वासहीन लोकांनो, परत या, मी तुमचा विश्वासघातकीपणा बरा करीन. पाहा! आम्ही तुझ्याकडे येण्याचे कारण म्हणजे तू आमचा देव परमेश्वर आहेस!”
23 Истинно лживи быша холми и множество гор, токмо Господем Богом нашим спасение Израилево.
२३टेकड्यांवरून आणि पर्वतांवरून फक्त खोटेपणा येतो, खचित इस्राएलचे तारण हे परमेश्वर आपल्या देवाच्या ठायी आहे,
24 Студ же пояде труды отец наших, от юности нашея, овцы их и телцы их, и сыны их и дщери их.
२४तरीही लाजेच्या देवाने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्वकाही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली, मेंढ्या व गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे गिळली आहेत.
25 Уснухом в постыдении нашем, и покры нас безчестие наше, яко Господу Богу нашему согрешихом, мы и отцы наши, от юности нашея даже до сего дне, и не послушахом гласа Господа Бога нашего.
२५आम्ही आपल्या लज्जेत पडू. आमची लाज आम्हांला झाको, कारण आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरूद्ध पाप केले. आम्ही आणि आमच्या वडिलांनी, आपल्या तरुणपणापासून या दिवसापर्यंत परमेश्वरा आमचा देव याचा शब्द ऐकला नाही.