< Mateo 5 >
1 Zvino akati aona vanhu vazhinji, akakwira mugomo uye akagara pasi. Vadzidzi vake vakauya kwaari,
१जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहीले तेव्हा तो डोंगरावर चढला, मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
2 uye akatanga kuvadzidzisa achiti:
२त्याने आपले तोंड उघडले व त्यांना शिकवले. तो म्हणाला;
3 “Vakaropafadzwa varombo pamweya, nokuti umambo hwokudenga ndohwavo.
३“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
4 Vakaropafadzwa vanochema nokuti vachanyaradzwa.
४‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’
5 Vakaropafadzwa vanyoro nokuti vachagara nhaka yenyika.
५‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’
6 Vakaropafadzwa avo vane nzara nenyota yokuita zvakarurama nokuti vachagutswa kwazvo.
६जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील.
7 Vakaropafadzwa vane tsitsi nokuti naivowo vachaitirwa tsitsi.
७जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.
8 Vakaropafadzwa vakachena pamwoyo, nokuti vachaona Mwari.
८जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील.
9 Vakaropafadzwa vanoyananisa nokuti vachanzi vana vaMwari.
९जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.
10 Vakaropafadzwa vanotambudzwa nokuda kwokururama nokuti umambo hwokudenga ndohwavo.
१०न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
11 “Makaropafadzwa imi kana vanhu vachikutukai, vachikutambudzai uye vachikupomerai zvakaipa zvose nokuda kwangu.
११जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात.
12 Farai mufarisise kwazvo nokuti mubayiro wenyu mukuru kudenga, nokuti nenzira imwe cheteyo vakatambudza vaprofita vakakutangirai.
१२आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.
13 “Imi muri munyu wenyika. Asi kana munyu usisavavi ungavaviswe nei? Hauchabatsiri chinhu, kunze kwokuti uraswe ugotsikwa zvawo navanhu.
१३तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्यांच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील.
14 “Imi muri chiedza chenyika. Guta riri pamusoro pegomo haringavanziki.
१४तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही.
15 Uye vanhu havangatungidzi mwenje vagouisa pasi pedengu. Asi kutoti vanouisa pachigadziko kuti uvhenekere vose vari mumba.
१५आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो.
16 Nenzira imwe cheteyo, chiedza chenyu ngachivhenekere pamberi pavanhu kuti vaone mabasa enyu akanaka, vagokudza Baba venyu vari kudenga.
१६तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
17 “Musafunga kuti ndakauya kuzoparadza Murayiro kana Vaprofita; handina kuuya kuzozviparadza asi kuzozvizadzisa.
१७नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असा विचार करु नका; मी ते रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आलो आहे.
18 Ndinokuudzai chokwadi, kuti kusvikira denga nenyika zvapfuura, hakuna vara duku sei kana chimwe chinhu chiduku sei chichabviswa paMurayiro, kusvikira zvose zvazadziswa.
१८कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.
19 Asi ani naani anotyora mumwe chete wemirayiro miduku iyi uye achizodzidzisawo vamwe kuita zvimwe chetezvo achanzi muduku muumambo hwokudenga. Asi ani naani anochengeta uye anodzidzisa mirayiro iyi, achanzi mukuru muumambo hwokudenga.
१९यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील.
20 Nokuti ndinokuudzai zvirokwazvo kuti kana kururama kwenyu kukasapfuura kwavaFarisi nokwavadzidzisi vemirayiro, zvirokwazvo hamungapindi muumambo hwokudenga.
२०म्हणून मी तुम्हास सांगतो, शास्त्री व परूशी यांच्या न्यायीपणापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाही.
21 “Makanzwa zvakataurwa kune vanhu vekare zvichinzi, ‘Usauraya uye ani naani anouraya achatongwa.’
२१‘खून करू नको आणि जो कोणी खून करतो तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
22 Asi ini ndinokuudzai kuti ani naani anotsamwira hama yake achatongwa. Uyezve ani naani anoti, ‘Raka’ kuhama yake achamiswa pamberi pedare ravatongi. Asizve ani naani anoti kuhama yake, ‘Iwe benzi!’ achapara mhosva yokuti atongerwe moto wegehena. (Geenna )
२२मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला, ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. (Geenna )
23 “Naizvozvo kana wada kupa chipo chako paaritari, ukayeuka pakarepo kuti wakatadzira hama yako,
२३यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरूद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली,
24 siya chipo chako ipapo pamberi pearitari. Tanga waenda undoyanana nehama yako, wozouya wopa chipo chako.
२४तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर.
25 “Kurumidza kutenderana nomudzivisi wako uyo ari kukuendesa kudare. Ita izvi uchiri munzira naye, kana kuti angangokuisa kumutongi uye mutongi agokuisa kumutariri, uye ugokandwa mutorongo.
२५तुझा फिर्यादी तुझ्याबरोबर वाटेवर आहे तोच त्याच्याशी समेट कर, नाही तर कदाचित फिर्यादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरूंगात पडशील.
