< Вторая книга Паралипоменон 20 >

1 По сих же приидоша сынове Моавли и сынове Аммони и с ними от Амманитов ко Иосафату на брань.
यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनी लोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटावर चालून आले.
2 Приидоша же и сказаша Иосафату, глаголюще: идет противу тебе велико множество от об он пол моря от Сирии, и се, стоят во Асасан-Фамаре, иже есть Енгадди.
काही लोकांनी येऊन यहोशाफाटाला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करून येत आहे. ती हससोन-तामार!” म्हणजेच एन-गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा.
3 И убояся, и вдаде Иосафат лице свое взыскати Господа, и проповеда пост во всей Иудеи.
यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वरास काय करावे, असे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली.
4 И собрася весь Иуда взыскати Господа: и от всех градов Иудиных приидоша ко умолению Господню.
तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले.
5 И ста Иосафат в собрании Иуды во Иерусалиме, в дому Господни пред лицем двора новаго,
यहोशाफाट, परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांमध्ये तो उभा राहिला.
6 и рече: Господи Боже отец наших, не Ты ли еси Бог на небеси горе, и Ты владычствуеши всеми царствы язык, и в руку Твоею есть крепость силы, и кто противостанет Тебе?
तो म्हणाला, “आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रामधल्या सर्व राज्यांचा तूच शास्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही.”
7 Не Ты ли еси Бог наш искоренивый живущыя на земли сей от лица людий Твоих Израиля, и дал еси ю семени Авраамлю возлюбленному Твоему во веки?
तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्यांना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलादेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस.
8 И вселишася на ней, и устроиша в ней святыню имени Твоему, глаголюще:
अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाकरिता त्यांनी मंदिर बांधले.
9 аще нападут на ны злая, мечь, суд, губителство, глад, станем пред домом сим и пред Тобою, яко призвано имя Твое в дому сем, и возопием к Тебе от скорбей наших, и услышиши и спасеши:
ते म्हणाले, तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे, “संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु, आमची हाक ऐकून तू आम्हास सोडव.”
10 и ныне се, сынове Аммони и Моавли и гора Сиир, сквозе яже не изволил еси Израилю проити, егда исхождаху от земли Египетския, но уклонишася от них и не избиша их:
१०“पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेईर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांस तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही.
11 и се, ныне сии нападают на ны исходяще изгонити нас от наследия нашего, еже предал еси нам.
११पण तेव्हाच त्यांच्या नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हास आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हास बहाल केला आहेस.
12 Господи Боже наш, не судиши ли им? В нас бо несть толика крепость, да можем сему множеству сопротивитися, еже нападе на ны, и не вемы что соделати имамы им: но токмо очи наши к Тебе.
१२हे देवा, या लोकांस चांगले शासन कर. आमच्यावर चाल करून येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हास काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहे.”
13 И весь Иуда стояше пред Господем, и чада их, и жены их.
१३यहूदातील सर्व मंडळी आपल्या पत्नी आणि तान्ह्या मुलांसकट सर्व अपत्यांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती.
14 Бе же Иозиил сын Захариин, сынов Ванеа, сынов Елеила, сынов Мафаниа левитина, от сынов Асафовых, и бысть на нем Дух Господень посреде народа,
१४तेव्हा यहजीएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. यहजीएल हा जखऱ्याचा पुत्र. जखऱ्या बनायाचा पुत्र. बनाया यईएलाचा पुत्र. आणि यईएल मत्तन्याचा पुत्र. यहजीएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता. या सभेत
15 и рече: слышите, весь Иуда и обитающии во Иерусалиме, и ты, царю Иосафате: сия рече Господь вам: не бойтеся, ниже ужасайтеся от лица народа сего многаго, несть бо ваше ополчение, но Божие:
१५यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरूशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे.
16 заутра изыдите противу их: се, восходят по восходу Ассис, и обрящете их на краи реки противу пустыни Иериил:
१६उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल.
17 не ваше есть воевати: сия разумейте и узрите сие спасение Господне с вами, Иудо и Иерусалиме: не убойтеся, ни ужасайтеся заутра изыти противу их, и Господь с вами.
