< Книга пророка Иеремии 25 >

1 Слово, еже бысть ко Иеремии на вся люди Иудины, в лето четвертое Иоакима сына Иосиина, царя Иудина: то лето первое Навуходоносора царя Вавилонскаго:
यहूदातील सर्व लोकांबद्दल यिर्मयाकडे आलेले वचन, ते असे, यहूदाचा राजा योशीया, याचा मुलगा, यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, हे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या पाहिल्या वर्षात,
2 еже глагола Иеремиа пророк ко всем людем Иудиным и ко всем обитателем Иерусалима, рекий:
यहूदा लोकांस आणि यरूशलेमधील राहणाऱ्यांना यिर्मया संदेष्ट्याने पुढील संराष्ट्र घोषीत केला:
3 в третиенадесять лето Иосии сына Амосова, царя Иудина, и даже до дне сего, сие двадесять третие лето, бысть слово Господне ко мне, и глаголах к вам, заутра востая и глаголя: и не слышасте.
यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून तर गेली तेवीस वर्षे परमेश्वराचे वचन माझ्याकडे येत आले आहे, मी तेव्हापासून आजपर्यंत तुम्हास ते ऐकवित आलो. पण तुम्ही ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही.
4 И посылаше Господь к вам всех раб Своих пророк, востая заутра и посылая: и не слышасте, ни приклонисте ушес ваших, да слышите, егда глаголаше:
परमेश्वराने, त्याच्या सेवकांना संदेष्ट्यांना पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पाठवले, ते बाहेर जाण्यासाठी उत्सुक होते, पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही.
5 отвратитеся кийждо от пути своего злаго и от злейших умышлений ваших, и обитати будете в земли, юже Господь даде вам и отцем вашым, от века даже и до века:
ते संदेष्टे म्हणाले, “प्रत्येक मनुष्य आपल्या वाईट कृत्यांपासून, आपल्या कर्माच्या दुष्टतेपासून फिरा, आणि जे राष्ट्र परमेश्वराने तुम्हास आणि तुमच्या पूर्वजांना कायमचा राहण्यास दिला, त्यामध्ये जा.
6 и не ходите вслед богов чуждих, еже служити им и покланятися им, да не прогневаете Мя в делех рук ваших, еже озлобити вас.
म्हणून दुसऱ्या दैवतांना अनुसरायला आणि त्यांना पाया पडायला त्यांच्या मागे जाऊ नका आणि तुम्ही त्यास आपल्या हातांच्या कामाने मला राग आणू नका, म्हणजे मी तुमचे काही वाईट करणार नाही.”
7 И не послушасте Мя, рече Господь, еже не подвизати Мя ко гневу в делех руку вашею на зло вам.
परमेश्वर असे म्हणतो, “पण तुम्ही माझे ऐकले नाहीत, आणि तुम्हावर अरिष्ट यावे म्हणून तुम्ही आपल्या हातांच्या कामाने मला राग आणून दिला.”
8 Сего ради сия глаголет Господь Сил: понеже не послушасте словес Моих,
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा! “तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही.
9 се, Аз послю и возму вся племена северска, (рече Господь, ) и Навуходоносора царя Вавилонска раба Моего: и приведу их на землю сию и на обитатели ея и на вся языки, иже окрест ея, и убию их и поставлю их во ужас и во звиздание и в поношение вечное:
म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, या देशाविरूद्ध आणि त्यातील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध, तुझ्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध बोलावून घेईन. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी त्यांना नाश करण्यासाठी ठेवीण. आणि त्यांना विस्मय व फूत्कार व सर्व काळ ओसाड असे करीन.
10 и погублю от них глас радости и глас веселия, глас жениха и глас невесты, благоухание мира и свет светилника:
१०त्या ठिकाणच्या सुखाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. तेथे नव वर वधूचा सुखाचा शब्द उमटणार नाही, जात्यांचा आवाज येणार नाही आणि दिव्यातला प्रकाश नाहीसा होईल असे मी करीन.
11 и будет вся земля сия в запустение и во ужас, и поработают сии во языцех царю Вавилонску седмьдесят лет.
११आणि ती सगळी भूमी वैराण व वाळवंट होईल, आणि ही राष्ट्रे सत्तर वर्षांपर्यंत बाबेलाच्या राजाचे दास होतील.
12 Егда же исполнени будут седмьдесят лет, посещу на царя Вавилонска и на язык оный, рече Господь, беззакония их, и на землю Халдейску, и положу тую в запустение вечное,
१२परमेश्वर असे म्हणतो, आणि असे होईल सत्तर वर्षे संपल्यावर, मी बाबेलाच्या राजाला आणि त्या राष्ट्राला आणि खास्द्यांच्या देशाला त्यांच्या दुष्कृत्यांमुळे शिक्षा करीन.” त्या भूमीचे रुपांतर कायमच्या वाळवंटात करीन.
