< Второзаконие 7 >

1 И будет егда введет тя Господь Бог твой в землю, в нюже входиши тамо наследити ю, и изженет языки великия и многия от лица твоего, Хеттеа и Гергесеа, и Аморреа и Хананеа, и Ферезеа и Евеа и Иевусеа, седмь языков великих и многих, и крепчае вас:
जो देश वतन करून घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हास नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल.
2 и предаст их Господь Бог твой в руце твои, и избиеши я, пагубою погубиши я, да не завещаеши к ним завета, ниже да помилуеши их,
तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका.
3 ниже сватовства сотвориши с ними: дщери своея не даси сыну его, и дщере его да не поймеши сыну твоему:
त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करून घेऊ नका.
4 отвратит бо сына твоего от Мене, и послужит богом инем: и разгневается Господь гневом на вы, и потребит тя вскоре.
कारण ते लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजन पूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील. खोट्या देवांचा नाश करा
5 Но сице да сотворите им: требища их разсыплете, и столпы их да сокрушите, и дубравы их да посечете, и ваяния богов их да сожжете огнем:
त्या देशात तुम्ही असे करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका. त्यांचे स्मारकस्तंभ फोडून टाका. अशेरा दैवताचे स्तंभ उपटून टाका, मूर्ती जाळून टाका.
6 яко люди святи есте Господеви Богу вашему: и вас избра Господь Бог ваш, да будете Ему люди избранни паче всех языков, елицы на лицы земли.
कारण तुम्ही तुमचा देव परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे.
7 Не яко мнози есте паче всех язык, предприя вас Господь и избра вас Господь, вы бо есте меншии от всех языков:
परमेश्वराने प्रेमाने तुम्हासच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता.
8 но яко возлюби Господь вас, и храня клятву, еюже клятся отцем вашым, изведе Господь вас рукою крепкою и мышцею высокою, и избави тя от дому работы, от руки фараона царя Египетска,
पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हास दास्यातून मुक्त करून परमेश्वराने तुम्हास मिसर देशाबाहेर आणले, फारो राजाच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमची पूर्वजांना दिलेले वचन त्यास पाळायचे होते.
9 и да увеси, яко Господь Бог твой Сей Бог: Бог верный, храняй завет Свой и милость любящым Его и хранящым заповеди Его в тысящы родов:
तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजारो पिढ्यांवर तो दया करतो.
10 и воздаяй ненавидящым Его в лице потребити я, и не умедлит ненавидящым, в лице воздаст им.
१०पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही.
11 И да сохраниши заповеди и оправдания и суды сия, елика аз заповедаю тебе творити днесь.
११तेव्हा ज्या आज्ञा व विधी, नियम आज मी सांगितले त्यांचे काळजीपूर्वक पालन करा.
12 И будет егда послушаете вся оправдания сия, и сохраните и сотворите я, сохранит и Господь Бог твой тебе завет и милость, якоже клятся отцем вашым,
१२मग असे होईल की, तुम्ही हे विधी ऐकले, पाळले, व आचरले तर त्यामुळे तुमचा देव परमेश्वर याने तुमच्या पुर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार व प्रेमदया तो तुमच्यावरही राखील.
13 и возлюбит тя, и благословит тя и умножит тя, и благословит плод чрева твоего и плод земли твоея, пшеницу твою и вино твое и елей твой, и стада волов твоих и паствы овец твоих на земли, юже клятся Господь отцем твоим дати тебе:
१३तो तुमच्यावर प्रेम करील, तुम्हास आशीर्वाद देईल. तुमच्या राष्ट्राची तो वाढ करील. तो तुमच्या मुलाबाळांना आर्शीवाद देईल. तुमची शेते पिके तो आशीर्वादीत करील. तो तुम्हास धान्य, नवीन द्राक्षरस व तेल देईल. तुमची गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांना तो आशीर्वाद देईल. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशात हे सर्व आशीर्वाद तो तुम्हास देईल.
14 и благословен будеши паче всех язык и не будет в вас безчадный, ниже неплоды, и в скотех твоих:
१४इतरांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादीत व्हाल. प्रत्येक दांपत्याला मुले आणि मुली होतील. गाई वासरांना जन्म देतील.
15 и отимет Господь Бог твой от тебе всяко разслабление и всяку язю Египетскую злую, яже видел еси и елика веси: не возложит на тя, но возложит я на вся ненавидящыя тебе:
१५परमेश्वर सर्व आजार काढून टाकील. मिसर देशात तुम्हास माहीत असलेली कोणतीही भयंकर रोगराई इथे होणार नाही. हे रोग परमेश्वर तुमच्या शत्रूंवर आणील.
