< Ekisodho 40 >

1 Ipapo Jehovha akati kuna Mozisi,
मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 “Dzika tabhenakeri, Tende Rokusangana, pazuva rokutanga romwedzi wokutanga.
“पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर.
3 Uise areka yeChipupuriro mairi uye ugofukidza areka nechidzitiro.
साक्षपटाचा कोश त्यामध्ये ठेव व तू अंतरपटाने कोशाला पडदा घाल.
4 Upinze tafura ugoisa zvinhu zvayo pairi. Ipapo ugopinza chigadziko chomwenje ugomisa mwenje yacho.
मग मेज आत आणून त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव.
5 Uise aritari yezvinonhuhwira yegoridhe pamberi peareka yechipupuriro uye ugoisa chidzitiro pamukova wokupinda mutabhenakeri.
साक्षपटाच्या कोशापुढे सोन्याची धूपवेदी ठेव आणि निवासमंडपाच्या दाराचा पडदा लाव.
6 “Uise aritari yezvipiriso zvinopiswa pamberi pomukova wokupinda kutabhenakeri, Tende Rokusangana;
दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव.
7 uise dhishi pakati peTende Rokusangana nearitari ugoisa mvura mariri.
दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेव व त्यामध्ये पाणी भर.
8 Ugadzire ruvazhe rwakaipoteredza uye ugoisa chidzitiro pamukova woruvazhe.
सभोवती अंगण कर व मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव.
9 “Utore mafuta okuzodza ugozodza tabhenakeri nezvinhu zvose zvirimo; uinatse nemidziyo yayo yose, uye ichava tsvene.
अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर व त्याच्या सर्व वस्तू पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल.
10 Ipapo ugozodza aritari yezvipiriso zvinopiswa nemidziyo yayo yose; unatse aritari, uye ichava tsvene-tsvene.
१०होमवेदी व तिची सर्व उपकरणे यांना अभिषेक करून पवित्र कर म्हणजे ती परमपवित्र होईल.
11 Uzodze dhishi nechigadziko charo ugozvinatsa.
११गंगाळ व त्याच्या खालची बैठक ह्यास अभिषेक कर व त्यांना पवित्र कर.
12 “Uuye naAroni navanakomana vake kumukova weTende Rokusangana ugovashambidza nemvura.
१२अहरोन व त्याचे पुत्र ह्याना दर्शनमंडपाच्या दारापाशी नेऊन त्यांना आंघोळ घाल.
13 Ipapo ugopfekedza Aroni nguo tsvene, umuzodze uye ugomunatsa kuti agondishumira somuprista.
१३अहरोनाला पवित्र वस्रे घाल व त्यास तेलाने अभिषेक करून पवित्र कर, मग तो याजक या नात्याने माझी सेवा करील.
14 Uuyise vanakomana vake ugovapfekedza majasi.
१४त्याच्या पुत्रांनाजवळ बोलावून अंगरखे घाल.
15 Uvazodze sokuzodza kwawaita baba vavo, kuti vagondishumira savaprista. Kuzodzwa kwavo kuchava kwouprista hucharamba huripo kuzvizvarwa zvinotevera.”
१५त्यांच्या पित्याला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; हा त्यांचा अभिषेक त्यांच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरच्या याजकपदाचा दर्शक होईल.”
16 Mozisi akaita zvose sezvaakarayirwa naJehovha.
१६मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही तसे केले.
17 Saka tabhenakeri yakamiswa pazuva rokutanga romwedzi wokutanga mugore rechipiri.
१७दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवासमंडपाची उभारणी झाली.
18 Mozisi akati amisa tabhenakeri, akaisa zvigadziko panzvimbo yazvo, akadzika mapuranga, akapinza mbariro uye akamisa matanda.
१८परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवासमंडप उभा केला; प्रथम त्याने उथळ्या बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळ्या लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले;
19 Ipapo akatambanudza tende akariisa pamusoro petabhenakeri ndokuisa chifukidzo pamusoro petende, sokurayirwa kwaakaitwa naJehovha.
१९त्यानंतर निवासमंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले.
