< Книга пророка Исаии 52 >
1 Востани, востани, Сионе, облецыся во крепость твою, Сионе, и ты облецыся во славу твою, Иерусалиме, граде святый, ктому не приложит проити сквозе тя необрезанный и нечистый.
१सियोने, जागी हो, जागी हो, आपली शक्ती धारण कर, यरूशलेमे, पवित्र नगरी, तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर. कारण यापुढे सुंता न झालेला व अपवित्र असा कोणी पुन्हा तुझ्यामध्ये येणार नाही.
2 Истряси прах и востани, сяди, Иерусалиме, совлецы узу выи твоея, плененая дщи Сионя.
२तुझ्या अंगावरची धूळ झटक, यरूशलेमे, ऊठ, उठून बस, सियोनेच्या बंदीवान कन्ये तू कैदी होतीस, तुझ्या मानेचा साखळदंड काढून टाक.
3 Яко сия глаголет Господь: туне продани бысте, и не сребром избавитеся.
३परमेश्वर म्हणतो, “तुम्ही फुकट विकले गेला होता, आणि तुमची मुक्तता पैशावाचून करण्यात आली आहे.”
4 Тако глаголет Господь: во Египет снидоша людие Мои прежде, еже пришелцем быти тамо, и во Ассирию нуждею отведошася.
४कारण परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “सुरूवातीला माझे लोक खाली मिसरांत तात्पुरते राहण्यासाठी गेले होते. अश्शूरने अलीकडेच त्यांच्यावर जुलूम केला आहे.
5 И ныне что зде есте? Сия глаголет Господь: яко взяшася людие Мои туне, чудитеся и плачитеся. Тако глаголет Господь: вас ради присно имя Мое хулится во языцех.
५परमेश्वर असे म्हणतो, काय घडले आहे ते आता पाहा माझ्या लोकांस फुकट नेण्यात आले आहे, तर आता माझे इथे काय काम आहे? जे त्यांच्यावर अधिकार चालवतात ते आक्रंदन करतील आणि पूर्ण दिवस माझ्या नावाची निंदा होत आहे.”
6 Сего ради познают людие Мои имя Мое в той день, яко Аз есмь Сам глаголяй, ту есмь.
६यास्तव माझे लोक माझे नाव जाणतील, यामुळे त्या दिवशी ते जाणतील त्यांच्याशी बोलणारा मीच आहे, होय तो मीच आहे.
7 Коль красны на горах ноги благовествующих мир, благовествующих благая, яко слышано сотворю спасение твое, глаголя: Сионе, воцарится Бог твой.
७“शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी जो घोषणा करतो, त्याचे पाय पर्वतांवर किती सुंदर आहेत.
8 Яко глас хранящих тя вознесеся, и гласом вкупе возрадуются: яко очи ко очесем воззрят, егда помилует Господь Сиона.
८तुझ्या पाहारेकऱ्यांचा उंचावलेला आवाज ऐक, ते एकत्र येऊन हर्षाने ओरडत आहेत. कारण त्यांच्यातील प्रत्येकाने परमेश्वरास सियोनेला परत येताना पाहिले आहे.
9 Да отрыгнут веселие вкупе пустыни Иерусалимския, яко помилова Господь людий Своих и избави Иерусалима:
९यरूशलेमेच्या ओसाड स्थळांनो, आनंदाने एकत्र गायन करीत सुटा, कारण परमेश्वराने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे. त्याने यरूशलेमेला खंडूण घेतले आहे.
10 и открыет Господь мышцу Свою святую пред всеми языки, и узрят вси концы земли спасение, еже от Бога нашего.
१०परमेश्वराने सर्व राष्ट्रांसमोर आपला पवित्र भूज दिसण्याजोगा केला आहे. सर्व पृथ्वी आमच्या देवाचे तारण पाहील.
11 Отступите, отступите, изыдите отсюду и нечистоте не прикасайтеся, изыдите от среды его, отлучитеся, носящии сосуды Господни:
११तुम्ही निघा, तुम्ही निघा, तुम्ही येथून निघून जा, अपवित्र गोष्टींना स्पर्श करू नका. तुम्ही त्यामधून निघून जा, जे तुम्ही परमेश्वराची पात्रे वाहता ते तुम्ही आपणाला शुद्ध करा.
12 яко не с мятежем изыдете, ниже убежанием пойдете: пойдет бо пред вами Господь, и собираяй вы Господь Бог Израилев.
१२कारण तुम्ही घाईने निघणार नाही, किंवा तुम्हास पळून जाणे भाग पडणार नाहीत. कारण परमेश्वर तुमच्यापुढे जाणार, आणि इस्राएलचा देव तुमच्या पाठीशी असेल.
13 Се, уразумеет отрок Мой и вознесется и прославится зело.
१३माझ्या सेवकाकडे पाहा. तो सुज्ञपणे व्यवहार करणार आणि यशस्वी होणार. तो उंचावला जाईल आणि उंच व थोर होईल.
14 Якоже ужаснутся о Тебе мнози, тако обезславится от человек вид Твой, и слава Твоя от сынов человеческих.
१४“माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांस धक्का बसला. त्याचे रुप कोणाही मनुष्यापेक्षा बिघडलेले होते, म्हणून त्याचे रुप दुसऱ्या मनुष्यांपेक्षा फार वेगळे होते.
15 Тако удивятся языцы мнози о Нем, и заградят царие уста своя: яко, имже не возвестися о Нем, узрят, и иже не слышаша, уразумеют.
१५तो पुष्कळ राष्ट्रांस शिंपडील, त्याच्याकडे पाहून राजे आपली तोंडे बंद करतील, कारण जे त्यांना सांगितले नव्हते ते पाहतील, आणि जे त्यांनी ऐकले नव्हते ते समजतील.”