13 и наведу на землю ону вся словеса Моя, яже глаголах на ню, вся писанная в книзе сей, и елика пророчествова Иеремиа на вся языки:
१३आणि त्या देशाविरूद्ध जी काही वचने मी बोललो, म्हणजे जे काही या पुस्तकात लिहीले आहे, जे सगळ्या राष्ट्रांविषयी यिर्मयाने भविष्य सांगितले ते मी त्यांच्यावर आणीन.
14 яко работаша им, егда беша языцы мнози и царие велицы, и воздам им по делом их и по творению рук их,
१४त्यांना राष्ट्रांचे आणि मोठ्या राजांचे दास्य करावे लागेल. त्यांच्या कृत्यांबद्दल योग्य अशीच शिक्षा त्यांना मी देईन.
15 елико прорече Иеремиа до всех стран: тако бо глаголет Господь Бог Израилев: возми чашу вина нераствореннаго от руки Моея, да напоиши вся языки, к нимже Аз послю тя.
१५कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, त्याने मला हे सांगितले: “माझ्या हातातील क्रोधाच्या द्राक्षरसाचा प्याला घे आणि मी तुला पाठवतो त्या सर्व राष्ट्रांना हा द्राक्षरस प्यायला लाव.
16 И испиют и изблюют, и обуяют от лица меча, егоже Аз послю среде их.
१६कारण ते हा द्राक्षरस पितील आणि जी तलवार मी त्यांच्यामध्ये पाठवीन तिच्यामुळे ते मागेपुढे डोलतील व वेड्याप्रमाणे वागतील.”
17 И взях чашу от руки Господни и напоих вся языки, к нимже посла мя Господь:
१७मग मी परमेश्वराच्या हातातून द्राक्षरसाचा प्याला घेतला. देवाने मला पाठवलेल्या त्या सर्व राष्ट्रांत मी प्यायला लावला.
18 Иерусалима и грады Иудины, и цари его и князи его, яко положити я во опустение и в непрохождение, и во звиздание и в проклятие, яко день сей,
१८यरूशलेम, यहूदा शहर आणि तिच्यातील राजे आणि नेते यांना मी तो प्याला दिला, म्हणजे वैराण, विस्मय व वाळवंट, आणि फुत्कार व शाप असे होतील.
19 и фараона царя Египетскаго и отроков его, и вельможы его и вся люди его
१९दुसऱ्या राष्ट्रांनाही तो प्यावा लागेल, मी मिसरच्या राजा फारो, त्याच्या अधिकाऱ्यांना, त्याच्या सेवकांना, आणि त्याच्या लोकांस,
20 и вся примесники его, и вся цари земли Ус и вся цари иноплеменников, Аскалона и Газу, и Аккарона и останок Азота,
२०मी सर्व मिश्रित लोक, अरब व ऊस देशातील राजे, पलिष्ट्यांच्या देशातील सर्व राजे, अष्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोद शहरामधील उरलेले अशा सर्व राजांना त्या प्याल्यातून द्राक्षरस पिण्यास भाग पाडले.
21 и Идумею и Моавитиду и сыны Аммони,
२१आणि अदोम, मवाब व अम्मोन यामधील राजांनाही द्राक्षरस प्यायला लावले.
22 и вся цари Тирски и цари Сидонски и цари, иже об ону страну моря,
२२आणखी सोरच्या व सीदोनाचे सर्व राजे, समूद्राच्या दुसऱ्या बाजूस असणारे सर्व राजे,
23 и Дедана и Фемана, и Роса и всякаго остриженаго по лицу его,
२३आणि ददान, तेमा व बूज केसांच्या या कडा कापलेले सर्व लोक,
24 и вся цари Аравии и вся смесники обитающыя в пустыни,
२४अरबस्तानातील सर्व राजे, व जे मिश्रित लोक रानांत राहतात त्यांचे सर्व राजे,
25 и вся цари Замврийския и вся цари Еламския, и вся цари Персския
२५आणि जिमरी, एलाम व माद्य येथील सर्व राजे,
26 и вся цари от восточия, дальния и ближния, коегождо ко брату его, и вся царства, яже на лицы земли, и царь Сесах испиет последи их.
२६उत्तरेकडील सर्व, दूरच्या व जवळचे राजे या सर्वांना, या पृथ्वीवर असणारे सर्व, आपल्या राज्यांसहीत, भावांसहीत, त्या सर्वांना मी तो प्याला प्या प्यायला लावला आहे. पण बाबेलचा राजा, त्या सर्वांच्या नंतर या प्याल्यातून पिईल.
27 И речеши им: тако рече Господь Сил, Бог Израилев: пийте и упийтеся, и изблюйте и падите, и не востаните от лица меча, егоже Аз послю среде вас.