16 и ясти будеши вся корысти языков, яже Господь Бог твой дает тебе: да не пощадит их око твое, и да не послужиши богом их, яко претыкание тебе есть сие.
१६तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करून विध्वंस करा. त्यांच्याबाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची सेवा करु नका. कारण ती दैवते म्हणजे तुम्हास अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल.
17 Аще же речеши во уме твоем: яко язык сей множае паче мене, како возмогу аз потребити я?
१७ही राष्ट्रे आपल्यापेक्षा बलवान आहेत, त्यांना आम्ही कसे घालवून देऊ असा विचारही मनात आणू नका.
18 Не убоишися их: памятию да помянеши, елика сотвори Господь Бог твой фараону и всем Египтяном,
१८त्यांची मुळीच भीती बाळगू नका. आपल्या परमेश्वर देवाने फारोचे आणि मिसर देशाचे काय केले ते आठवा.
19 искушения великая, яже видеста очи твои, знамения она и чудеса великая, руку крепкую и мышцу высокую, якоже изведе тя Господь Бог твой: тако сотворит Господь Бог ваш всем языком, ихже ты боишися от лица их:
१९त्यांच्यावर कशी भयंकर संकटे आणली, काय चमत्कार केले हे तुम्ही पाहिलेले आहे. तुम्हास मिसर देशा बाहेर काढतानाचे त्याचे प्रताप व सामर्थ्य तुम्हास माहीत आहेत. ज्या लोकांची तुम्हास भीती वाटत आहे त्यांच्याविरुध्द तुमचा देव परमेश्वर असेच सामर्थ्य वापरील.
20 и шершни послет Господь Бог твой на них, дондеже потребятся оставшиися и сокрывшиися от тебе:
२०याव्यतिरिक्त, जे तुमच्या तावडीतून निसटतील, लपून बसतील त्यांच्या मागावर परमेश्वर आपला देव गांधीलमाश्या पाठवील. त्यामुळे त्यांचाही नाश होईल.
21 не повредишися от лица их: яко Господь Бог твой в тебе, Бог великий и крепкий:
२१तेव्हा त्यांना घाबरु नका. कारण परमेश्वर आपला देव तुमच्याबरोबर आहे. तो महान आणि भययोग्य देव आहे.
22 и погубит Господь Бог твой языки сия от лица твоего, помалу малу: не возможеши погубити их вскоре, да не будет земля пуста, и умножатся зверие дивии на тя:
२२त्या राष्ट्रांना आपला देव परमेश्वर हळूहळू घालवून देईल. त्यांचा तुम्ही एकाच वेळी विध्वंस करणार नाही. कारण तसे झाले तर वन्यपशूंची संख्या फार वाढेल व ते तुम्हास त्रास देतील.
23 и предаст их Господь Бог твой в руце твои, и погубиши их погублением великим, дондеже искорените их:
२३पण त्या राष्ट्रांचा बिमोड करण्यात तुमचा देव परमेश्वर तुम्हास साहाय्य करील. युद्धात त्यांच्यात गोंधळ माजवील आणि शेवटी त्यांचा नाश होईल.
24 и предаст цари их в руце твои, и погубите имя их от места онаго: ниже един постоит пред лицем твоим, дондеже погубиши их.
२४परमेश्वराच्या मदतीने तुम्ही त्यांच्या राजांचा पराभव कराल, त्यांना ठार कराल आणि जगाच्या आठवणीतूनही ते पुसले जातील. कोणीही तुम्हास अडवू शकणार नाही. तुम्ही सर्वांचा विध्वंस कराल!
25 Ваяния богов их да сожжете огнем, да не похощеши злата и сребра взяти себе от них, да не когда согрешиши того ради, яко мерзость есть Господеви Богу твоему:
२५त्यांच्या दैवतांच्या मूर्ती तुम्ही आगीत टाकून जाळून टाका. त्या मूर्तीवरच्या चांदीसोन्याचा मोह धरू नका, ते घेऊ नका, कारण तो सापळाच आहे, त्याने तुमचे आयुष्य बरबाद होईल. आपला देव परमेश्वर याला त्यांचा वीट आहे.
26 и да не внесеши мерзости в свой дом, и проклят будеши якоже сия: ненавидением да возненавидиши, и омерзением да омерзиши, яко проклятие есть.
२६त्या अमंगळ, हानिकारक मूर्ती तुम्ही घरीही आणू नका. त्यांचा अव्हेर कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे.

< Второзаконие 7 >