< Ruka 21 >
1 Zvino wakati atarira kumusoro akaona vafumi vachikanda zvipo zvavo muchivigiro chezvipo.
१येशूने दृष्टी वर करून श्रीमंत लोकांस दानपेटीत दान टाकतांना पाहीले.
2 Uye wakaonawo imwe chirikadzi murombo ichikandamo tumari twemhangura tuviri.
२त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी म्हणजे एक दमडी टाकताना पाहिले.
3 Ndokuti: Zvirokwazvo ndinoti kwamuri: Chirikadzi iyi murombo yakanda kupfuura vese;
३तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले.
4 nokuti avo vese vakanda muzvipo zvaMwari pamuraudziro wavo, asi iye, paurombo hwake wakanda chese chaaiva nacho chaairarama nacho.
४कारण या सर्वांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु हिने गरीब असूनही आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”
5 Zvino vamwe vachiri kutaura pamusoro petembere, kuti yakange yakashongedzwa nemabwe akanaka nezvipo, wakati:
५शिष्यातील काहीजण परमेश्वराच्या भवनाविषयी असे बोलत होते की, “ते सुंदर दगडांनी आणि अर्पणांनी सुशोभित केले आहे.” येशू म्हणाला,
6 Zvinhu izvi zvamunoona, mazuva achasvika okuti ibwe harizosiiwi pamusoro pebwe, risingazoputsirwi pasi.
६“असे दिवस येतील की, हे जे तुम्ही पाहता त्यांतून जो पाडून टाकला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही.”
7 Zvino vakamubvunza, vachiti: Mudzidzisi, ko zvinhu izvi zvichava rinhi? Nechiratidzo chii, kana izvozvi zvoitika?
७त्यांनी त्यास प्रश्न विचारला, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?”
8 Iye ndokuti: Chenjerai kuti musatsauswa; nokuti vazhinji vachauya muzita rangu, vachiti: Ndini Kristu; uye: Nguva yaswedera. Naizvozvo musavatevera.
८येशू म्हणाला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि ‘तो मी आहे’ असे म्हणतील आणि ते म्हणतील, ‘वेळ जवळ आली आहे. त्यांच्यामागे जाऊ नका!’
9 Zvino kana muchinzwa zvehondo nenyonga-nyonga, musavhunduswa; nokuti zvinhu izvi zvinofanira kutanga kuitika; asi kuguma hakuvipo pakarepo.
९जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.”
10 Ipapo wakati kwavari: Rudzi ruchamukira rudzi, neushe huchamukira ushe.
१०मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल.
11 Uye kudengenyeka kwenyika kukuru kuchava kunzvimbo dzakasiyana-siyana, nenzara nematenda, uye zvinotyisa nezviratidzo zvikuru zvichabva kudenga zvichavapo.
११मोठे भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.
12 Asi mberi kwaizvozvi zvese vachaisa maoko avo pamuri, nekushusha, vachikukumikidzai kumasinagoge nemumatirongo, muchiiswa pamberi pemadzimambo nevabati, nekuda kwezita rangu.
१२परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हास सभास्थानासमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हास राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील.
13 Uye izvi zvichashandukira kwamuri kuva uchapupu.
१३यामुळे तुम्हास माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल.
14 Naizvozvo zviisei mumoyo menyu, kuti murege kufanofunganya zvamuchazvidavirira.
१४तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही अशी मनाची तयारी करा,
15 Nokuti ini ndichakupai muromo nenjere, vavengi venyu vese zvavachakonewa kupikisa kana kuramba.
१५कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही.
16 Zvino muchatengeswa kunyange nevabereki, nevanakomana vamai venyu, nehama, neshamwari, uye vachauraya vamwe venyu.
१६परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हापैकी काही जणांना ठार मारतील.
17 Uye muchavengwa nevese nekuda kwezita rangu.
१७माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील.
18 Asi hakungatongoparari ruvhudzi rwemusoro wenyu.
१८परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही.
19 Mukutsungirira kwenyu wanai mweya yenyu.
१९तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवून घ्याल.
