< Mika 2 >
1 Vane nhamo avo vanoronga zvakaipa, avo vanoronga zvakaipa pamibhedha yavo! Pakuedza kwamangwanani vanozviita nokuti zviri musimba ravo kuzviita.
१जे पाप करण्याचे योजीतात व आपल्या पलंगावर दुष्ट बेत करतात, त्यांना हायहाय. आणि सकाळ होताच ते आपले योजलेले वाईट काम करतात, कारण त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे.
2 Vanochiva minda vagoipamba, nedzimba, uye vagodzitora. Vanobira munhu imba yake, nomuvakidzani nhaka yake.
२आणि ते शेतांची इच्छा धरतात व ती हरण करून मिळवतात; आणि घरांची इच्छा धरतात व ती मिळवतात. ते पुरुषावर व त्याच्या घराण्यावर, मनुष्यावर व त्याच्या वतनावर जुलूम करतात.
3 Naizvozvo Jehovha anoti, “Ndiri kuronga njodzi yokurwisa nayo vanhu ava, zvamusingagoni kuzvidzivirira kwazviri. Hamuchazofambizve muchizvikudza, nokuti ichava nguva yedambudziko.
३ह्यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “पाहा! या कुळाविरुद्ध विपत्ती आणण्याचे योजीत आहे, ज्यामधून तुम्ही तुमची मान काढू शकणार नाही, आणि तुम्ही गर्वाने चालणार नाही. कारण ही वाईट वेळ आहे.
4 Pazuva iro vanhu vachakutukai; vachakudenhai norwiyo urwu rwokuchema: ‘Taitwa dongo chose; pfuma yavanhu vangu yagovaniswa. Anonditorera! Anopa minda yedu kuna vanotimukira?’”
४त्या दिवशी लोक तुमच्यावर गाणी रचतील, आणि भारी विलाप करून म्हणतील: ‘आम्हा इस्राएलवासीयांचा विनाश झाला आहे; परमेश्वराने माझ्या लोकांचा प्रांत पालटून टाकला आहे. त्याने तो माझ्यापासून कसा दूर केला? त्याने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्यांची वाटणी केली.
5 Naizvozvo muchashayiwa munhu kana mumwe, muungano yaJehovha, kuti agove nyika nemijenya.
५अहो श्रीमंत लोकांनो, म्हणून, आता चिठ्ठ्या टाकून प्रदेशात मोजमाप करेल, असा कोणी तुझ्यासाठी परमेश्वराच्या सभेत राहणार नाही.”
6 Vaprofita vavo vanoti, “Musaprofita, musaprofita pamusoro pezvinhu izvi; kunyadziswa hakungatibati.”
६“तुम्ही भविष्य सांगू नका, असे ते म्हणतात, या गोष्टीविषयी भविष्य सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”
7 Zvingataurwe here, nhai imi imba yaJakobho, kuti: “Ko, mweya waJehovha watsamwa here? Iye anoita zvinhu zvakadaro here?” “Ko, mashoko angu haaiti zvakanaka here kuno uyo ane nzira dzake dzakarurama?
७पण याकोबाचे घराणे हो, परमेश्वराचा आत्मा रागिष्ट आहे काय? त्याची ही कृत्ये आहेत की नाही? जो सरळ चालतो त्यास माझी वचने बरे करीत नाहीत काय?
8 Asi mazuva ano vanhu vangu vakandimukira somuvengi. Munobvisa majasi anokosha pane avo vanopfuura musina kana hanya, savarume vodzoka kubva kuhondo.
८तरीसुद्धा माझे लोक शत्रूसारखे उभे राहिले आहेत. ज्यांना युद्ध आवडत नाही, असे सहज जवळून जात असता तुम्ही अंगरख्यावरून घातलेला त्यांचा झगा काढून घेता.
9 Munodzinga madzimai avanhu vangu kubva mudzimba dzavo dzakanaka. Munotora ropafadzo yangu kubva kuvana vavo nokusingaperi.
९तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या मनोरम घरांतून काढून टाकता; त्यांच्या लहान मुलांपासून माझे आशीर्वाद काढून घेता.
10 Simukai, ibvai pano! Nokuti ino haisi nzvimbo yenyu yokuzororera, nokuti yakasvibiswa, yakaparadzwa zvisingagadziriki.
१०ऊठा आणि चालते व्हा! कारण अशुद्धता ही मोठ्या विनाशाने नष्ट करते, ह्याकरणाने ही तुमची विसाव्याची जागा नाही.
11 Kana munyepi nomunyengeri akauya oti, ‘Ndichakuprofitirai waini zhinji nedoro,’ iyeyu achava muprofita wavanhu ava!
११जर एखादा असत्याच्या आत्म्याने चालतांना खोटे सांगून म्हणेल की, “मी द्राक्षरस आणि मद्य यांविषयी भविष्य सांगेन,” तर तो देखील या लोकांचा भविष्यावादी होईल.
12 “Zvirokwazvo ndichakuunganidzai imi mose, iwe Jakobho; zvirokwazvo ndichaunganidza pamwe chete vakasara vaIsraeri. Ndichavaunganidza pamwe chete samakwai muchirugu, seboka pamafuro aro; nzvimbo yacho ichazara navanhu.
१२हे याकोबा, खचित मी तुझ्या सर्वांना एकत्र करीन. खरोखर मी इस्राएलाच्या उरलेल्यांना एकत्र करीन. कुरणातील कळपाप्रमाणे वा मेंढवाड्यातील मेंढराप्रमाणे, तसे त्यांना मी एकत्र ठेवीन. मग पुष्कळ लोक असल्यामुळे ती मोठा गोंगाट करतील.
13 Uyo achaparura nzira achaenda pamberi pavo; vachapwanya napasuo vagobuda panze. Mambo wavo achapfuura ari pamberi pavo, Iye Jehovha achivatungamirira.”
१३फोडणारा त्यांच्यापुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल. ते सुटून वेशीजवळ जाऊन तिच्यातून निघाले आहेत; आणि त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालून गेला आहे. परमेश्वर त्यांचा पुढारी आहे.