< 1 VaKorinde 2 >

1 Pandakauya kwamuri, hama, handina kuuya nokugona kutaura kana uchenjeri hwapamusoro, pandakaparidza kwamuri uchapupu hwezvaMwari.
बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो तेव्हा मी देवाविषयीचे सत्य रहस्य मानवी ज्ञानाने किंवा उत्कृष्ट भाषण करून सांगत आलो असे नाही.
2 Nokuti ndakati handidi kuziva chinhu pandakanga ndiri pakati penyu, asi Jesu Kristu, uye akarovererwa pamuchinjikwa.
कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोसुध्दा वधस्तंभावर खिळलेला, याशिवाय कशाचेही ज्ञान मला असू नये असा मी ठाम निश्चय केला आहे.
3 Ndakauya kwamuri muutera nokutya uye nokudedera kukuru.
आणि मी तुमच्याकडे अशक्त, भयभीत व थरथर कापत आलो.
4 Shoko rangu nokuparidza kwangu zvakanga zvisina mashoko okugombedzera nouchenjeri, asi nokuratidza kwesimba raMweya,
माझे भाषण व घोषणा हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते पण ते आत्मा आणि त्याचे सामर्थ्य यांच्या द्वारे होते.
5 kuti kutenda kwenyu kurege kuva kwouchenjeri hwavanhu, asi kuve kwesimba raMwari.
जेणेकरून तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा.
6 Zvisinei, tinotaura mashoko ouchenjeri pakati pavanhu vakura, asi kwete uchenjeri hwenyika ino, kana hwavabati venyika ino vachashayiwa simba. (aiōn g165)
तरीपण, जे आत्मिक परीपक्व आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो परंतु ते ज्ञान या जगाचे नाही आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही. (aiōn g165)
7 Kwete, tinotaura uchenjeri hwaMwari hwakavanzika, uchenjeri hwakanga hwakafukidzwa uye hwakatemerwa kubwinya kwedu naMwari nyika isati yavapo. (aiōn g165)
तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते. (aiōn g165)
8 Hakuna kana nomumwe wavabati venyika ino akahunzwisisa, nokuti dai vakahunzwisisa vangadai vasina kuroverera Ishe wokubwinya pamuchinjikwa. (aiōn g165)
हे ज्ञान या युगाच्या कोणाही अधिकाऱ्याला माहीत नव्हते कारण जर त्यांना कळले असते, तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. (aiōn g165)
9 Asi sezvazvakanyorwa zvichinzi: “Hakuna ziso rakaona, hakuna nzeve yakanzwa; hakuna zvakapinda mumurangariro womunhu, zvakagadzirirwa naMwari vaya vanomuda.”
परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि मनुष्याच्या मनात जे आले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.”
10 Asi Mwari akazviratidza kwatiri isu noMweya wake. Mweya anonzvera zvinhu zvose, kunyange nezvakadzika zvaMwari.
१०ते देवाने आत्म्याच्याद्वारे आपणांस प्रकट केले आहे कारण हा आत्मा प्रत्येक गोष्टींचा व देवाच्या खोल गोष्टींचाही शोध घेतो.
11 Nokuti ndianiko pakati pavanhu anoziva ndangariro dzomunhu kunze kwomweya womunhu uri mukati make? Saizvozvowo hakuna munhu anoziva ndangariro dzaMwari kunze kwoMweya waMwari.
११कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? त्याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे खोल विचार कोणीच ओळखू शकत नाही.
12 Hatina kugamuchira mweya wenyika ino asi Mweya unobva kuna Mwari; kuti tinzwisise zvatakapiwa naMwari pachena.
१२परंतु आम्हास जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने आपल्याला जे कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.
13 Izvi ndizvo zvatinotaura, tisingatauri namashoko atinodzidziswa nouchenjeri hwavanhu, asi namashoko atinodzidziswa naMweya, tichidudzira zvokwadi zvomweya namashoko omweya.
१३मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आत्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो.
14 Munhu asina Mweya haangagamuchiri zvinhu zvinobva kuMweya waMwari, nokuti zvinonzwisisika nomweya.
१४स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात आणि तो त्या मानीत नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात.
15 Munhu ari muMweya anonzwisisa zvinhu zvose, asi iye pachake haanganzwisiswi nomunhu:
१५जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही.
16 “Nokuti, ndianiko akaziva murangariro waShe kuti amudzidzise?” Asi isu tino murangariro waKristu.
१६कारण पवित्र शास्त्र म्हणते, “प्रभूचे मन कोण जाणतो? जो त्यास शिकवू शकेल?” परंतु आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.

< 1 VaKorinde 2 >