१७तुम्हास या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हास आढळून येईल. यहूदा आणि यरूशलेम लोकहो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्यासोबत आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.”
18 И преклонься Иосафат на лице свое, и весь Иуда, и обитающии во Иерусалиме, падоша пред Господем поклонитися Господеви.
१८यहोशाफाटाने मस्तक भूमीपर्यंत लववले. यहूदा आणि यरूशलेममधील सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे दंडवत घातले. त्या सर्वांनी परमेश्वराची आराधना केली.
19 И восташа левити от сынов Каафовых и от сынов Кореовых, хвалити Господа Бога Израилева гласом великим в высоту.
१९कहाथ आणि कोरह या घराण्यांतील लेवी इस्राएलच्या परमेश्वर देवाची भजने म्हणण्यास उभे राहिले. उच्च स्वरात त्यांनी परमेश्वराची भजने म्हटली.
20 И заутра восташа рано и изыдоша в пустыню Фекое. И внегда исходити им, ста Иосафат (посреде их), и возопи и рече: услышите мя, мужие Иудины и вси обитающии во Иерусалиме: веруйте в Господа Бога нашего и уверитеся: веруйте пророку Его, и благопоспешится вам.
२०यहोशाफाटाचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरूशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.”
21 И советова с людьми, и постави псалмопевцы, и хвалящих исповедатися, и хвалити святая, внегда изыти пред силою, и глаголаху: исповедайтеся Господеви, яко благ, яко в век милость Его.
२१यहोशाफाटाने लोकांस प्रोत्साहन दिले व सूचना दिल्या. परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यांनी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले, “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची प्रीती सर्वकाळ आहे.”
22 Егда же начаша хваления и исповедания, обрати Господь воевати сынов Аммоних на Моава и гору Сиир, изшедших на Иуду, и поражени быша.
२२लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने यहूदावर चाल करून आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेईर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली.
23 И восташа сынове Аммони и Моавли на обитающих в горе Сиири, да побиют их и сокрушат: и егда скончаша обитающих в Сиире, восташа друг на друга, да потребятся.
२३अम्मोनी आणि मवाबी लोक सेईर पर्वतातल्या लोकांशी लढू लागले. अम्मोन्यांनी आणि मवाब्यांनी त्यांचा पुरता संहार केला. सेईरातल्या लोकांचा बीमोड केल्यानंतर त्यांनी एकमेकांचा नाश केला.
24 Иуда же прииде на созирание от пустыни, и воззре, и виде множество: и се, вси мертви падше на землю, и не бе спасыйся.
२४यहूदी लोक वाळवंटातील टेहळणीच्या बुरुजापाशी आले. शत्रूचे विशाल सैन्य कुठे दिसते का हे ते पाहू लागले पण त्यांना फक्त जमिनीवर विखुरलेले मृतदेह तेवढे दिसले. कोणीही जिवंत राहिला नव्हता.
25 И изыде Иосафат и людие его взяти корысти их, и обретоша скота много, и одежды, и корысти, и сосуды дражайшыя и плениша их: и быша собирающе корысти их три дни, яко многи бяху.
२५यहोशाफाट आणि त्याचे सैन्य लुटीसाठी मृतदेहापाशी आले. त्यामध्ये त्यांना खूप, धन, आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या. त्या त्यांनी स्वत: ला घेतल्या. लूट एवढी होती की ती यहोशाफाट आणि त्याचे लोक यांना नेता येईना. ती प्रेतांमधून काढून न्यायला त्यांना तीन दिवस लागले.
26 Дне же четвертаго собрахуся во удоль благословения, ибо тако благословиша Господа: сего ради прозваша место то удоль благословения даже до сего дне.
२६चौथ्या दिवशी यहोशाफाट आणि त्याचे सैन्य बराखाच्या खोऱ्यात जमले. याठिकाणी त्यांनी परमेश्वरास धन्यवाद दिले. म्हणून आजही या खोऱ्याचे नाव आशीर्वादाचे खोरे असे आहे.