२७“परमेश्वर मला म्हणाला, यिर्मया, तू त्यांना असे सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो: प्या आणि त्यामुळे झिंगा आणि वांत्या करा, पडा आणि मी पाठवत असलेली तलवार येण्यापर्यंत परत उठू नका.
28 И будет, егда не восхотят прияти чаши от руки твоея, еже пити, речеши к ним: тако рече Господь: пиюще пийте.
२८मग ते तुझ्या हातातून प्यायला पिण्यास तयार नसतील तर, तू त्यांना असे सांग सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही खरोखरच या प्याल्यातून पिणारच.
29 Яко во граде, в немже именовася имя Мое, Аз начну озлобляти, и вы очищением не очиститеся: понеже мечь Аз призываю на вся седящыя на земли, рече Господь Сил.
२९कारण पाहा! माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नगरावर जर मी आपत्ती आणत आहे, तर तुम्हास शिक्षा होणार नाही असे कसे? तुमची सुटका होणार नाही, कारण मी पृथ्वीवरील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध तलवारीला पाठवणार आहे.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
30 Ты же проречеши на них вся словеса сия и речеши: Господь с высоты суд воздаст, от святаго Своего даст глас Свой, слово проречет на место Свое, сии же яко объемлюще виноград отвещают: и на вся седящыя на земли прииде пагуба,
३०“तर यिर्मया, तू त्यांना हे भविष्यवचन सांग, त्यांना बोल: परमेश्वर उंचावरुन गर्जना करतो, आणि त्याच्या पवित्र मंदिरातून आपला शब्द उच्चारील, तो त्याच्या कळपाविरूद्ध गर्जना करील. द्राक्षरस काढताना, द्राक्षे तुडविताना, लोक ज्याप्रमाणे मोठ्याने गातात, तसा, देशाच्या सर्व राहणाऱ्यांविरूद्ध तो ओरडेन.
31 на часть земли, яко суд во языцех Господу: судитися имать Той со всякою плотию, нечестивии же предани быша мечу, глаголет Господь.
३१तो आवाज पृथ्वीच्या शेवटापर्यंत येणार, कारण परमेश्वराचा विवाद राष्ट्रांविरूद्ध आहे, तो त्यांचा न्यायनिवाडा करणार. आणि तो सर्व देहावर न्यायव्यवस्था चालवणार. दुष्टांना तो तलवारीस देणार.” परमेश्वर असे म्हणतो.
32 Тако глаголет Господь: се, злая грядут от языка на язык, и вихорь велик исходит от конца земли.
३२सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “अरिष्टे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात पुढे जाणार, आणि पृथ्वीवरच्या अतिदूरच्या ठिकाणाहून वादळाची सुरुवात होईल.”
33 И будут язвении от Господа в день Господень, от края земли и до края земли: не оплачутся, ниже соберутся и не погребутся, в гной на лицы земли будут.
३३आणि जे परमेश्वरापासून मारले गेले, त्या लोकांची प्रेते पृथ्वीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पसरतील. त्यांच्यासाठी कोणीही शोक करणार नाही किंवा ती गोळा करणार नाही आणि पुरणारही नाही. शेणाप्रमाणे ती जमिनीवर पडतील.
34 Воскликните, пастуси и возопийте, и восплачите, овни овчии, яко исполнишася дние ваши на заколение, и падете якоже овни избраннии,
३४मेंढपाळांनो विलाप करा आणि मदतीसाठी रडा. कळपातील धन्यांनो जमिनीवर लोळा. कारण ही तुला मारल्या जाण्याचा आणि विखरण्याचा दिवस आला आहे. तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पडाल.
35 и изгибнет бегство от пастухов и спасение от овнов овчих.
३५मेंढपाळांना लपायला कोठेही आश्रय राहणार नाही. आणि कळपातील धन्यांना सुटता येणार नाही.
36 Глас вопля пастырска и кличь овец и овнов, яко потреби Господь пажити их:
३६मग मेंढपाळांच्या दुःखाचे रडणे आणि कळपाच्या धन्याचा विलाप तिथे असेल. कारण परमेश्वर त्यांच्या कळपाचा विनाशक झाला आहे.
37 и умолкнут останцы мира от лица ярости гнева Господня.
३७त्या शांत कुरणांचा नाश केला जाईल आणि ती ओसाड वाळवंट होतील. परमेश्वराचा संतप्त क्रोध हा,
38 Остави якоже лев виталище Свое, яко бысть земля их в непрохождение от лица меча великаго.
३८जसा गुहेत राहणाऱ्या तरुन सिंहाप्रमाणे, ज्याने आपली गुहा सोडली आहे त्याप्रमाणे असेल. कारण पीडणाऱ्या तलवारींमुळे व त्याच्या संतप्त क्रोधामुळे त्यांचा देश ओसाड झाला आहे.

< Книга пророка Иеремии 25 >