20 Zvino kana muchiona Jerusarema rakombwa nemauto, zivai ipapo kuti kuparadzwa kwaro kwaswedera.
२०तुम्ही जेव्हा यरूशलेम शहरास सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हास कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे.
21 Panguva iyo vari muJudhiya ngavatizire kumakomo; nevari mukati maro ngavabude; nevari kumaruwa ngavarege kupinda mariri.
२१जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये.
22 Nokuti awa mazuva etsividzo, kuti zvinhu zvese zvakanyorwa zvizadziswe.
२२ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत.
23 Asi vane nhamo vane mimba nevanonwisa mumazuva iwayo! Nokuti kuchavapo kutambudzika kukuru munyika, nehasha pamusoro perudzi urwu.
२३त्या दिवसात ज्या गरोदर स्त्रिया आहेत व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर क्रोध येईल.
24 Uye vachawa nemuromo wemunondo, nekutapirwa kumarudzi ese; uye Jerusarema richatsikirwa pasi nevechirudzi, kusvikira nguva dzevechirudzi dzazadziswa.
२४ते तलवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना कैद करून राष्ट्रांत नेतील आणि परराष्ट्रीय लोकांचा काळ संपेपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेम शहरास पायाखाली तुडवतील.
25 Zvino zviratidzo zvichavapo pazuva nepamwedzi nepanyeredzi; nepanyika kutambudzika kwemarudzi nekukanganiswa; gungwa nemafungu zvichitinhira,
२५सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील.
26 vanhu vachapera simba nekutya nekutarisira zvinhu izvo zvinouya panyika; nokuti masimba ekumatenga achazungunuswa.
२६भीतीमुळे व जगावर कोसळणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मरणोन्मुख होतील व आकाशातील बळे डळमळतील.
27 Zvino ipapo vachaona Mwanakomana wemunhu achiuya mugore ane simba nekubwinya kukuru.
२७नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने ढगांत येताना पाहतील.
28 Zvino kana zvinhu izvi zvichitanga kuitika, itii tasa, uye musimudze misoro yenyu, nokuti rudzikunuro rwenyu rwaswedera.
२८परंतु या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा आणि तुमचे डोके वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”
29 Zvino wakavataurira mufananidzo achiti: Tarirai muonde nemiti yese;
२९नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “अंजिराचे झाड व इतर दुसऱ्या झाडांकडे पाहा.
30 kana ikozvino yotunga, munozvionera nekuziva kuti zhizha ikozvino rava pedo.
३०त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे.
31 Saizvozvo imwiwo, kana moona zvinhu izvozvi zvichiitika, zivai kuti ushe hwaMwari hwava pedo.
३१त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे.
32 Zvirokwazvo ndinoti kwamuri: Zera iri haringatongopfuuri, kusvikira zvese zvaitika.
३२मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
33 Denga nenyika zvichapfuura, asi mashoko angu haangatongopfuuri.
३३आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही.
34 Zvino zvichenjererei, kuti moyo yenyu irege kuremedzwa nekudyisa nekuraradza nekufunganya zveupenyu huno, zuva iro rikusvikirei musingafungiri.
३४परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा, दारुबाजी आणि अधाशीपणा व या हल्लीच्या जीवनासंबंधीच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊ नये, तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल.
35 Nokuti seriva richasvika pamusoro pevese vagere pachiso chenyika yese.
३५खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोकांवर येईल.
36 Naizvozvo rindai panguva yese munyengetere kuti muverengwe makafanira kupukunyuka zvinhu izvi zvese zvichaitika, nekumira pamberi peMwanakomana wemunhu.
३६यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा.”
37 Zvino waidzidzisa masikati mutembere; asi waibuda achipedzera usiku mugomo rinonzi reMiorivhi.
३७प्रत्येक दिवशी तो परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असे आणि रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर राहत असे.
38 Vanhu vese ndokuuya kwaari mangwanani-ngwanani mutembere kuti vamunzwe.
३८सर्व लोक भवनात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे येत असत.