20 Akatora Chipupuriro akachiisa muareka, akabatanidza mapango paareka uye akaisa chifunhiro chokuyananisa pamusoro payo.
२०मोशेने साक्षपट घेऊन कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले.
21 Ipapo akauyisa areka mutabhenakeri ndokuturika chidzitiro chokufukidzira akafukidza areka yeChipupuriro, sokurayira kwakaita Jehovha.
२१त्याने तो कोश निवासमंडपात आणला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
22 Mozisi akaisa tafura muTende Rokusangana nechokurutivi rwokumusoro kwetabhenakeri kunze kwechidzitiro
२२मोशेने पवित्र निवासमंडपाच्या उत्तर बाजूला दर्शनमंडपामध्ये पडद्याच्या बाहेर मेज ठेवले;
23 uye akaisa chingwa pamusoro payo pamberi paJehovha, sokurayirwa kwaakaitwa naJehovha.
२३त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
24 Akaisa chigadziko chomwenje muTende Rokusangana chakatarisana netafura nechokurutivi rwezasi rwetabhenakeri
२४त्याने पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपामध्ये मेजासमोर दीपवृक्ष ठेवला.
25 uye akamisa mwenje pamberi paJehovha, sokurayirwa kwaakaitwa naJehovha.
२५नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
26 Mozisi akaisa aritari yegoridhe muTende Rokusangana pamberi pechidzitiro,
२६त्याने दर्शनमंडपामध्ये अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली.
27 uye akapisa zvinonhuhwira pairi, sokurayirwa kwaakaitwa naJehovha.
२७नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
28 Ipapo akaisa chidzitiro pamukova wetabhenakeri.
२८त्याने पवित्र निवासमंडपाच्या दाराला पडदा लावला.
29 Akamisa aritari yezvipiriso zvinopiswa pedyo nomukova wetabhenakeri, Tende Rokusangana, akapa pairi zvipiriso zvinopiswa nezvipiriso zvezviyo, sokurayirwa kwaakaitwa naJehovha.
२९त्याने पवित्र निवासमंडपाच्या दर्शनमंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली व तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
30 Akaisa dhishi pakati peTende Rokusangana nearitari uye akaisa mvura yokushamba mariri,
३०त्याने दर्शनमंडप आणि वेदी यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यामध्ये पाणी भरले.
31 uye Mozisi naAroni navanakomana vake vakaishandisa kushamba maoko avo netsoka dzavo.
३१मोशे, अहरोन व अहरोनाचे पुत्र त्यामध्ये आपआपले हातपाय धूत असत;
32 Vaishamba pose pavaipinda muTende Rokusangana kana kuswedera paaritari, sokurayirwa kwakaitwa Mozisi naJehovha.
३२ते दर्शनमंडप व वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
33 Ipapo Mozisi akaita ruvazhe rwakapoteredza tabhenakeri nearitari uye akaturika chidzitiro pamukova wokupinda muruvazhe. Nokudaro Mozisi akapedza basa.
३३त्याने निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली व अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकाला पडदा लावला; या प्रकारे परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने सर्व काम संपविले.
34 Ipapo gore rakafukidza Tende Rokusangana, uye kubwinya kwaJehovha kwakazadza tabhenakeri.
३४दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.
35 Mozisi haana kugona kupinda muTende Rokusangana nokuti gore rakanga ragara pariri, uye kubwinya kwaJehovha kwakazadza tabhenakeri.
३५दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
36 Mukufamba kwose kwavaIsraeri, pose paisimuka gore kubva pamusoro petabhenakeri, ivo vaisimuka vachienda;
३६पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरू करीत;
37 asi kana gore risina kubva, vakanga vasingafambi, kusvikira pazuva rarinosimuka.
३७परंतु तो मेघ निवासमंडपावर असेपर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाईपर्यंत ते तेथेच थांबत.
38 Saka gore raJehovha raiva pamusoro petabhenakeri masikati; uye moto wakanga uri mugore usiku, pamberi peimba yose yaIsraeri panguva yokufamba kwavo kwose.
३८परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यामध्ये अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांस आपल्या प्रवासात तो दिसत असे.

< Ekisodho 40 >