< Книга пророка Осии 14 >
1 Обратися, Израилю, ко Господу Богу твоему, зане изнемогл еси в неправдах твоих.
१हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे.
2 Возмите с собою словеса и обратитеся ко Господу Богу вашему, рцыте Ему: (можеши всяк отврещи грех: ) яко да не приимете неправды, но да приимете благая, и воздадим плод устен наших.
२कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा, आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु, आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू.
3 Ассур не спасет нас, на кони не взыдем, ксему не речем:
३अश्शूर आम्हास तारणार नाही, आम्ही युध्दासाठी घोड्यावर स्वार होणार नाही, यापुढे आमच्या हाताच्या मूर्तीस आमचा देव म्हणणार नाही, कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते.
4 бози наши, делам рук наших: яко в Тебе помилуется сирота. Изцелю селения их, возлюблю я явленно, яко отвратися гнев Мой от них.
४ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे.
5 Буду якоже роса Израилю, процветет яко крин и прострет корение свое якоже Ливан.
५मी इस्राएलास दहीवरासारखा होईल, तो भुकमळासारखा फुलेल आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मुळ धरील.
6 Пойдут ветви его, и будет якоже маслина плодовита, и обоняние его аки Ливана:
६त्याच्या फांद्या पसरतील, त्याची सुंदरता जैतून वृक्षासारखी होईल, आणि त्याचा सुगंध लबानोनातील देवदार वृक्षासारखा होईल.
7 обратятся и сядут под кровом его, поживут и утвердятся пшеницею, и процветет яко виноград память его, якоже вино Ливаново.
७त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील, ते धान्यासारखे पुनर्जिवित होतील; आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील, त्याची प्रतिष्ठा लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल.
8 Ефремови что ему еще и кумиром? Аз смирих его, Аз и укреплю его: аки смерчие учащеное, от Мене обретеся плод твой.
८एफ्राईम म्हणेल, या मूर्त्यांचे मी काय करु? मी त्यास उत्तर देईन त्याची काळजी घेईन मी सारखा सदाहरित आहे, माझ्यातून तुला फळ मिळते.
9 Кто премудр и уразумеет сия? И смыслен, и увесть сия? Яко правы путие Господни, и праведнии пойдут в них, а нечестивии изнемогут в них.
९कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील? कोण समंजस आहे ज्याला ते समजेल? परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, आणि धार्मिक त्यामध्ये चालतील पण बंडखोर त्यामध्ये अडखळून पडतील.