27 И возвратишася вси мужие Иудины во Иерусалим и Иосафат вождь их с веселием великим: яко возвесели их Господь о вразех их.
२७मग यहोशाफाटाने समस्त यहूदा आणि यरूशलेम लोकांस यरूशलेम येथे माघारी नेले. परमेश्वराने त्यांच्या शत्रूंचा पाडाव केल्यामुळे त्यांच्यात आनंदी आनंद पसरला होता.
28 И внидоша во Иерусалим со псалтирми и гусльми и трубами в дом Господень.
२८यरूशलेमेला येऊन ते सतारी, वीणा व कर्णे घेऊन परमेश्वराच्या मंदिरात गेले.
29 И бысть страх Господень на вся царства земная, внегда услышати им, яко порази Господь враги Израилевы.
२९परमेश्वराने इस्राएलाच्या शत्रू सैन्याशी लढा दिला हे ऐकून सर्व देशांमधल्या सर्व राज्यांमध्ये परमेश्वराविषयी धाक निर्माण झाला.
30 И умирися царство Иосафатово, и даде ему Господь покой окрест.
३०त्यामुळे यहोशाफाटाच्या राज्यात शांतता नांदली. देवाने यहोशाफाटाला सर्व बाजूंनी स्वास्थ्य दिले.
31 И царствова Иосафат над Иудою, сый лет тридесяти пяти, егда царство прия и двадесять пять лет царствова во Иерусалиме. Имя же матери его Азува, дщи Салиина.
३१यहोशाफाटाने यहूदा देशावर राज्य केले. राज्यावर आला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर पंचवीस वर्षे राज्य केले. यहोशाफाटाच्या आईचे नाव अजूबा ही शिल्हीची कन्या.
32 И хождаше в путех отца своего Асы, и не уклонися от них творити правое пред Господем:
३२आपले पिता आसा यांच्याप्रमाणेच यहोशाफाट योग्य मार्गाने वागला. त्याने मार्ग सोडला नाही. परमेश्वराच्या दृष्टीने भले तेच यहोशाफाटाने केले.
33 обаче высокая еще бяху, и еще людие не управиша сердца своего ко Господу Богу отец своих.
३३पण उच्चस्थाने काढण्यात आली नव्हती. लोकांनीही आपले मन आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळवले नव्हते.
34 Прочая же деяния Иосафатова первая и последняя, се, писана суть во словесех Ииуа сына Ананиина, иже написа книгу царей Израилевых.
३४हनानीचा पुत्र येहू याच्या बखरीमध्ये यहोशाफाटाच्या बाकीच्या कृत्यांची संपूर्ण नोंद आहे. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात या गोष्टींचा समावेश करून त्यांची नोंद केली आहे.
35 И по сих сообщися Иосафат царь Иудин со Охозиею царем Израилевым, и сей беззаконнова,
३५इस्राएलचा राजा अहज्या याच्याशी पुढे यहूदाचा राजा यहोशाफाट याने करार केला. यहोशाफाट ने हे वाईट केले.
36 занеже сотвори, и отиде к нему, да сотворят корабли, еже ити во Фарсис: и сотвори корабли в Гасион-Гавере.
३६तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एसयोन-गेबेर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली.
37 И пророчествова Елиезер сын Додиа от Марисиса на Иосафата, глаголя: понеже возимел еси любовь со Охозиею, сокруши Господь дело твое, и сокрушишася корабли твоя и не возмогоша поити во Фарсис.
३७पुढे अलियेजर ने यहोशाफाटाविरुध्द भविष्य सांगितले. मारेशा नगरातला दोदावाहू याचा अलियेजर हा पुत्र. तो म्हणाला, “यहोशाफाट, तू अहज्याशी हातमिळवणी केलीस म्हणून परमेश्वर तुझ्या कामांचा विध्वंस करील.” आणि जहाजे फुटली. त्यामुळे यहोशाफाट आणि अहज्या यांना ती तार्शीशला पाठवता आली नाहीत.

< Вторая книга Паралипоменон 20 >