< 2 Samueri 7 >

1 Zvino mambo akati agara mumuzinda wake uye Jehovha amupa zororo kubva kuvavengi vake vose vakanga vakamupoteredza,
राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास भोवतालच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिला.
2 akati kuna Natani muprofita, “Tarira ndiri pano ndigere mumuzinda wakavakwa nemisidhari, asi areka yaMwari igere mutende.”
एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि देवाचा कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशासाठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.”
3 Natani akapindura mambo akati, “Endai mberi muite zvose zvamunazvo mupfungwa dzenyu, nokuti Jehovha anemi.”
नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हास साथ आहे.”
4 Usiku ihwohwo shoko raJehovha rakasvika kuna Natani, richiti:
पण त्याच दिवशी रात्री नाथानला परमेश्वराचे वचन ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
5 “Enda undoudza muranda wangu Dhavhidhi kuti, ‘Zvanzi naJehovha: Ndiwe here ungandivakira imba yandingagara?
“दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग, ‘परमेश्वराचा निरोप असा आहे: माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस.
6 Ini handina kumbogara mumba kubva zuva randabudisa vaIsraeri muIjipiti kusvikira nhasi. Ndanga ndichifamba munzvimbo nenzvimbo ndichigara mutende.
मी इस्राएल लोकांस मिसरमधून बाहेर काढले त्यावेळी कुठल्या ही घरात राहत नव्हतो, मी राहुटीतूनच फिरलो. तेच माझे घर.
7 Pose pandaifamba navaIsraeri vose, ndakamboti here kuno mumwe wavatongi vavo vandakarayira kuti vafudze vanhu vangu vaIsraeri, “Makaregerei kundivakira imba yemisidhari?”’
इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणात्याही अधिकाऱ्याला “कधीही माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस?” असे विचारले नाही.
8 “Naizvozvo zvino, udza muranda wangu Dhavhidhi kuti, ‘Zvanzi naJehovha Wamasimba Ose: Ndakakutora kubva kumafuro kwawaifudza makwai kuti uve mutongi wavanhu vangu vaIsraeri.
शिवाय दावीदाला हे ही सांग सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा राजा केले.
9 Ndakava newe kwose kwawakaenda, uye ndakaparadza vavengi vako vose ndikavabvisa pamberi pako. Zvino zita rako ndichariita guru, richafanana namazita avakuru vari panyika.
तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे मी तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन.
10 Uye ndichapa vanhu vangu vaIsraeri nzvimbo uye ndichavasima kuti vave nomusha wavo pachavo kuti vasazokanganiswazve. Vanhu vakaipa havachazovamanikidzazve, sezvavakaita pakutanga
१०माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली, त्यांना रुजवले त्यांना जागोजागी भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले.
11 nezvavakaita kubva panguva yandakagadza vatungamiri vavanhu vangu vaIsraeri. Ndichakuzorodzai kubva kuvavengi venyu vose. “‘Jehovha anoti kwauri Jehovha pachake achakumisira imba:
११इस्राएल लोकांवर मी, परमेश्वर, शास्ते नेमिले होते तेव्हापासून दुर्जनांनी त्यांना त्रास दिला तसे आता घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की, तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल.
12 Zvino kana mazuva ako akwana uye wazorora namadzibaba ako, ndichamutsa mwana wako kuti atore ushe hwako, achabuda mauri, uye ndichasimbisa ushe hwake.
१२तुझे जीवन संपुष्टात आले, म्हणजे तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या पुत्रापैकीच एकाला राजा करीन.
13 Iye ndiye achavakira Zita rangu imba, uye ndichasimbisa chigaro choushe hwake nokusingaperi.
१३तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन.
14 Ini ndichava baba vake, iye achava mwana wangu. Kana akakanganisa, ini ndichamuranga neshamhu yavanhu, uye nokurangwa kunoitwa navanhu.
१४मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर मी त्यास मनुष्याच्या काठीने आणि मनुष्यांच्या पुत्रांच्या चाबकांनी शासन घडवीन.
15 Asi rudo rwangu haruzombobva paari, sokubvisa kwandakaruita pana Sauro, uyo wandakabvisa pamberi pako.
१५पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो, तेव्हा तुझ्यासमोर मी त्यास दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही.
