< Первое послание к Тимофею 1 >
1 Павел, посланник Иисус Христов по повелению Бога Спаса нашего и Господа Иисуса Христа упования нашего,
१देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून:
2 Тимофею присному чаду в вере: благодать, милость, мир от Бога Отца нашего и Христа Иисуса Господа нашего.
२विश्वासातील माझे खरे मूल तीमथ्य यास आपला देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून कृपा, दया आणि शांती असो.
3 Якоже умолих тя пребыти во Ефесе, идый в Македонию, да завещаеши неким не инако учити,
३मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंती केली होती तशी आताही करतो की, तू इफिसात रहावे, जेणेकरून तू कित्येकास निक्षून सांगावे की, त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये.
4 ниже внимати баснем и родословием безконечным, яже стязания творят паче, нежели Божие строение, еже в вере.
४आणि जी दैवी व्यवस्था विश्वासाच्याद्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका. तेच मी आतांही सांगतो.
5 Конец же завещания есть любы от чиста сердца и совести благия и веры нелицемерныя,
५आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी.
6 в нихже нецыи погрешивше, уклонишася в суесловия,
६या गोष्टी सोडून कित्येकजण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत.
7 хотяще быти законоучителе, не разумеюще ни яже глаголют, ни о нихже утверждают.
७त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.
8 Вемы же, яко добр закон (есть), аще кто его законне творит,
८परंतु आम्हास हे माहीत आहे की, कोणी नियमशास्त्राचा खरोखरच यथार्थ उपयोग केल्यास ते चांगले आहे.
9 ведый сие, яко праведнику закон не лежит, но беззаконным и непокоривым, нечестивым (же) и грешником, неправедным и скверным, отца и матере досадителем, мужеубийцам,
९आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन, अधर्मी, अशुद्ध, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक
10 блудником, мужеложником, разбойником, (клеветником, скотоложником, ) лживым, клятвопреступником, и аще что ино здравому учению противится,
१०जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुद्ध शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीही आहे.
11 по благовестию славы блаженнаго Бога, еже мне уверено бысть.
११गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.
12 И благодарю укрепляющаго мя Христа Иисуса Господа нашего, яко верна мя непщева, положив (мя) в службу,
१२ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे.
13 бывша мя иногда хульника и гонителя и досадителя: но помилован бых, яко неведый сотворих в неверствии:
१३जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली.
14 упреумножися же благодать Господа нашего (Иисуса Христа) с верою и любовию яже о Христе Иисусе.
१४परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली.
15 Верно слово и всякаго приятия достойно, яко Христос Иисус прииде в мир грешники спасти, от нихже первый есмь аз.
१५ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की, ख्रिस्त येशू पापी लोकांस तारावयला जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे.
16 Но сего ради помилован бых, да во мне первем покажет Иисус Христос все долготерпение, за образ хотящих веровати Ему в жизнь вечную. (aiōnios )
१६परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर ख्रिस्त येशूने सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे. (aiōnios )
17 Царю же веков нетленному, невидимому, единому премудрому Богу, честь и слава во веки веков. Аминь. (aiōn )
१७आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन. (aiōn )
18 Сие же завещание предаю ти, чадо Тимофее, по бывших на тя прежде пророчествиих, да воинствуеши в них доброе воинство,
१८तीमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी.
19 имея веру и благую совесть, юже нецыи отринувше, от веры отпадоша:
१९आणि विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरुपी तारू फुटले.
20 от нихже есть Именей и Александр, ихже предах сатане, да накажутся не хулити.
२०त्यामध्ये हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, निंदा न करण्यास शिकावे.