26 Ndinokuudzai chokwadi kuti haungabudimo kusvikira waripa kamari kokupedzisira.
२६मी तुला खरे सांगतो शेवटची दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस.
27 “Makanzwa zvichinzi, ‘Usaita upombwe.’
२७‘व्यभिचार करू नको,’ म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे,
28 Asi ini ndinoti kwamuri ani naani anotarisa mukadzi neziso roruchiva atoita upombwe naye mumwoyo make.
२८मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे;
29 Kana ziso rako rorudyi richikuita kuti utadze, ribvise urirase. Zviri nani kwauri kuti urasikirwe nomumwe mutezo womuviri wako pano kuti muviri wako wose ukandwe mugehena. (Geenna )
२९तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपट आणि फेकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. (Geenna )
30 Uye kana ruoko rwako rworudyi ruchikuita kuti utadze, rucheke ururase. Zviri nani kwauri kuti urasikirwe nomumwe mutezo womuviri wako, pano kuti muviri wako wose uende kugehena. (Geenna )
३०तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. (Geenna )
31 “Zvakanzi, ‘Ani naani anoramba mukadzi wake anofanira kumupa gwaro rokurambana.’
३१‘कोणी आपली पत्नी सोडून देतो तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हे सांगितले होते.
32 Asi ndinokuudzai kuti ani naani anoramba mukadzi wake kunze kwemhosva yokusatendeka muwaniso anomuitisa upombwe, uye ani naani anowana mukadzi akarambwa anoita upombwe.
३२मी तर तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या पत्नीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो.
33 “Makanzwa zvakare zvichitaurwa kuvanhu vekare kare zvichinzi, ‘Usatyora mhiko dzako, asi zadzisa mhiko dzose dzaunenge waita kuna Ishe.’
३३आणखी ‘खोटी शपथ वाहू नको’ तर ‘आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
34 Asi ndinokuudzai kuti, Musatongopika: kunyange nedenga nokuti ndiro chigaro chaMwari choumambo;
३४मी तर तुम्हास सांगतो शपथ वाहूच नका; स्वर्गाची नका, कारण ते देवाचे आसन आहे;
35 kana nenyika nokuti ndiyo chitsiko chetsoka dzake; kana neJerusarema nokuti ndiro guta raMambo Mukuru.
३५पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पादासन आहे; यरूशलेमेचीहि वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे.
36 Uye usapika nomusoro wako nokuti haugoni kuita kuti bvudzi rimwe chete rive jena kana dema.
३६आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस.
37 Hongu yako ngaingova ‘Hongu’, ne‘Kwete’ yako ive ‘Kwete’; zvimwe zvinopfuura izvi zvinobva kuno wakaipa.
३७तर तुमचे बोलणे, होय तर होय आणि नाही तर नाही एवढेच असावे; याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे.
38 “Makanzwa kuti zvakanzi, ‘Ziso rinotsiviwa neziso, uye zino rinotsiviwa nezino.’
३८‘डोळ्याबद्दल डोळा’ व ‘दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
39 Asi ndinokuudzai kuti, Musadzivisa munhu akaipa. Kana munhu akakurova padama rorudyi, murinzire roruboshwewo.
३९परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर;
40 Kana munhu akakukwirira kumatare achida kukutorera nguo yako, rega atorewo nejasi rako.
४०जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे;
41 Kana munhu akakumanikidza kufamba mutunhu mumwe chete, famba naye miviri.
४१आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.
42 Kana munhu akakukumbira chinhu, mupe, uye usafuratira munhu anoda kukwereta kwauri.
४२जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्यास दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्यास पाठमोरा होऊ नको.
43 “Makanzwa kuti zvakanzi, ‘Ida wokwako, uvenge muvengi wako.’
४३‘आपल्या शेजार्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर’, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
44 Asi ini ndinokuudzai kuti, Idai vavengi venyu, mugonyengeterera avo vanokutambudzai,
४४मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
45 kuitira kuti mugova vana vaBaba venyu vari kudenga. Ivo vanoita kuti zuva ravo ribude pane vakaipa nevakanaka uye vanonayisa mvura yavo pane vakarurama nevasakarurama.
४५अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो दुष्टांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.
46 Kana mukangoda avo vanokudai, muchawana mubayiro wei? Vateresi havaiti zvimwe chetezvo here?
४६कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हास काय प्रतिफळ मिळावे? जकातदारही तसेच करतात की नाही?
47 Kana muchingokwazisana nehama dzenyu bedzi, mungakunda vamwe pakudii? Ko, vasingatendi havaiti zvimwe chetezvo here?
४७आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करीत असला तर त्यामध्ये विशेष ते काय करता? परराष्ट्रीय लोकही तसेच करीतात ना?
48 Naizvozvo, ivai vakakwana, sezvo Baba venyu vari kudenga vari vakakwana.
४८यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा.