< Psalmi 9 >
1 Hvalim te, Gospode, iz svega srca svojega, kazujem sva èudesa tvoja.
१प्रमुख गायकासाठी; मूथ लब्बेन रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन; मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
2 Radujem se i veselim se o tebi, pjevam imenu tvojemu, višnji!
२तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
3 Neprijatelji se moji vratiše natrag, spotakoše se i nesta ih ispred lica tvojega;
३माझे शत्रू माघारी फिरतात, तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात.
4 Jer si svršio sud moj i odbranio me; sio si na prijesto, sudija pravedni.
४कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे. तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे.
5 Rasrdio si se na narode i ubio bezbožnika, ime si im zatro dovijeka, zasvagda.
५आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस; तू दुष्टाचा नाश केला आहेस. तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे.
6 Neprijatelju nesta maèeva sasvijem; gradove ti si razvalio; pogibe spomen njihov.
६जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे.
7 Ali Gospod uvijek živi; spremio je za sud prijesto svoj.
७परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे; त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे.
8 On æe suditi vasionome svijetu po pravdi, usudiæe narodima pravo.
८तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे.
9 Gospod je utoèište ubogome, utoèište u nevolji.
९परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे, संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
10 U tebe se uzdaju koji znaju ime tvoje, jer ne ostavljaš onijeh koji te traže, Gospode!
१०जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
11 Pojte Gospodu, koji živi na Sionu; kazujte narodu djela njegova;
११सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
12 Jer on osveæuje krv, pamti je; ne zaboravlja jauka nevoljnijeh.
१२कारण देव, जो रक्तपाताचा सूड उगवतो, त्यांची आठवण आहे. तो गरीबांचा आक्रोश विसरला नाही.
13 Smiluj se na me, Gospode; pogledaj kako stradam od neprijatelja svojih, ti, koji me podižeš od vrata smrtnijeh,
१३परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा.
14 Da bih kazivao sve hvale tvoje na vratima kæeri Sionove, i slavio spasenje tvoje.
१४म्हणजे मी तुझी स्तुती वर्णीन; सियोन कन्येच्या दाराजवळ मी तुझ्या तारणात हर्ष करीन.
15 Popadaše narodi u jamu, koju su iskopali; u zamku, koju su sami namjestili, uhvati se noga njihova.
१५राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत; त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे.
16 Poznaše Gospoda; on je sudio; u djela ruku svojih zaplete se bezbožnik.
१६परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.
17 Vratiæe se u pakao bezbožnici, svi narodi koji zaboravljaju Boga; (Sheol )
१७दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल, जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल. (Sheol )
18 Jer neæe svagda biti zaboravljen ubogi, i nada nevoljnicima neæe nigda poginuti.
१८कारण जो गरजवंत आहे, तो विसरला जाणार नाही. किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही.
19 Ustani, Gospode, da se ne posili èovjek, i da prime narodi sud pred tobom.
१९हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ न होवो; राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे.
20 Pusti, Gospode, strah na njih; neka poznadu narodi da su ljudi.
२०परमेश्वरा त्यांना भयभीत कर; राष्ट्रे केवळ मर्त्य मनुष्य आहेत, हे त्यांना कळू दे. सेला.