< Genesisi 16 >
1 Zvino Sarai, mukadzi waAbhurama, akanga asina kumuberekera vana. Asi iye akanga ano murandakadzi wechiIjipita ainzi Hagari;
१अब्रामाला आपली पत्नी साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिसरी दासी होती, जिचे नाव हागार होते.
2 saka akati kuna Abhurama, “Jehovha akandikonesa kubereka vana. Enda hako undovata nomurandakadzi wangu; zvimwe ndingaita mhuri kubudikidza naye.” Abhurama akabvuma zvakanga zvataurwa naSarai.
२साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले.
3 Saka shure kwokugara kwaAbhurama kwamakore gumi muKenani, Sarai mukadzi wake akatora Hagari murandakadzi wake wechiIjipita akamupa kumurume wake kuti ave mukadzi wake.
३अब्राम कनान देशात दहा वर्षे राहिल्यानंतर, अब्रामाची पत्नी साराय हिने आपली मिसरी दासी हागार ही, आपला पती अब्राम याला पत्नी म्हणून दिली.
4 Akavata naHagari uye Hagari akabata pamuviri. Paakaziva kuti akanga ava napamuviri, akatanga kuzvidza tenzikadzi wake.
४त्याने हागार सोबत शरीरसंबंध केले, आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकीणीकडे तिरस्काराने पाहू लागली.
5 Ipapo Sarai akati kuna Abhurama, “Ndiwe waita kuti nditambudzike. Ndakaisa murandakadzi wangu mumaoko ako, uye zvino zvaava kuziva kuti ava napamuviri, ava kundizvidza. Mwari ngaatonge pakati pangu newe.”
५नंतर साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्यावरचा अन्याय तुमच्यावर असो. मी आपली दासी तुम्हास दिली, आणि आपण गरोदर आहो हे लक्षात आल्यावर, मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. परमेश्वर तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये न्याय करो.”
6 Abhurama akati, “Murandakadzi wako ari mumaoko ako. Ita naye zvaunofunga kuti zvakaisvonaka.” Ipapo Sarai akabata Hagari zvakaipa; saka akatiza.
६परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा साराय तिच्याबरोबर निष्ठुरपणे वागू लागली म्हणून हागार तिला सोडून पळून गेली.
7 Mutumwa waJehovha akawana Hagari ari pedyo netsime raiva murenje; rakanga riri tsime rakanga riri parutivi pomugwagwa unoenda kuShuri.
७शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली.
8 Uye akati, “Hagari, murandakadzi waSarai, wabvepiko, uye uri kuendepiko?” Iye akati, “Ndiri kutiza kubva kuna tenzikadzi wangu Sarai.”
८देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?” हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”
9 Ipapo mutumwa waJehovha akati kwaari, “Dzokera kuna tenzikadzi wako undozvininipisa pasi pake.”
९परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.”
10 Mutumwa akatizve, “Ndichawandisa zvizvarwa zvako zvokuti havangaverengeki.”
१०परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.”
11 Mutumwa waJehovha akatiwo kwaari: “Iye zvino wava nemimba uye uchava nomwanakomana. Uchamutumidza zita rokuti Ishumaeri, nokuti Jehovha anzwa nezvokutambura kwako.
११परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, “तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे.
12 Achava mbongoro yomusango: ruoko rwake rucharwa navanhu vose uye ruoko rwavanhu vose rucharwa naye, uye achararama mukupesana nehama dzake dzose.”
१२इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल. तो सर्वांविरूद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरूद्ध असतील, आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्यापासून वेगळा राहील.”
13 Hagari akapa zita iri kuna Jehovha akataura naye akati: “Ndimi Jehovha anondiona,” nokuti akati, “Zvino ndaona Iye anondiona.”
१३नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर त्याचे नाव, “तू पाहणारा देव आहेस,” असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, “जो मला पाहतो त्यास मी येथेही मागून पाहिले काय?”
14 Ndokusaka tsime rakanzi Bheeri Rahai Roi; richiripo, pakati peKadheshi neBheredhi.
१४तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई असे नाव पडले; पाहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.
15 Saka Hagari akaberekera Abhurama mwanakomana, uye Abhurama akapa zita rokuti Ishumaeri kumwanakomana waakanga abereka.
१५हागारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला, आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले.
16 Abhurama akanga ava namakore makumi masere namatanhatu okuberekwa paakaberekerwa mwanakomana naHagari.
१६हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.