16 Imba yako noumambo hwako zvichagara pamberi pangu nokusingaperi; chigaro chako choushe chichasimbiswa nokusingaperi.’”
१६राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे राजासन टिकून राहील.”
17 Natani akazivisa Dhavhidhi mashoko ose ezvaakanga aratidzwa.
१७नाथानाने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले.
18 Zvino Mambo Dhavhidhi akapinda akandogara pamberi paJehovha, akati: “Ko, ini ndini aniko zvangu, nhai Ishe Jehovha, uye mhuri yangu chiiko, zvamandisvitsa pano?
१८यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस?
19 Uyezve sezvinonzi izvi hazvina kukwana pamberi penyu, nhai Ishe Jehovha, mataurazve nezveramangwana reimba yomuranda wenyu. Nhai Ishe Jehovha Mwari, izvi ndizvo zvamunogara muchiitira vanhu here?
१९हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्‍याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस.
20 “Ko, Dhavhidhi angareveizve kwamuri? Nokuti munoziva muranda wenyu, Ishe Jehovha.
२०मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच.
21 Nokuda kweshoko renyu uye maererano nokuda kwenyu, maita chinhu ichi chikuru uye machizivisa kumuranda wenyu.
२१तू करणार म्हणालास, आणि तुला तसे करायची इच्छा आहे; तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस.
22 “Haiwa muri mukuru, imi Ishe Jehovha! Hakuna mumwe akafanana nemi, uye hakuna mumwe Mwari kunze kwenyu, sezvatakanzwa nenzeve dzedu.
२२ह्यास्तव हे माझ्या प्रभू, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही.
23 Uye ndorupi rumwe rudzi rwakaita savanhu venyu vaIsraeri, irwo rudzi panyika rwakadzikinurwa naMwari kuti vave vanhu vake, uye kuti azviitire zita, uye kuti aite zvinhu zvikuru zvinoshamisa nokudzinga marudzi navamwari vawo pamberi pavanhu venyu, vamakadzikinura kubva muIjipiti?
२३पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. ती गुलाम होती, तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुक्त केलेस. तिला आपली प्रजा बनवलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भूत चमत्कार केलेस.
24 Makasimbisa vanhu venyu vaIsraeri kuti vave venyu nokusingaperi, uye imi, Jehovha, mava Mwari wavo.
२४तू निरंतर इस्राएलाला स्वतःच्या कवेत घेतलेस. हे परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.
25 “Naizvozvo zvino, Jehovha Mwari, simbisai nokusingaperi shoko renyu ramakataura pamusoro pomuranda wenyu neimba yake. Itai sezvamakavimbisa,
२५आता तर परमेश्वर देवा, तू या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करून तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करू दे.
26 kuti zita renyu rikudzwe nokusingaperi. Zvino vanhu vachati, ‘Jehovha Wamasimba Ose ndiye Mwari weIsraeri!’ Zvino imba yomuranda wenyu Dhavhidhi ichasimbiswa pamberi penyu.
२६मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, सर्वशक्तिमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला तुझा सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे.
27 “Haiwa Jehovha Wamasimba Ose, Mwari weIsraeri, makaratidza izvi kumuranda wenyu, muchiti, ‘Ndichakuvakira imba.’ Naizvozvo muranda wenyu atsunga kunyengetera, munyengetero uyu.
२७सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस तू म्हणालास, मी तुझ्यासाठी घर बांधीन, म्हणून मी तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे.
28 Haiwa Ishe Jehovha, muri Mwari! Mashoko enyu ndeechokwadi, uye mavimbisa zvinhu zvakanaka kumuranda wenyu.
२८प्रभू परमेश्वरा, तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास.
29 Zvino ngazvikufadzei kuti muropafadze imba yomuranda wenyu, kuti irambe iri pamberi penyu nokusingaperi; nokuti imi Jehovha Mwari, mazvitaura, uye namaropafadzo enyu, imba yomuranda wenyu icharopafadzwa nokusingaperi.”
२९आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभू परमेश्वरा, तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”

< 2 Samueri 7 >